PIB Headquarters

पत्र सूचना कार्यालयाचे कोविड-19 संबंधित बातमीपत्र

Posted On: 12 MAY 2021 9:31PM by PIB Mumbai

 

नवी दिल्ली/मुंबई 12 मे 2021

 


 

 

 

  • India’s Active Caseload Declines for the Second Consecutive day
  • WHO has not associated the term “Indian Variant” with B.1.617, now classified as Variant of Concern
  • Government to ramp up availability of Amphotericin B - to fight Mucormycosis
  • PM CARES Fund approves procurement of 1.5 lakh units of SpO2 based oxygen supply system developed by DRDO
  • INS Tarkash brings medical oxygen consignment from Qatar
     

 

#Unite2FightCorona

#IndiaFightsCorona

 

PRESS INFORMATION BUREAU

MINISTRY OF INFORMATION AND BROADCASTING

GOVERNMENT OF INDIA

 

 

आरोग्य मंत्रालयाची कोविड-19 शी संबंधित घडामोडींवरील माहिती

भारतातील एकूण कोविड सक्रीय रुग्णांची संख्या कमी होत असून आता ती 37,04,099 झाली आहे. देशातील एकूण सक्रीय रुग्णसंख्येच्या ती 15.87% इतकी आहे.

गेल्या 24 तासांत कोविड सक्रीय रुग्णसंख्येत 11,122 नी घसरण झाली आहे. सक्रीय रुग्णसंख्येत घसरण होण्याचा आजचा सलग दुसरा दिवस आहे.

देशातील एकूण सक्रीय रुग्णांपैकी 82.51% रुग्ण हे देशातील 13 राज्यांमधील आहेत.

भारतात आतापर्यंत कोविड मुक्त झालेल्यांची संख्या आजमितीला 1,93,82,642 इतकी आहे तर राष्ट्रीय रोगमुक्ती दर 83.04% इतका आहे.

गेल्या 24 तासांत 3,55,338 रुग्ण कोविडमधून मुक्त झाले.

सलग दुसऱ्या दिवशी रोगमुक्त झालेल्यांची संख्या दैनंदिन पातळीवर नव्याने बाधित झालेल्यांपेक्षा जास्त होती.

71.58% रुग्ण हे देशाच्या दहा राज्यांमधील आहेत.

“संपूर्णतः सरकार” दृष्टीकोनाच्या माध्यमातून राज्य सरकारांच्या कोविड व्यवस्थापनाच्या प्रयत्नांना पाठबळ पुरविण्यासाठी भारत सरकार जागतिक पातळीवरून आलेल्या मदतीचे अत्यंत तातडीने वितरण करीत आहे. भारताला केलेल्या जागतिक मदतीच्या रूपाने, राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या कोविड प्रतिसादाला बळकट करून मदत करण्यासाठी आतापर्यंत एकूण 9,200 ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर्स, 5,243 ऑक्सिजन सिलेंडर्स, 19 ऑक्सिजन निर्मिती संयंत्रे, 5,913 व्हेन्टिलेटर्स/बाय पॅप, रेमडेसिवीर औषधाच्या सुमारे 3.44 लाख कुप्या प्राप्त झाल्या आहेत. केंद्र सरकार, राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना जागतिक मदतीचे सुरळीत आणि जलद वितरण सुनिश्चित करण्यासाठी वेगवान सीमा शुल्क विभाग मंजुरी आणि हवाई तसेच रस्ते मार्गांचा वापर करीत आहे.

दुसरीकडे, राष्ट्रव्यापी कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमेच्या तिसऱ्या टप्प्याचा विस्तार होत असताना देशातील लसीकरण झालेल्यांच्या एकूण संख्येने 17.52 कोटींचा आकडा पार केला आहे.

आज सकाळी 7 वाजेपर्यंतच्या आकडेवारीच्या अंतरिम अहवालानुसार, देशात आज एकूण 25,47,534 सत्रांच्या आयोजनाच्या माध्यमातून कोविड लसीच्या 17,52,35,991 मात्रा देण्यात आल्या आहेत. यामध्ये लसीची पहिली मात्रा घेतलेले 95,82,449 आरोग्य सेवा कर्मचारी तर लसीची दुसरी मात्रा घेतलेले 65,39,376 आरोग्य सेवा कर्मचारी, 1,41,49,634 आघाडीवरील कर्मचारी (पहिली मात्रा), 79,52,537 आघाडीवरील कर्मचारी (दुसरी मात्रा), 18 ते 45 वर्षे वयोगटातील 30,44,463 लाभार्थी (पहिली मात्रा) तसेच 45 ते 60 वर्षे या वयोगटातील 5,58,83,416 लाभार्थी (पहिली मात्रा) आणि 78,36,168 लाभार्थी (दुसरी मात्रा) तसेच 60 वर्षांहून जास्त वयाचे 5,39,59,7721 लाभार्थी (पहिली मात्रा) आणि 1,62,88,176 लाभार्थी (दुसरी मात्रा) यांचा समावेश आहे.

