संरक्षण मंत्रालय

समुद्र सेतू 2 मोहीम-भारतीय नौदलाच्या आयएनएस तरकश या जहाजाने कतारहून आणला  वैद्यकीय ऑक्सिजनचा साठा

Posted On: 12 MAY 2021 6:50PM by PIB Mumbai

 

कोविड आपत्तीमध्ये सुरु असलेल्या मदतकार्याचा भाग म्हणून भारतीय नौदलाने सुरु केलेल्या  समुद्र सेतू 2’ या मोहिमेअंतर्गत, वैद्यकीय वापरासाठीचा प्रत्येकी 20 मेट्रिक टन द्रवरूप ऑक्सिजन भरलेले दोन क्रायोजेनिक कंटेनर्स आणि 230 ऑक्सिजन सिलेंडर्स आणणारे भारतीय नौदलाचे आय.एन.एस.तरकश हे जहाज, आज, 12 मे 2021 रोजी मुंबईत पोहोचले.

फ्रान्सच्या ऑक्सिजन एकता सेतू अभियानातून हे ऑक्सिजन कंटेनर्स देण्यात आले आहेत तर कतार मध्ये स्थायिक भारतीय समुदायाने भारताला भेट म्हणून ऑक्सिजन सिलेंडर्स पाठविले  आहेत.

आयएनएस तरकश जहाजावरून आलेला माल महाराष्ट्राच्या नागरी प्रशासनाकडे सोपविण्यात आला आहे.

 

  

***

M.Chopade/S.Chitnis/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1718078) Visitor Counter : 202