पंतप्रधान कार्यालय
पंडित राजन मिश्रा यांच्या निधनाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला शोक
प्रविष्टि तिथि:
25 APR 2021 9:19PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 25 एप्रिल 2021
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंडित राजन मिश्रा यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे.
पंडित राजन मिश्रा शास्त्रीय संगीताच्या दुनियेवर आपली अमिट छाप सोडून गेले, असे पंतप्रधानांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे. बनारस घराण्याच्या मिश्राजींचे जाण्याने कला आणि संगीतक्षेत्राची अपरिमित हानी झाली आहे. त्यांचे कुटुंबिय व चाहत्यांच्या दुःखात आपण सहभागी असल्याचे पंतप्रधानांनी म्हटले आहे.
Jaydevi PS/V.Sahjrao/P.Malandkar
(रिलीज़ आईडी: 1714002)
आगंतुक पटल : 274
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Assamese
,
Bengali
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam