आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय

केंद्र सरकारला जागतिक समुदायाकडून मिळालेल्या कोविड 19 प्रतिबंधक मदत सामुग्रीचे राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना प्रभावी वितरण


राष्ट्रव्यापी लसीकरण मोहिमेच्या विस्तारामुळे भारताचे एकूण लसीकरण 16.49 कोटी पेक्षा अधिक

लसीकरण मोहिमेच्या टप्पा -3 अंतर्गत 18 ते 44 वयोगटातील 11.8 लाखाहून अधिक लाभार्थीचे लसीकरण

गेल्या 24 तासांत 3.31 लाखांपेक्षा जास्त रुग्ण बरे झाले

एकूण उपचाराधीन रुग्णांपैकी एक चतुर्थांश रुग्ण केवळ 10 राज्यांमध्ये एकवटले आहेत

Posted On: 07 MAY 2021 11:14AM by PIB Mumbai

कोविड 19 महामारीच्या दुसऱ्या लाटेत रुग्णसंख्येतील अभूतपूर्व वाढीची आव्हाने आणि गरजा पूर्ण करण्यासाठी भारताच्या  प्रयत्नांना मदत करण्यासाठी जागतिक समुदायाने मदतीचा हात पुढे केला आहे. भारत सरकारने  सुनिश्चित केले आहे की  राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना जागतिक मदत प्रभावीपणे आणि त्वरित वितरित केली जाईल. या महत्वपूर्ण  टप्प्यात राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या प्रयत्नांना बळ देण्यासाठी  विविध माध्ममे  आणि उपाययोजनांद्वारे सर्व मदत  आणि सहाय्य पुरवणे  हे उद्दिष्ट  आहे.
तर दुसरीकडे, देशव्यापी  लसीकरण मोहिमेच्या टप्पा  -3 मध्ये आणखी विस्तार होत असल्याने देशभरात देण्यात आलेल्या लसींच्या  मात्रांची  एकूण संख्या आज 16.49  कोटीच्या पुढे गेली आहे.
30 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये 18-44  वर्षे वयोगटातील 11,80,798 लाभार्थ्यांना कोविड प्रतिबंधक लसींची पहिली मात्रा देण्यात आली.  ही राज्ये आहेत- अंदमान आणि निकोबार बेटे  (330), आंध्र प्रदेश (16), आसाम  (220), बिहार (284)  छत्तीसगड (2), दिल्ली (1,83,679) , गोवा (741) , गुजरात (2,24,109)  हरियाणा (1,69,409),हिमाचल प्रदेश  (14), जम्मू-काश्मीर  (21,249 ),झारखंड (77) ,  कर्नाटक (7,068), केरळ (22), लडाख  (86),मध्य प्रदेश (9,823), महाराष्ट्र (2,15,274), मेघालय (2), नागालँड  (2)ओडिशा  (28,327), पुदुच्चेरी (1) पंजाब (2,187) , राजस्थान (2,18,795),  तामिळनाडू (8,419 ) , तेलंगण  (440), त्रिपुरा  (2), उत्तर प्रदेश  (86,420), उत्तराखंड (17) आणि प बंगाल  (2,757).
आज सकाळी 7 वाजेपर्यंत मिळालेल्या  अहवालानुसार एकूण  24,11,300  सत्रांद्वारे एकूण 16,49,73,058  लसीच्या मात्रा देण्यात आल्या  आहेत. यामध्ये 95,01,643 आरोग्य कर्मचारी (पहिली मात्रा),63,92,248 आरोग्य कर्मचारी (दुसरी मात्रा),  1,37,64,363 आघाडीवरील  कर्मचारी (पहिली मात्रा),  75,39,007 आघाडीवरील  कर्मचारी(दुसरी मात्रा),  18-44 वयोगटातील  11,80,798  (पहिली मात्रा ) , 60 वर्षावरील ,5,33,28,112  लाभार्थी (पहिली मात्रा), 1,35,91,594 (दुसरी मात्रा) आणि 45 ते 60 वयोगटातल्या  5,43,12,908   (पहिली मात्रा), आणि 53,62,385 लाभार्थी (दुसरी मात्रा) यांचा समावेश आहे.

देशात आतापर्यंत देण्यात आलेल्या एकूण मात्रांपैकी 66.84 टक्के  मात्रा दहा राज्यात देण्यात आल्या आहेत.

गेल्या 24 तासांत 23  लाखाहून अधिक लसींच्या मात्रा  देण्यात आल्या.

लसीकरण अभियानाच्या -111 व्या दिवशी ( 6 मे  2021) 23,70,298 लसीच्या  मात्रा देण्यात आल्या.

10,60,064   लाभार्थींना 18,938 सत्रात पहिली मात्रा  आणि  13,10,234  लाभार्थींना लसीची दुसरी मात्रा  देण्यात आली.

देशात बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या 1,76,12,351 इतकी आहे.

रुग्ण बरे होण्याचा राष्ट्रीय दर 81.95  टक्के आहे.

गेल्या 24 तासांत  3,31,507 रुग्ण बरे झाले

बरे झालेल्या नवीन रुग्णांपैकी 72.47 % रुग्ण   दहा राज्यांमधील आहेत.

गेल्या 24 तासात 4,14,188  नव्या रुग्णांची नोंद झाली.

नव्या रुग्णांपैकी 71.81  रुग्ण, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, दिल्ली, कर्नाटक, केरळ, बिहार,  प . बंगाल,  तामिळनाडू , आंध्र प्रदेश,आणि राजस्थान  या दहा राज्यांमध्ये आहेत.



महाराष्ट्रात सर्वात जास्त म्हणजे 62,194  नव्या दैनंदिन रुग्णांची नोंद झाली. त्याखालोखाल कर्नाटकात 49,058  तर  केरळमध्ये 42,464  नव्या रुग्णांची नोंद झाली

भारतात आज उपचाराधीन  रुग्णांची एकूण  संख्या 36,45,164  आहे. ही देशातल्या एकूण पॉझीटीव्ह रुग्णांच्या 16.96 % आहे.
देशातल्या एकूण उपचाराधीन रुग्णसंख्येपैकी 81.04 रुग्ण  बारा  राज्यांमध्ये आहेत.

देशातील एकूण उपचाराधीन रुग्णसंख्येत  दहा जिल्ह्यांचा वाटा  25 टक्के  आहे.
 

एकूण बाधित रुग्णांपैकी उपचाराधीन रुग्ण 16.96 टक्के आहेत तर बरे झालेले रुग्ण  81.95 टक्क्यांपेक्षा  जास्त आहे.

 

राष्ट्रीय मृत्यू दरात घट होत असून हा दर सध्या 1.09 टक्के आहे.
गेल्या 24 तासात 3,915  रुग्णांचा मृत्यू झाला
यापैकी  74.48 टक्के  मृत्यू दहा राज्यातले  आहेत. महाराष्ट्रात सर्वाधिक 853 जणांचा मृत्यू झाला, तर  उत्तर प्रदेशात  350  जणांचा मृत्यू झाला.


 

चार  राज्ये / केंद्र शासित प्रदेशात गेल्या 24 तासात कोविड -19 मुळे एकही मृत्यू झालेला नाही. यामध्ये  दमण आणि दीव आणि दादरा नगर हवेली,  अरुणाचल प्रदेश , लडाख आणि मिझोरम यांचा समावेश आहे.


***

ST/SC/DY

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1716743) Visitor Counter : 188