आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय

कोविड मदत सामग्रीबद्दल अद्ययावत माहिती


‘संपूर्ण सरकार’या दृष्टीकोनातून, भारत सरकारने जागतिक पातळीवरून आलेल्या मदतीचे राज्ये तसेच केंद्रशासित प्रदेशांना त्वरीत वितरण केले आहे

आतापर्यंत एकूण 9,294 ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर्स, 11,835 ऑक्सिजन सिलेंडर; 19 ऑक्सिजन उत्पादन प्रकल्प; 6,439 व्हेंटीलेटर्स/Bi PAP; जवळपास 4.22 लाख रेमडेसिविरच्या कुप्या वितरित केल्या गेल्या/ रवाना झाल्या

Posted On: 13 MAY 2021 6:39PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 13 मे 2021

 

देशातील अभूतपूर्व कोविड लाटेशी सामना करण्याच्या प्रयत्नांना बळ देण्यासाठी म्हणून 27 एप्रिल 2021 पासून भारत सरकारला विविध देश आणि संस्थांकडून आंतरराष्ट्रीय देणग्या आणि कोविड-19 वरील उपचारांसाठी वैद्यकीय साधनसामग्री प्राप्त होत आहे.  संपूर्ण सरकार या दृष्टीकोनातून पद्धतशीर आणि योग्य प्रकारे वितरणपद्धती राबवत विविध सरकारी विभाग व मंत्रालये या मिळालेल्या साधनसामग्रीचे राज्ये व केंद्रशासित प्रदेशांना त्वरीत वितरण व्हावे म्हणून समन्वयाने काम करत आहेत.

27 एप्रिल 2021 ते 12 मे 2021 पर्यंत एकूण 9294 ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर्स, 11,835 ऑक्सिजन सिलेंडर; 19 ऑक्सिजन उत्पादन प्रकल्प; 6,439 व्हेंटिलेटर्स/Bi PAP;जवळपास 4.22 लाख रेमडेसिविर कुप्या रस्ते तसेच हवाई मार्गाने वितरित झाल्या किंवा रवाना केल्या गेल्या.

12 मे 2021 रोजी कुवैत, सिंगापूर, गुलियड, स्वित्झर्लंड, स्पेन, इजिप्त कडून आलेल्या मुख्य सामग्रीत खालील गोष्टींचा समावेश होता.

रेमडेसिविर:  86,595

ऑक्सिजन सिलेंडर: 4,802

ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर्स: 10

व्हेंटिलेटर्स/Bi PAP/CPAP:141

मदत घेणारी राज्ये व केंद्रशासित प्रदेशांना तसेच संस्थांना मदतीचे त्वरीत वाटप आणि यथायोग्य वितरण याचे काम सातत्याने सुरू आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालय सातत्याने यावर देखरेख ठेवून आहे. देणग्या, मदत आणि अनुदान या स्वरूपात येणारी कोविड उपचारांसाठीच्या बाहेरून आलेल्या

 सामग्रीचे वितरण आणि वाटपातील समन्वय राखण्यासाठी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या अखत्यारीत एक कक्ष स्थापन करण्यात आला आहे.  हा कक्ष  26 एप्रिल 2021 पासून कार्यरत आहे. 2 मे 2021 पासून आरोग्य मंत्रालयाने मानक कार्यप्रणाली(SOP) तयार करून अंमलात आणली.

जागतिक पातळीवरून प्राप्त झालेल्या सामग्रीचे विविध आरोग्य केंद्रे, राज्ये तसेच केंद्रशासित प्रदेशांना त्वरीत वितरण होत असतानाचे हे काही दृश्ये

S.Patil/V.Sahjrao/P.Malandkar

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1718350) Visitor Counter : 259