संरक्षण मंत्रालय

कोविड-19 संबधित वैद्यकीय सामग्री पोचवण्यासाठी भारतीय हवाई दल व भारतीय नौदलाचे अविरत प्रयत्न

Posted On: 12 MAY 2021 4:54PM by PIB Mumbai

 

देशातील कोविड-19 ची परिस्थिती हाताळण्यासाठी स्थानिक नागरी प्रशासनाला प्राणवायू तसेच इतर वैद्यकीय मदत पोचवण्यास भारतीय हवाई दल आणि भारतीय नौदल अष्टौप्रहर कार्यरत आहेत. 12 मे 2021 रोजी सकाळी भारतीय हवाईदलाने 6856 मेट्रीक टन क्षमतेचे 403 ऑक्सिजनचे सिलेंडर्स, 163 मेट्रीक टन क्षमतेची इतर उपकरणे देशातील विविध भागांमध्ये 634 लढावू विमानांमधून पाठवले. जामनगर, भोपाळ, चंदीगढ पानगढ, इंदोर, रांची, आग्रा, जोधपूर, बेगमपेठ, भुवनेश्वरपुणे, सुरत, रायपूर, उद्यपुर, मुंबई, लखनौ, नागपूर, ग्वाल्हेर, विजयवाडा, बडोदे, दिमापूर व हिंडन  या शहरांमध्ये ही मदत पोचवण्यात आली.

भारतीय हवाई दलाने आणखी 98 लढावू विमाने देशाच्या विविध भागात पाठवून 793 मेट्रीक टनांचे 95 कंटेनर्स तसेच 204 मेट्रीक टन क्षमतेची इतर उपकरणे पोहोचवली. ही उपकरणे सिंगापूर, दुबई, थायलंड, जर्मनी, ऑस्ट्रेलिया, बेळगाव, इंडोनेशिया, नेदरलँड्स, युनायटेड किंगडम, इस्रायल व फ्रान्स येथून मागवली आहेत.

समुद्र सेतू II या मोहिमेचा भाग म्हणून भारतीय नौदलाची सात जहाजे विविध राज्यांना थेट मदत म्हणून  260 मेट्रीक टन द्रवरूप ऑक्सिजनचे 13 कंटेनर्स, जवळपास 160 मेट्रीक टनांची  क्षमता असलेली 8 ऑक्सिजन सिलेंडर्स, 2600 ऑक्सिजन भरलेली सिलेंडर्स आणि ऑक्सिजन भरण्यासाठी 3,150 रिकामी सिलेंडर्स पर्शियन आखात व आग्नेय आशियातून घेऊन भारतात परतली. सध्या आयएनएस जलाश्व हे जहाज  ब्रुनोईला आहे तर आयएनएस शार्दूल 12 मे 2021 ला कुवैतला पोहोचेल. भारतात परतलेल्या नौदलाच्या जहाजांचे तपशील पुढीलप्रमाणे:-

Ship

Medical Supplies

Country/Port

Arrival

INS Tarkash

27-MT Liquid Medical Oxygen filled containers - 02

Oxygen cylinders - 230

Qatar

Mumbai on May 12, 2021

INS Kochi

&

INS Tabar

100MT Liquid Medical Oxygen (LMO) in five containers

Oxygen cylinders – 1200

Kuwait

New Mangalore Port on May 11, 2021

INS Airavat

Cryogenic oxygen tanks – 08

Oxygen cylinders –3,898

Other critical COVID-19 medical stores

Singapore

Visakhapatnam on May 10, 2021

INS Trikand

40 MT Liquid Oxygen

(Liquid Medical Oxygen cryogenic containers)

Qatar

Mumbai on May 10, 2021

 

INS Kolkata

Oxygen Cylinders – 400

27-MT Liquid Medical Oxygen Containers – 02

Oxygen concentrators - 47

Qatar

&

Kuwait

New Mangalore Port on May 10, 2021

INS Talwar

27-MT oxygen containers – 02

Bahrain

New Mangalore Port on May 05, 2021

***

Jaydevi PS/V.Sahajrao/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1717978) Visitor Counter : 187