आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय

पीएम केअर्स अंतर्गत पुरवठा केलेल्या व्हेंटिलेटरवर संदर्भात अद्ययावत माहिती


' मेड इन इंडिया ' व्हेंटीलेटर्समुळे प्रभावी कोविड व्यवस्थापनासाठी रुग्णालयांमधील पायाभूत सुविधांना बळकटी

विना अडथळा कार्यान्वयनासाठी उत्पादकांकडून सर्व तांत्रिक सहाय्य प्रदान केले जात आहे.

Posted On: 13 MAY 2021 10:00AM by PIB Mumbai

गेल्या वर्षभरापासून ‘संपूर्ण सरकार’ या दृष्टिकोनातून रुग्णालयात उपचार  घेणार्‍या कोविड रूग्णांच्या प्रभावी व्यवस्थापनासाठी राज्य सरकार आणि केंद्रशासित प्रदेशांच्या प्रयत्नांना केंद्र सरकार पाठिंबा देत आहे.  रुग्णालयात अस्तित्वात असलेल्या पायाभूत सुविधा वाढविण्यासाठी, केंद्र सरकार एप्रिल २०२० पासून राज्य / केंद्रशासित प्रदेश / केंद्रीय रुग्णालये / संस्थांना व्हेंटिलेटर्ससह  आवश्यक वैद्यकीय उपकरणे खरेदी आणि उपलब्ध करून देत आहे.

 काही प्रसारमाध्यमांच्या वृत्तामध्ये असे सुचविण्यात आले आहे की, भारत सरकारने पंजाबमधील जीजीएस वैद्यकीय महाविद्यालय  आणि रुग्णालय  फरीदकोट, ला व्हेंटीलेटर्सचा   (पीएम केअर्स द्वारे  समर्थित) पुरवठा केला आहे. व्हेन्टिलेटर्सची विक्री  केल्यानंतर उत्पादकांकडून योग्य प्रतिसाद नं मिळाल्यामुळे तांत्रिक समस्येचे निराकरण होऊ शकले नाही परिणामी ते वापरले गेले नाहीत.  हे वृत्त देताना या प्रकरणात संपूर्ण माहिती घेतलेली नाही त्यामुळे माहिती न घेता  केलेले वृत्तांकन  निराधार असल्याचे दिसते.

 गेल्या वर्षी महामारीच्या सुरुवातीच्या काळात देशभरातील शासकीय रुग्णालयात मर्यादित संख्येत व्हेन्टिलेटर्स उपलब्ध होते. शिवाय, देशात व्हेन्टिलेटर्सचे  अत्यंत मर्यादित उत्पादन होत होते आणि परदेशातील बहुतेक पुरवठादार व्हेन्टिलेटर्सचा मोठ्या प्रमाणात  पुरवठा भारताला  करू शकत नव्हते.त्याचवेळी देशातील मोठ्या प्रमाणात असलेली अपेक्षित मागणी आणि मागणी नोंदविण्यासाठी  “मेक इन इंडिया” अंतर्गत व्हेन्टिलेटर्स  तयार करण्यासाठी स्थानिक उत्पादकांना  प्रोत्साहित केले गेले. त्यापैकी बरेच जण पहिल्यांदाच  व्हेन्टिलेटर्सचे उत्पादन  करणारे होते . व्हेन्टिलेटर्स नमुन्याची कठोर तपासणी , तांत्रिक प्रात्यक्षिक आणि वैद्यकीय  वैधता प्रक्रिया,उपलब्ध असेलेल्या अत्यंत मर्यादित वेळेत संबंधित कार्यक्षेत्रातील तज्ञांमार्फत करून त्यांच्या मंजुरीनंतर पुरवठा करण्यासाठी मंजुरी देण्यात आली.

अशी काही राज्ये आहेत ज्यांना व्हेंटीलेटर्स प्राप्त झाले आहेत  मात्र अद्याप ते रुग्णालयात स्थापित केलेले नाहीत. केंद्रीय आरोग्य सचिवांनी 11 एप्रिल 2021 रोजी अशा सात राज्यांना पत्र लिहिले आहे.   मागील 4-5 महिन्यांपासून अजूनही त्यांच्याकडे 50 हून अधिक व्हेन्टिलेटर्स स्थापित केलेले नाहीत  ,त्या राज्यांना विनंती करण्यात आली आहे की ,व्हेन्टिलेटर्स गतिमानतेने स्थापित करावे ,  जेणेकरुन व्हेन्टिलेटर्सचा अनुकूल वापर करता येईल.

