वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय

जागतिक ऐक्य ही काळाची गरज असल्याचे सांगत नितांत गरज असलेल्या लोकांना कोविड प्रतिबंधक लसीचे मुक्तहस्ते वितरण करण्याचे पियुष गोयल यांचे देशांना आवाहन

Posted On: 12 MAY 2021 7:02PM by PIB Mumbai

 

वाणिज्य आणि उद्योग, रेल्वे, ग्राहक व्यवहार आणि  अन्न व सार्वजनिक वितरण मंत्री श्री पीयूष गोयल यांनी आज सांगितले की ,व्यापार आणि गुंतवणूक संरक्षणासंदर्भातील  संतुलित, महत्वाकांक्षी, सर्वसमावेशक आणि परस्पर लाभाच्या करारासाठी वाटाघाटी सुरू करण्यात भारताला अधिक प्रशस्त वाटते.जागतिक आर्थिक मंचाच्या जागतिक व्यापार दृष्टीकोन या  सत्रामध्ये बोलताना ते म्हणाले की, क्षेत्रीय व्यापक आर्थिक भागीदारी (आरसीईपी) हा करार संतुलित नव्हता त्यामुळे  भारतातील शेतकरी, आमचे सूक्ष्म, लघु, मध्यम उद्योग  , दुग्ध उद्योग क्षेत्र दुखावले गेले असते आणि म्हणूनच क्षेत्रीय व्यापक आर्थिक भागीदारी आरसीईपीमध्ये सहभागी न होणे भारतासाठी योग्य होते .

श्री गोयल म्हणाले की, भारत व्यापार आणि  गुंतवणूकीच्या वाटाघाटीच्या प्रतीक्षेत आहे तसेच भारत, ब्रिटन आणि युरोपियन युनियन देशातील लोकांच्या आर्थिक वाढीची आणि समृद्धीची त्यात क्षमता आहे. मंत्री म्हणाले की , लोकशाही, पारदर्शकता, कायद्याचे राज्य, न्यायालयांचे स्वातंत्र्य, गुंतवणूकीचे नियम इत्यादी बाबतीत भारत  ब्रिटन, युरोपियन युनियन , ऑस्ट्रेलिया, कॅनडा आणि अमेरिका यासारख्या देशांशी आणि  संस्थांशी साधर्म्य साधतो , शिवाय, या देशांशी  भारतीय व्यापार हा मोठ्या प्रमाणात संतुलित आहे.

आम्ही ठराविक देशांचा अजेंडा नक्कीच स्वीकारू शकत नाही. एकतर्फी व्यापार व्यवस्था, अनुदानाची व्यवस्था आणि विकसित देश आनंद घेत असलेले फायदे जागतिक व्यापार संघटनेमध्ये अधिक अनुकंपेने आणि अधिक प्रामाणिकपणाने मांडले गेले पाहिजेत. ते म्हणाले की,जागतिक व्यापार संघटनेत  प्रामाणिकनिष्पक्ष, न्यायसंगत आणि खर्‍या भावनेने जागतिक अजेंडा मांडावा लागेल.

या आव्हानात्मक काळात भारताला  अन्य देशांनी  दिलेल्या पाठिंब्याचे कौतुक करताना श्री गोयल म्हणाले की, मौल्यवान जीव  वाचवण्यासाठी तातडीने आवश्यक असलेल्या कोविड-19 संबंधित आरोग्य उत्पादनांची निर्यात देशांनी सुलभ केली पाहिजे. ते म्हणाले की , हे विशेषतः लसींशी  संबंधित आहे.जागतिक ऐक्य ही काळाची गरज असल्याचे सांगत नितांत गरज असलेल्या लोकांना  कोविड प्रतिबंधक लसी उदारपणे वितरीत करण्याचे आवाहन श्री . गोयल यांनी देशांना केले.

श्री. गोयल म्हणाले कीया संकटावर अधिक वेगाने मात करण्यासाठी आम्ही  केवळ ट्रिप्स  म्हणजेच बौद्धिक संपत्ती हक्कांच्या व्यापाराशी संबंधित  करारातून सूट मिळण्यासाठी आग्रही नाही तर  हे करण्यासाठी त्वरित एकमत तयार करणे  ,तंत्रज्ञान हस्तांतरण आणि कच्च्या मालाची उपलब्धता हे देखील आवश्यक आहे. ते म्हणाले की कोविडच्या आव्हानावर मात करण्याच्या दृष्टीने  आम्हाला औषधे, लसीकरण आणि संबंधित पायाभूत सुविधांची व्याप्ती वाढवायची आहे. मंत्री म्हणाले कीलसींच्या पेटंटच्या  मुद्द्यावर अमेरिकेने मर्यादित पाठिंबा दर्शविला असून त्याचे आम्ही मनःपूर्वक  स्वागत करतो आणि ही आजच्या काळाची गरज आहे.ते म्हणाले की, या परिस्थितीत वेग हे मूलतत्व असून कोविड -19 महामारीवर मात करण्याच्या दृष्टीने , आवश्यक असलेल्या लसी, उपचार आणि इतर वस्तू सर्वांसाठी न्याय्य, वेळेवर आणि परवडणाऱ्या दरात मिळावीत ही उद्दीष्टे पूर्ण करावी लागतील.

***

M.Chopade/S.Chavan/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1718082) Visitor Counter : 214