आर्थिक व्यवहार विषयक मंत्रिमंडळ समिती

तालचेर फर्टिलायझर्स लिमिटेडमध्ये कोळसा गॅसिफिकेशनद्वारे उत्पादित युरियासाठी विशेष अनुदान धोरणाला केंद्रीय मंत्रिमंडळाची मान्यता

Posted On: 20 APR 2021 8:58PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 20 एप्रिल 2021

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या आर्थिक बाबीविषयक समितीने,  तालचेर फर्टिलायझर्स लिमिटेड, टीएफएल मध्ये कोळसा गॅसिफिकेशन द्वारे उत्पादित युरिया साठी विशेष अनुदान धोरण निर्माण करण्यासाठीच्या खत विभागाच्या प्रस्तावाला  मंजुरी दिली. 

 

उद्दिष्ट

धोरणात्मक उर्जा सुरक्षितता आणि देशाची युरिया स्वयंपूर्णता आणि देशातले विशाल कोळसा साठे लक्षात घेता कोळसा गॅसिफिकेशनवर आधारित तालचेर फर्टिलायझर्स लिमिटेडचे काम पुढे नेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हा प्रकल्प शेतकऱ्यांसाठी खत उपलब्धता वाढवणार असून त्यातून पूर्व भागाच्या विकासाला चालना मिळून देशाच्या पूर्व भागात युरिया पुरवण्यासाठीच्या वाहतूक अनुदानात बचत करणार आहे. यामुळे वार्षिक 12.7 एलएमटी युरियाची आयात कमी होणार असून परकीय चलनाचीही बचत होणार आहे. हा प्रकल्प मेक इन इंडिया आणि आत्म निर्भर भारत अभियानाला चालना देणार असून रस्ते, रेल्वे, पाणी यासारख्या पायाभूत सुविधांच्या विकासाला सहाय्य करणार असून देशाच्या पूर्व भागात अर्थव्यवस्थेला चालना  देण्याबरोबरच सहाय्यक उद्योगांना प्रोत्साहन देणार आहे. प्रकल्पाच्या आजुबाजुच्या परिसरात सहाय्यक उद्योगाच्या रुपात नव्या व्यापार संधीही यामुळे उपलब्ध होणार आहेत. 

कोळसा विपुल उपलब्ध असल्याने कोळसा गॅसिफिकेशन कारखाना धोरणात्मक दृष्ट्या महत्वाचा आहे. तालचेर प्रकल्प, युरिया उत्पादनासाठी नैसर्गिक वायू आयातीवरचे अवलंबित्व कमी करणार असून त्यामुळे एलएनजी आयात बिल कमी होणार आहे. तालचेर मध्ये गॅसिफिकेशन प्रक्रियेसाठी स्वच्छ कोळसा तंत्रज्ञान वापरले जाते. यामुळे एसओएक्स, एनओएक्स आणि इतर कणांचे उत्सर्जन, प्रत्यक्ष कोळसा वापरण्याच्या प्रक्रियेच्या  तुलनेत अतिशय कमी राहते.

 

पार्श्वभूमी

तालचेर फर्टिलायझर्स लिमिटेड (टीएफएल) चार सार्वजनिक उपक्रमांची,  राष्ट्रीय रसायन आणि खत (आरसीएफ), गेल (इंडिया) लिमिटेड (गेल), कोल इंडिया लिमिटेड (सीआयएल) आणि फर्टिलायझर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (एफसीआयएल) यांची  एक संयुक्त कंपनी आहे, 13 नोव्हेंबर 2015 ला या कंपनीची निर्मिती झाली.

टीएफएल, फर्टिलाइजर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (एफसीआयएल) चे   तत्कालीन तालचेर संयंत्र पुन्हा कार्यान्वित करत आहे. ज्यामध्ये आता 12.7 लाख मेट्रिक टन वार्षिक (एलएमटीपीए)  स्थापित क्षमतेने  ग्रीनफील्ड यूरिया कारखाना स्थापित करण्यात येत आहे. टीएफएल यूरिया योजनेचा  अंदाजित खर्च 13277.21 कोटी  (+/- 10 टक्के) आहे.

 

* * *

S.Thakur/N.Chitale/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1713052) Visitor Counter : 202