आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय

केंद्र सरकार ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर्स, सिलेंडर्स, निर्मिती संयंत्र आणि 3.4 लाखांपेक्षा जास्त रेमडेसीवीरच्या कुप्याची जागतिक मदत राज्य सरकार/केंद्रशासित प्रदेशांना त्वरित पुरवत आहे


61 दिवसांनंतर प्रथमच गेल्या 24 तासात दैनंदिन नवीन रुग्णांपेक्षा बरे झालेल्या रुग्णांची संख्या अधिक

दोन महिन्यांनंतर प्रथमच उपचाराधीन रुग्णसंख्येत 30,016 ने घट

आतापर्यंत 18-44 वयोगटातील 25.5 लाखाहून अधिक लाभार्थ्यांचे लसीकरण

Posted On: 11 MAY 2021 11:40AM by PIB Mumbai

जगभरातून भारताला मदत म्हणून मिळालेल्या 8,900  ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर्स, 5043 ऑक्सिजन सिलिंडर्स,18 ऑक्सिजन निर्मिती संयंत्र, 5,698 व्हेंटिलेटर्स/बीआय  पीएपी आणि  3.4 लाखांपेक्षा जास्त रेमडेसीवीर कुप्याचा राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना त्वरित पुरवठा करण्यात आला आहे जेणेकरून कोविड विरुद्ध लढाईत त्यांना मदत होईल.  सीमाशुल्क विभागाकडून जलद मंजुरी  आणि हवाई आणि रस्ते वाहतुकीच्या माध्यमातून केंद्र सरकार राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना जागतिक स्तरावरची मदत जलद गतीने पुरवत आहे.

देशव्यापी लसीकरण मोहिमेच्या टप्पा -3 आणखी विस्तारण्यात आल्यामुळे देशभरात देण्यात आलेल्या कोविड 19 प्रतिबंधक लसींच्या मात्रांची एकूण संख्या आज 17.27  कोटीच्या पुढे गेली  आहे.

दोन महिन्यांनंतर (61 दिवस) पहिल्यांदाच गेल्या 24  तासांत उपचाराधीन रुग्णसंख्येत 30,016 ने  घट झाली आहे.


तसेच, 61 दिवसानंतर,प्रथमच  गेल्या 24 तासांत बरे झालेल्या रुग्णांची संख्या दैनंदिन नवीन रुग्णसंख्येपेक्षा जास्त आहे.

भारताची दररोजची नवीन रुग्णसंख्या  आणि बरे झालेल्या रुग्णांची संख्या पुढीलप्रमाणे  -

आज सकाळी 7 वाजेपर्यंत मिळालेल्या  अहवालानुसार एकूण  25,15,519  सत्रांद्वारे  एकूण 17,27,10,066  लसीच्या मात्रा देण्यात आल्या  आहेत.

यामध्ये 95,64,242 आरोग्य कर्मचारी (पहिली मात्रा),65,05,744 आरोग्य कर्मचारी (दुसरी मात्रा), 1,40,54,058 आघाडीवरील  कर्मचारी (पहिली मात्रा),    78,53,514  आघाडीवरील  कर्मचारी(दुसरी मात्रा),  18-44 वयोगटातील 25,59,339 (पहिली मात्रा ) 45 ते 60 वयोगटातल्या 5,55,10,630 (पहिली मात्रा), आणि 71,95,632 लाभार्थी (दुसरी मात्रा), 60 वर्षावरील 5,38,06,205 लाभार्थी (पहिली मात्रा), 1,56,60,702  (दुसरी मात्रा) यांचा समावेश आहे.

देशात आतापर्यंत देण्यात आलेल्या एकूण मात्रांपैकी  66.7 टक्के  मात्रा दहा राज्यात देण्यात आल्या आहेत.


लसीकरण मोहिमेचा  तिसरा टप्पा सुरु झाल्यापासून  30 राज्ये / केंद्रशासित प्रदेशांमध्ये गेल्या 24  तासात 18-44  वयोगटातील 5,24,731 लाभार्थ्यांना कोविड प्रतिबंधक लसीची पहिली मात्रा देण्यात आली . आतापर्यन्त  एकूण 25,59,339 लाभार्थ्यांना  पहिली मात्रा मिळाली आहे.  खालील तक्त्यात आत्तापर्यंत 18-44 वर्षे वयोगटातील लाभार्थ्यांना  देण्यात आलेल्या लसींच्या एकूण मात्रा  दाखवल्या आहेत-

गेल्या  24 तासात 25 लाखांहून अधिक लसींच्या मात्रा देण्यात आल्या.

लसीकरण अभियानाच्या 115 व्या दिवशी (10 मे  2021)  25,03,756  लसीच्या  मात्रा देण्यात आल्या.

10,75,948 लाभार्थींना 18,542 सत्रात पहिली मात्रा  आणि 14,27,808 लाभार्थींना लसीची दुसरी मात्रा  देण्यात आली.

देशात बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या 1,90,27,304 इतकी आहे. रुग्ण बरे होण्याचा राष्ट्रीय दर 82.75 टक्के आहे. गेल्या  24 तासात  3,56,082 रुग्ण बरे झाले आहेत.

बरे झालेल्या नवीन रुग्णांपैकी 72.28 %  दहा राज्यांमधील आहेत.


गेल्या 24 तासात 3,29,942  नव्या रुग्णांची नोंद झाली.

नव्या रुग्णांपैकी  69.88%  रुग्ण,  दहा राज्यांमध्ये आहेत.

कर्नाटकात 39,305 इतक्या  सर्वात जास्त  नव्या दैनंदिन रुग्णांची नोंद झाली. त्याखालोखाल महाराष्ट्रात 37,236  तर  तामिळनाडूमध्ये  28,978 नव्या रुग्णांची नोंद झाली


भारतात आज उपचाराधीन  रुग्णांची एकूण  संख्या  37,15,221 पर्यंत खाली घसरली आहे. ही देशातल्या एकूण पॉझीटीव्ह रुग्णांच्या 16.16 % आहे.

दोन महिन्यांनंतर (61 दिवस) प्रथमच गेल्या 24 तासांत   एकूण उपचाराधीन रुग्णसंख्येत 30,016  ने घट झाली आहे.

देशातल्या एकूण उपचाराधीन रुग्णसंख्येपैकी 82.68 टक्के  रुग्ण तेरा  राज्यांमध्ये आहेत.


खाली दर्शवल्याप्रमाणे देशातील एकूण सक्रिय रुग्णांपैकी 24.44%रुग्ण 10 जिल्ह्यात आहेत


राष्ट्रीय मृत्यू  दर सध्या 1.09  टक्के आहे.

गेल्या 24 तासात 3,876   रुग्णांचा मृत्यू झाला

यापैकी 73.09 टक्के  मृत्यू दहा राज्यातले  आहेत. कर्नाटकात सर्वाधिक 596 मृत्यू झाले असून महाराष्ट्रात 549 जणांचा मृत्यू झाला आहे.

 

***

SoanlT/SushmaK/CYadav

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1717631) Visitor Counter : 222