आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
2 ते 18 वयोगटासाठी कोव्हॅक्सिनच्या दुसऱ्या/ तिसऱ्या टप्यातील मानवी चाचणीला भारतीय औषध महानियंत्रकांची मान्यता
मेसर्स भारत बायोटेक 525 निरोगी स्वयंसेवकांवर चाचण्या घेणार
Posted On:
13 MAY 2021 10:35AM by PIB Mumbai
देशाचे राष्ट्रीय नियामक,भारतीय औषध महानियंत्रक (डीसीजीआय) यांनी काळजीपूर्वक तपासणी केल्यानंतर , विषय तज्ञ समिती (एसईसी) ची शिफारस मान्य केली आहे आणि 12.05.2021 रोजी लस उत्पादक भारत बायोटेक लिमिटेडला 2 ते 18 वर्षे वयोगटासाठी कोवॅक्सीन (कोविड प्रतिबंधक लस ) ची दुसऱ्या/ तिसऱ्या टप्यातील मानवी चाचणी घेण्यासाठी परवानगी दिली.
मेसर्स भारत बायोटेक इंटरनेशनल लिमिटेड, हैदराबाद (बीबीआयएल) ने 2 ते 18 वर्षे वयोगटासाठी कोवॅक्सीन ची दुसऱ्या/ तिसऱ्या टप्यातील मानवी चाचणी घेण्याचा प्रस्ताव दिला होता. 525 निरोगी स्वयंसेवकांवर ही चाचणी घेण्यात येईल.
या चाचणीत , 0 दिवस आणि 28 दिवस दरम्यान अंतस्नायुमधून लसीच्या दोन मात्रा दिल्या जातील.
जलद नियामक प्रतिसाद म्हणून, हा प्रस्ताव विषय तज्ज्ञ समिती (एसईसी) (कोविड -19) कडून 11.05.2021. रोजी विचारात घेण्यात आला. समितीने तपशीलवार विचारविनिमयानंतर प्रस्तावित टप्पा दोन / तीन च्या मानवी चाचणीला सशर्त परवानगी देण्याची शिफारस केली.
***
Jaydevi PS/SC/CY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1718215)
Visitor Counter : 291
Read this release in:
Gujarati
,
Tamil
,
Kannada
,
Odia
,
English
,
Urdu
,
Hindi
,
Bengali
,
Manipuri
,
Punjabi
,
Telugu