जीजीएस वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय , फरीदकोट, पंजाबमध्ये 80 एजीव्हीए पैकी 71  व्हेन्टिलेटर्स  कार्यान्वयनाविना  किंवा सदोष असल्याचे  यासंबंधित अलीकडच्या प्रसारमाध्यमांच्या वृत्तात सांगण्यात आले आहे . हे स्पष्ट करण्यात आले आहे की,  भारत इलेक्‍ट्रॉनिक लिमिटेड (बीईएल) द्वारे 88 व्हेन्टिलेटर्स आणि  एजीव्हीएद्वारे पाच  व्हेन्टिलेटर्स  पुरवण्यात आले आहेत. व्हेन्टिलेटर्सचे यशस्वी स्थापन आणि  कार्यान्वयनानंतर या व्हेन्टिलेटर्सना  रुग्णालय प्राधिकरणाने  अंतिम स्वीकृती प्रमाणपत्र प्रदान केले.

माध्यमांच्या एका गटाने दिलेले वृत्त  खोडून काढत,    बीईएलने माहिती दिली आहे की,  जीजीएस वैद्यकीय महाविद्यालय आणि  रुग्णालय  (जीजीएसएमसीएच), फरीदकोट मधील बहुतेक व्हेन्टिलेटर्स  सदोष नाहीत. उत्पादकांच्या अभियंत्यांनी  पूर्वी प्राप्त झालेल्या  तक्रारीं सोडविण्यासाठी विविध प्रसंगी या वैद्यकीय महाविद्यालयाला  भेट दिली आणि  तातडीने आवश्यक असलेली  किरकोळ दुरुस्तीची कामे केली आहेत .

केंद्रीय ऑक्सीजन वायू वाहिनीमध्ये आवश्यक तेव्हढा दाब  नसणे यासह जीजीएसएमसीएचमधील पायाभूत सुविधांमध्ये समस्या / अडचणी असल्याचे निदर्शनाला  आले आहे. याशिवाय , फ्लो सेन्सर, बॅक्टेरिया फिल्टर्स आणि एचएमई फिल्टर्स यांसारख्या  उपयोगी  वस्तूंमध्ये रुग्णालय प्राधिकरणाकडून विहित  निकषांनुसार बदल केले जात नाहीत असे बीईएलने म्हटले आहे  .

शिवाय, बीईएल अभियंत्यांनी पुन्हा (12 मे, 2021) रोजी  जीजीएसएमसीएचला भेट दिली आणि केवळ काही विहितदर्जाच्या  उपयोगी वस्तूं  बदलून  पाच व्हेन्टिलेटर्स कार्यान्वित केले आणि त्यांनी जीजीएसएमसीएच प्राधिकरणाला या व्हेन्टिलेटर्सचे योग्य  कार्यान्वयन कार्याची प्रक्रिया समजावून दिली . वापरकर्त्यांसाठीच्या  माहिती पुस्तिकेत दिलेल्या सूचनांच्या व्यतिरिक्त,व्हेन्टिलेटर्सच्या सर्व वापरकर्त्यांना पायाभूत सुविधा, योग्य वापर आणि सीव्ही 200 व्हेन्टिलेटर्सच्या  देखभालीबाबत संबंधित सूचना आणि मार्गदर्शक सूचना देखील देण्यात आल्या आहेत. मात्र ,पंजाबमधील बहुतांश  रुग्णालये / वैद्यकीय महाविद्यालयांकडून याचे अनुसरण केले जात नाही.

हे स्पष्ट केले आहे की, या महामारीच्या परिस्थितीत व्हेन्टिलेटर्सची आवश्यकता पूर्ण करण्यासाठी राज्यांना आवश्यक असलेले  सर्व तांत्रिक सहाय्य पुरवणे बीईएलकडून सुरूच राहील हे स्पष्ट केले आहे . याव्यतिरिक्त, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने 9 मे 2021 रोजी राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना पत्र पाठवत  पुन्हा एकदा त्यांना व्हेन्टिलेटर्स  उत्पादकांच्या हेल्पलाइन क्रमांकाची माहिती दिली, हे क्रमांक  स्टिकर्सच्या रूपात व्हेन्टिलेटर्सवर  उपलब्ध आहेत. याव्यतिरिक्त, पुन्हा राज्यवार व्हाट्सएप ग्रुपना  माहिती प्रदान प्रदान करण्यात आली आहे. . या उत्पादकांचे समर्पित ईमेल आयडीसुद्धा राज्ये / केंद्रशासित प्रदेशांना देण्यात आले आहेत.

 

***

Jaydevi PS/SC/CY

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1718241) Visitor Counter : 225