आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
जगभरातून प्राप्त मदत सामुग्रीचे केंद्र सरकारकडून जलद वितरण केले जात असल्यामुळे कोविड व्यवस्थापनासाठी राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातील वैद्यकीय सेवा अधिक बळकट झाली आहे.
9,284 ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर्स , 7033 ऑक्सिजन सिलिंडर्स ; 19 ऑक्सिजन निर्मिती संयंत्र ; 5,933 व्हेंटिलेटर / बीआय पीएपी; / 3.44 लाख रेमडेसिवीर कुप्या राज्य / केंद्रशासित प्रदेशांची क्षमता वाढवण्यासाठी वितरित / पाठवल्या आहेत
Posted On:
12 MAY 2021 3:58PM by PIB Mumbai
जागतिक समुदाय सद्भावनेने 27 एप्रिल 2021 पासून देणगी स्वरूपात तसेच कोविड -19 प्रतिबंधक वैद्यकीय सामुग्री आणि उपकरणांचा पुरवठा करून कोविड व्यवस्थापनातील आव्हानांना तोंड देण्यासाठी भारताला मदत करत आहे.
संपूर्णतः सरकार दृष्टीकोनाअंतर्गत सुव्यस्थित आणि पद्धतशीर यंत्रणेच्या माध्यमातून केंद्र सरकारची विविध मंत्रालये तसेच विभाग संयुक्त सहकार्यातून, कोविड विरुद्ध लढ्यात भारताच्या प्रयत्नांना बळ देण्यासाठी जगभरातून प्राप्त मदत सामग्रीचे अखंडितपणे वितरण करत आहेत.
27 एप्रिल 2021 ते 10 मे 2021 या काळात एकूण 9,284 ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर्स,7,033 ऑक्सिजन सिलेंडर्स, 19 ऑक्सिजन निर्मिती संयंत्रे, 5,933 व्हेन्टिलेटर्स/बीआय पीएपी; रेमडेसिवीर औषधाच्या सुमारे 3.44 लाख कुप्या यांचे रस्ते तसेच हवाई वाहतुकीच्या माध्यमातून वितरण झाले आहे किंवा ते सामान वितरणासाठी रवाना झाले आहे.
ब्रिटन, इजिप्त कुवेत आणि द. कोरियाकडून 11 मे 2021 रोजी प्राप्त झालेले मुख्य सामान :
ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर्स 30+50=80
ऑक्सिजन सिलिंडर : 300+1290=1590
व्हेन्टिलेटर्स/बीआय पीएपी / सीपीएपी 20
उपलब्ध सामानाचे परिणामकारक त्वरित वितरण आणि संबंधित राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना त्याचा अखंडित पुरवठा करण्याच्या संपूर्ण प्रक्रियेवर नियमितपणे देखरेख ठेवण्यासाठी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने एका समर्पित समन्वय गटाची स्थापना केली आली असून हा गट परदेशातून आलेल्या कोविड -19 मदत सामग्रीचे अनुदान, मदत आणि देणगी स्वरुपात स्वीकार आणि वितरण करण्याचे काम करत आहे. हा गट 26 एप्रिल 2021 पासून कार्यान्वित करण्यात आला असून आरोग्य मंत्रालयाने त्याची प्रमाणित कार्यान्वयन प्रक्रिया तयार करून 2 मे 2021 पासून ती लागू केली आहे.
Photo 1. आय.एन.एस. कोची वरून प्राप्त वैद्यकीय सामुग्रीमध्ये 60 मेट्रिक टन लिक्विड मेडिकल ऑक्सिजनचे 3 आयएसओ टॅंक , 800 ऑक्सिजन सिलिंडर आणि 2 उच्च-प्रवाह ऑक्सिजन कॉन्सेन्ट्रेटरचा समावेश असून ती काल न्यू मंगलोर बंदरातून विविध राज्यांना वितरणासाठी पाठवण्यात आली.
Photo 2. कुवेत इथून आयएनएस तबरवरून प्राप्त वैद्यकीय सामुग्रीत 40 मेट्रिक टन लिक्विड मेडिकल ऑक्सिजनचे 2 आयएसओ टॅंक ,600 ऑक्सिजन सिलिंडरचा समावेश असून ती काल न्यू मंगलोर बंदरातून विविध राज्यांना वितरणासाठी पाठवण्यात आली.
Photo 3. अमेरिकेतून काल रात्री रेमडेसीवीरच्या 78,595 कुप्या मुंबई विमानतळावर दाखल झाल्या. या कुप्या विविध राज्यात वितरित केल्या जात आहेत.
***
Jaydevi PS/S.Kane/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1717958)
Visitor Counter : 259