 

इतर अपडेटस्

 

 

  • जागतिक समुदाय सद्भावनेने 27 एप्रिल 2021 पासून देणगी स्वरूपात तसेच कोविड -19 प्रतिबंधक वैद्यकीय सामुग्री आणि उपकरणांचा पुरवठा करून कोविड व्यवस्थापनातील आव्हानांना तोंड देण्यासाठी भारताला मदत करत आहे. संपूर्णतः सरकार दृष्टीकोनाअंतर्गत सुव्यस्थित आणि पद्धतशीर यंत्रणेच्या माध्यमातून केंद्र सरकारची विविध मंत्रालये तसेच विभाग संयुक्त सहकार्यातून, कोविड विरुद्ध लढ्यात भारताच्या प्रयत्नांना बळ देण्यासाठी जगभरातून प्राप्त मदत सामग्रीचे अखंडितपणे वितरण करत आहेत. 27 एप्रिल 2021 ते 10 मे 2021 या काळात एकूण 9,284 ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर्स,7,033 ऑक्सिजन सिलेंडर्स, 19 ऑक्सिजन निर्मिती संयंत्रे, 5,933 व्हेन्टिलेटर्स/बीआय पीएपी; रेमडेसिवीर औषधाच्या सुमारे 3.44 लाख कुप्या यांचे रस्ते तसेच हवाई वाहतुकीच्या माध्यमातून वितरण झाले आहे किंवा ते सामान वितरणासाठी रवाना झाले आहे.

 

 

 

 

 

  • सर्व अडचणींवर मात करत आणि नवे उपाय योजत, भारतीय रेल्वे वैद्यकीय वापरासाठीचा द्रवरूप ऑक्सिजन देशभरातील विविध राज्यांना पोचवण्याच्या कामी मदत करत आहे. आतापर्यंत भारतीय रेल्वेने जवळपास 6260 मेट्रीक टन वैद्यकीय वापरासाठीचा द्रवरुप ऑक्सिजन चे 396 टँकर्स देशभरातील विविध राज्यांना पोचवले आहेत. काल रोजी ऑक्सिजन एक्स्प्रेसनी देशभरात जवळपास 800 मेट्रीक टन ऑक्सिजन पोहोचवला. आता पर्यंत 100 ऑक्सिजन एक्स्प्रेसनी ही सेवा बजावली असून विविध राज्यांना मदत पोचवली आहे. मदतीची विनंती करणाऱ्या सर्व राज्यांना शक्य तेवढा वैद्यकीय वापराचा द्रवरूप ऑक्सिजन कमीत कमी वेळात पोचवण्याचा भारतीय रेल्वेचा प्रयत्न आहे. हे प्रसिद्ध होईपर्यंत महाराष्ट्रात 407 मेट्रीक टन, उत्तरप्रदेशात जवळपास 1680 मेट्रीक टन, मध्यप्रदेशात 360 मेट्रीक टन, हरयाणात 939 मेट्रीक टन, तेलंगणात 123 मेट्रीक टन, राजस्थानात 40 मेट्रीक टन, कर्नाटकात 120 मेट्रीक टन तर दिल्लीत 2404 मेट्रीक टन ऑक्सिजन उतरवण्यात आला आहे.

 

 

महाराष्ट्र अपडेट्स :-

18 ते 44 वर्षे वयोगटासाठीचा कोव्हॅक्सिनच्या मात्रांचा साठा, 45 वर्षापुढील व्यक्तींच्या दुसऱ्या मात्रेसाठी वळविण्याचे निर्देश राज्य सरकारने दिल्यानंतर, बृहन्मुंबई महानगरपालिका (बीएमसी) लहान वयोगटाला कोव्हिशील्ड लसीच्या मात्रा देणे सुरूच ठेवेल असे पालिकेने जाहीर केले आहे. बीएमसी येत्या आठवड्यात दोन दिवस दुसरी मात्रा देण्यासाठी राखीव ठेवण्याची शक्यता आहे. महाराष्ट्राचे प्राणवायू प्रतिमान (ऑक्सिजन मॉडेल) साऱ्या देशात नावाजले जात आहे. एप्रिल महिन्याच्या मध्यापासून राज्य सरकार हे प्रतिमान वापरत असल्याने राज्याकडे वैद्यकीय वापरासाठी पुरेसा प्राणवायू उपलब्ध आहे.

 

गोवा अपडेट्‌स:-

गोवा वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्राणवायू पुरवठ्यास जोड देण्यासाठी ड्यूरा सिलेंडर बसवण्याचा विचार गोवा सरकार करत आहे. दाबाखाली वायू भरण्याऐवजी द्रवरूप वैद्यकीय प्राणवायू भरला असता, यापैकी प्रत्येक सिलेंडरची क्षमता किमान 28 जंबो सिलेंडर्सइतकी आहे. 'राज्यात प्रवेशणाऱ्या मालवाहू गाड्यांतील दोन चालक व एक सहाय्यक यांंच्याकडे कोविड निगेटिव्ह असल्याचे प्रमाणपत्र असले पाहिजे'- ही यापूर्वी घातलेली अट, आज, पुढील आदेश येईपर्यंत काढून टाकण्यात आली. मात्र अशा व्यक्तींना थर्मल गनने केल्या जाणाऱ्या तापमान तपासणीस सामोरे जावे लागेल, जेणेकरून त्यांना कोणतीही लक्षणे नसल्याची खातरजमा करता येईल. त्यांच्यात लक्षणे दिसून आल्यास त्यांना गोव्यात प्रवेश करण्याची परवानगी देता येणार नाही.

PIB FACT CHECK

 

 

***

M.Chopade/J.Waishampayan/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1718164) Visitor Counter : 164