आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय

भारतात देण्यात आलेल्या एकूण लसीकरण मात्रांची संख्या 13.23 कोटींहून जास्त


गेल्या 24 तासांत लसीच्या 22 लाखांहून जास्त मात्रा दिल्या गेल्या

भारताच्या एकूण कोविड सक्रीय रुग्णांपैकी 60% रुग्ण पाच राज्यांतील

गेल्या 24 तासांत 1.78 लाखांहून जास्त व्यक्ती कोविडमुक्त झाल्या

Posted On: 22 APR 2021 11:26AM by PIB Mumbai

जगातील सर्वात मोठ्या लसीकरण मोहिमेचा भाग असलेल्या भारताच्या  लसीकरण कार्यक्रमात आतापर्यंत देशातील 13 कोटी 23 लाखांहून जास्त व्यक्तींनी लस घेतली आहे. 

सुरुवातीपासूनची आकडेवारी लक्षात घेता, अंतरिम  अहवालानुसार, आज सकाळी 7 वाजेपर्यंत देशात, एकूण 19,28,118 सत्रांचे आयोजन करून कोविड लसीच्या 13,23,30,644 मात्रा देण्यात आल्या आहेत. यामध्ये लसीची पहिली मात्रा घेणारे 92,19,544 आरोग्य सेवा कर्मचारी तर  लसीची दुसरी मात्रा 58,52,071 आरोग्य सेवा कर्मचारी, 1,16,32,050 आघाडीवरील कर्मचारी (पहिली मात्रा), 59,36,530 आघाडीवरील कर्मचारी (दुसरी मात्रा), 60 वर्षांहून जास्त वयाचे 4,78,67,118लाभार्थी (पहिली मात्रा), 57,60,331 लाभार्थी (दुसरी मात्रा) तसेच 45 ते 60 वर्षे या वयोगटातील 4,44,28,884 लाभार्थी (पहिली मात्रा) आणि 16,34,116 लाभार्थी (दुसरी मात्रा) यांचा समावेश आहे.

 

HCWs

FLWs

Age Group 45 to 60 years

Over 60 years

 

Total

1st Dose

2nd Dose

1st Dose

2nd Dose

1st Dose

2nd Dose

1st Dose

2nd Dose

92,19,544

58,52,071

1,16,32,050

59,36,530

4,44,28,884

16,34,116

4,78,67,118

57,60,331

13,23,30,644

 

देशात आतापर्यंत दिल्या गेलेल्या लसीच्या एकूण मात्रांपैकी 59.25% मात्रा आठ राज्यांमध्ये दिल्या गेल्या आहेत.

गेल्या 24 तासांत कोविड प्रतिबंधक लसीच्या 22 लाखांहून जास्त मात्रा देण्यात आल्या.

लसीकरण मोहिमेच्या 96 व्या दिवशी, काल 21 एप्रिल 2021 रोजी कोविड प्रतिबंधक लसीच्या  22,11,334 मात्रा देण्यात आल्या. एकूण 35,499 लसीकरण सत्रांच्या आयोजनाद्वारे 15,01,704 लाभार्थ्यांना लसीची पहिली मात्रा तर 7,09,630 लाभार्थ्यांना दुसरी मात्रा देण्यात आली.

 

Date: 21st April,2021 (Day-96)

HCWs

FLWs

45 to 60 years

Over 60 years

Total Achievement

1stDose

2ndDose

1stDose

2nd Dose

1stDose

2nd Dose

1stDose

2nd Dose

1stDose

2ndDose

17,816

34,809

69,515

80,709

9,03,197

1,38,460

5,11,176

4,55,652

15,01,704

7,09,630

 

गेल्या 24 तासांत, 3,14,835 नव्या कोविड रुग्णांची नोंद झाली.

नव्याने नोंद झालेल्या एकूण रुग्णांपैकी 75.66% रुग्ण देशातील महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, दिल्ली, कर्नाटक, केरळ, छत्तीसगड, मध्य प्रदेश,बिहार, गुजरात  आणि राजस्थान या दहा राज्यांमधील आहेत

महाराष्ट्रात दैनंदिन पातळीवर सर्वात जास्त म्हणजे 67,468 नव्या रुग्णांची नोंद झाली. त्याखालोखाल उत्तर प्रदेशात एका दिवसात 33,106 आणि दिल्लीमध्ये 33,106 नवे रुग्ण सापडले.

 

खाली दर्शविल्याप्रमाणे, देशाच्या 12 राज्यांमध्ये प्रतिदिन सापडणाऱ्या नव्या रुग्णांच्या संख्येत तीव्र वाढ दिसून येत आहे.

 

खाली दिलेला आलेख, प्रतिदिन सक्रीय रुग्ण दर आणि एका दिवसात करण्यात येणाऱ्या चाचण्यांचे वाढते प्रमाण अधोरेखित करतो.

 

भारतातील एकूण कोविड सक्रीय रुग्णसंख्या 22,91,428 पर्यंत पोहोचली आहे. हे प्रमाण आता देशात आतापर्यंत सापडलेल्या एकूण रुग्णसंख्येच्या 14.38%  इतके झाले आहे. गेल्या 24 तासांत, देशातील एकूण सक्रीय रुग्णसंख्या  1,33,890 ने कमी झाली.

देशातील एकूण कोविड सक्रीय रुग्णांपैकी 59.99% रुग्ण महाराष्ट्र, छत्तीसगड, उत्तर प्रदेश, कर्नाटक आणि केरळ या पाच राज्यात आहेत.

 

 

भारतात आतापर्यंत कोविड मुक्त झालेल्यांची संख्या आजमितीला 1,34,54,880 इतकी आहे. राष्ट्रीय रोगमुक्ती दर 84.46%.आहे.

 गेल्या 24 तासांत 1,78,841 रुग्ण कोविड मुक्त झाले.

राष्ट्रीय कोविड मृत्यूदर सतत कमी होत आहे आणि सध्या तो 1.16% आहे.

गेल्या 24 तासांत, कोविडमुळे 2,104  रुग्णांचा मृत्यू झाला.

यापैकी 81.08% रुग्ण देशाच्या दहा राज्यांमधील आहेत. महाराष्ट्रात सर्वात जास्त म्हणजे 568 कोविड ग्रस्तांचा मृत्यू झाला, तर त्यापाठोपाठ दिल्ली मध्ये एका दिवसात 249  रुग्ण दगावले. 

 

 

देशातील लडाख (कें.प्र.), दीव-दमण आणि  दादरा-नगर हवेली, त्रिपुरा, सिक्कीम, मिझोरम, लक्षद्वीप,नागालँड, अंदमान निकोबार द्वीपसमूह आणि अरुणाचल प्रदेश या 9 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये गेल्या 24 तासांत कोविड संसर्गामुळे एकही  रुग्ण दगावल्याची नोंद झालेली नाही.

 

****

Jaydevi PS/SC/CY

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1713376) Visitor Counter : 320