वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय
आंतरराष्ट्रीय व्यापार संबंधित मुद्द्यांसाठी डीजीएफटीद्वारे ‘कोविड -19 हेल्प डेस्क ’ चे कार्यान्वयन
Posted On:
26 APR 2021 11:58AM by PIB Mumbai
भारत सरकारचा वाणिज्य विभाग आणि परराष्ट्र व्यापार महासंचालनालय (डीजीएफटी) यांनी निर्यात आणि आयातीच्या स्थितीवर देखरेख करण्याचे तसेच ‘कोविड -19 च्या संसर्गामुळे निर्माण झालेल्या परीस्थितीत व्यापार्यांना भेडसावणाऱ्या अडचणींवर नजर ठेवण्याचे कार्य हाती घेतले आहे. आंतरराष्ट्रीय व्यापाराच्या संदर्भात उद्भवणार्या मुद्द्यांबाबत योग्य तोडगा काढण्यासाठी आणि मदत करण्यासाठी डीजीएफटीने त्यानुसार ‘कोविड -19 हेल्पडेस्क’ (सहाय्य मंच)कार्यान्वित केले आहे.
या 'कोविड -19 हेल्पडेस्क' द्वारे वाणिज्य विभाग / डीजीएफटी, आयात व निर्यात परवाना देण्यातील मुद्दे, सीमाशुल्क मंजुरीमधील विलंब आणि त्यावरील उद्भवलेल्या अडचणी, आयात / निर्यात दस्तऐवजीकरण प्रकरणे, बँकिंग प्रकरणे इत्यादी बाबींची दखल घेतली जाईल. केंद्र सरकार आणि राज्य सरकारांची इतर मंत्रालये / विभाग / एजन्सीशी संबंधित मुद्दे आणि त्यांचे सहाय्य घेण्यासाठी आणि शक्य तोडगा काढण्यासाठी या हेल्पडेस्क द्वारे समन्वय साधला जाईल.
***
UU/SP/CY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1714085)
Visitor Counter : 294