आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय

कोविड कार्यकारी गटाच्या सल्ल्यानुसार कोव्हीशील्ड लसीच्या दोन मात्रांमधील अंतर 6-8 आठवड्यांपासून 12-16 आठवड्यांपर्यंत वाढविण्यात आले

Posted On: 13 MAY 2021 5:25PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 13 मे 2021

डॉ. एन.  के.  अरोरा यांच्या अध्यक्षतेखालील  कोविड कार्यकारी गटाने, कोव्हीशील्ड लसीच्या पहिल्या आणि दुसऱ्या मात्रेमधील अंतर 12 ते 16 आठवड्यांपर्यंत वाढवण्याची शिफारस केली आहे. कोव्हीशिलड लसीच्या दोन मात्रांमधील विद्यमान अंतर 6-8 आठवडे आहे.

विशेषतः ब्रिटनमधील  उपलब्ध वास्तववादी पुराव्यांच्या आधारे, कोविड -19  कार्यकारी गटाने कोव्हीशिल्ड लसीच्या दोन मात्रांमधील अंतर 12-16 आठवड्यांपर्यंत वाढवण्यासाठी सहमती दर्शविली.

कोविड कार्यकारी गटात खालील सदस्यांचा समावेश आहे:

1 . डॉ एन के अरोरा,संचालक ,आयएनसीएलएएन ट्रस्ट

2 . डॉ. राकेश अग्रवाल , संचालक आणि अधिष्ठाता , जीआयपीएमईआर, पुडुचेरी

3. डॉ. गगनदीप कांग, प्राध्यापक, ख्रिश्चन वैद्यकीय महाविद्यालय,वेल्लोर

4. डॉ. जे.पी.मुललीयाल,निवृत्त प्राध्यापक,ख्रिश्चन वैद्यकीय महाविद्यालय,वेल्लोर

5. डॉ. नवीन खन्ना, गट नेते , आंतरराष्ट्रीय जनुकीय अभियांत्रिकी आणि जैव तंत्रज्ञान केंद्र (आयसीजीईबी), जेएनयू, नवी दिल्ली

6. डॉ. अमूल्य पांडा,संचालक, भारतीय रोगप्रतिकारशास्त्र संस्था , नवी दिल्ली

7. डॉ. व्ही. जी. सोमाणी, भारतीय औषध महानियंत्रक (डीसीजीआय), भारत सरकार

कोविड कार्यकारी गटाची शिफारस, नीति आयोग (आरोग्य) चे सदस्य  डॉ. व्ही के पॉल यांच्या अध्यक्षतेखाली  कोविड -19 लसीसंदर्भातील राष्ट्रीय तज्ञ गट (एनईजीव्हीएसी) ने 12 मे 2021 रोजी झालेल्या बैठकीत स्वीकारली.

केंद्रीय आरोग्य आणि  कुटुंब कल्याण मंत्रालयानेही, कोव्हीशील्ड लसीच्या पहिल्या आणि दुसऱ्या मात्रेमधील अंतर 12 ते 16 आठवड्यांपर्यंत  वाढविण्याची  कोविड कार्यकारी गटाची ही शिफारस मान्य केली आहे. 

 

 

 

Jaydevi PS/S.Chavan/P.Malandkar

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1718327) Visitor Counter : 297