आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
कोविड मदत सामग्री बाबत ताजी माहिती
कोविड व्यवस्थापनासाठी प्राप्त जागतिक मदत सामुग्रीचे राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील संस्थांना केंद्र सरकारकडून व्यवहार्य आणि त्वरित वाटप
आतापर्यंत 9200 ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर्स, 5243 ऑक्सिजन सिलेंडर्स, 19 ऑक्सिजन निर्मिती संयंत्रे, 5913 व्हेन्टिलेटर्स/बीआय पीएपी; रेमडेसिवीर औषधाच्या सुमारे 3.44 लाख कुप्या यांचे वितरण झाले/ वितरणासाठी पाठवण्यात आल्या
Posted On:
11 MAY 2021 4:55PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 11 मे 2021
देशात कोरोना संसर्गातल्या अभूतपूर्व वाढीचा सामना करण्यासाठी सुरु असलेल्या प्रयत्नांमध्ये मदत करण्यासाठी जगभरातील विविध देश तसेच संस्थांकडून 27 एप्रिल 2021 पासून कोविड -19 आजारावरील उपचारात सहाय्यक ठरणाऱ्या वैद्यकीय सामुग्री आणि उपकरणे स्वरुपात भारताला आंतरराष्ट्रीय देणग्या आणि मदत प्राप्त होत आहे. संपूर्णतः सरकार दृष्टीकोनाअंतर्गत सुव्यस्थित आणि पद्धतशीर यंत्रणेच्या माध्यमातून केंद्र सरकारची विविध मंत्रालये तसेच विभाग संयुक्त सहकार्यातून, राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना देशात आलेल्या जागतिक मदत सामग्रीचे अखंडितपणे वितरण करत आहेत.
27 एप्रिल 2021 ते 10 मे 2021 या काळात एकूण 9200 ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर्स, 5243 ऑक्सिजन सिलेंडर्स, 19 ऑक्सिजन निर्मिती संयंत्रे, 5913 व्हेन्टिलेटर्स/बीआय पीएपी; रेमडेसिवीर औषधाच्या सुमारे 3.44 लाख कुप्या यांचे रस्ते तसेच हवाई वाहतुकीच्या माध्यमातून वितरण झाले आहे किंवा ते सामान वितरणासाठी रवाना झाले आहे.
युएई , इस्रायल, अमेरिका , नेदर्लंड्स कडून 10 मे 2021 रोजी प्राप्त झालेले मुख्य सामान :
व्हेन्टिलेटर्स/बीआय पीएपी / सी पॅप (610)
ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर्स (300)
फावीपिरावीर - 12600 स्ट्रिप्स (एका स्ट्रीपमध्ये 40 गोळ्या)
उपलब्ध सामानाचे परिणामकारक त्वरित वितरण आणि संबंधित राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना त्याचा अखंडित पुरवठा ही सतत सुरु असलेली प्रक्रिया असून केंद्रीय आरोग्य मंत्रालय व्यापकपणे या प्रक्रियेवर लक्ष ठेवून आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या अंतर्गत एका समर्पित समन्वय गटाची स्थापना करण्यात आली असून हा गट परदेशातून आलेल्या कोविड -19 मदत सामग्रीचे अनुदान, मदत आणि देणगी स्वरुपात स्वीकार आणि वितरण करण्याचे काम करत आहे. हा गट 26 एप्रिल 2021 पासून कार्यान्वित करण्यात आला असून आरोग्य मंत्रालयाने त्याची प्रमाणित कार्यान्वयन प्रक्रिया तयार करून 2 मे 2021 पासून ती लागू केली आहे.
फोटो1. ब्रिटनमधील ऑक्सिजन जनरेटर ज्याची क्षमता प्रति मिनिट 500 लिटर उत्पादन करण्याची आहे, तो काल रात्री दिल्लीहून आसामच्या चिरंग येथे रेल्वेने पाठवण्यात आला.
फोटो 2. कुवैतकडून मिळालेली वैद्यकीय मदत ज्यात 40 मेट्रिक टन लिक्विड ऑक्सिजन असलेले दोन आयएसओ ऑक्सिजन टँक्स, 200 ऑक्सिजन सिलिंडर्स आणि4 उच्च-प्रवाहित ऑक्सिजन कॉन्सेन्ट्रेटर आहेत, ती काल संध्याकाळी आयएनएस कोलकातावरून मंगलोर बंदरावर विविध राज्यांना वितरण करण्यासाठी आणण्यात आली
फोटो 3.- 3600 ऑक्सिजन सिलिंडर्सची सिंगापूरची वैद्यकीय मदत काल संध्याकाळी आयएनएस ऐरावतवरून विशाखापट्टनम बंदरावर, राज्यांना वितरणासाठी आणण्यात आली.
S.Tupe/S.Kane/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1717691)
Visitor Counter : 247
Read this release in:
English
,
Urdu
,
Hindi
,
Bengali
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam