आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
भारतातील एकूण लसीकरण 11.72 कोटींहून अधिक, गेल्या 24 तासांत 27 लाख लसींच्या मात्रा देण्यात आल्या
देशभरात 26 कोटींपेक्षा जास्त चाचण्या करण्यात आल्या.
79% नव्या रूग्णांची नोंद 10 राज्यांत
Posted On:
16 APR 2021 10:39AM by PIB Mumbai
जगातील सर्वात विशाल लसीकरण मोहिमेचा भाग असलेल्या लसीकरण मोहिमेद्वारे, देशभरात कोविड -19 च्या एकूण 11.72 कोटी लसींच्या मात्रा देण्याचा टप्पा आज ओलांडण्यात आला.
आज सकाळी 7 वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या तात्पुरत्या अहवालानुसार, एकूण 17,37,539 सत्रांद्वारे 11,72,23,509 लसींच्या एकत्रित मात्रा देण्यात आल्या.यापैकी 90,82,999 आरोग्य कर्मचाऱ्यांनी (HCW) लसीची पहिली मात्रा घेतली, 56,34,634 आरोग्य कर्मचाऱ्यांनी(HCW) लसीची दुसरी मात्रा घेतली, 1,02,93,524, आघाडीच्या कर्मचाऱ्यांनी (FLW) लसीची पहिली मात्रा घेतली,51,52,891आघाडीच्या कर्मचाऱ्यांनी (FLW) लसीची दुसरी मात्रा घेतली, तर वयाची 60 वर्षे पूर्ण केलेल्या 4,42,30,842 लाभार्थ्यांना लसीची पहिली मात्रा 30,97,961 लाभार्थ्यांना (लसीची दुसरी मात्रा), तसेच 45 ते 60 वर्षे वयोगटातील 3,87,41,890 लाभार्थ्यांना (लसीची पहिली मात्रा) तर 9,88,768 लाभार्थ्यांना (लसीची दुसरी मात्रा)लस देण्यात आली.
देशभरात आतापर्यंत दिलेल्या डोसांपैकी 59.63% डोस आठ राज्यांत दिले गेले आहेत.
गेल्या 24 तासांत एकूण 27 लाख लसींच्या मात्रा देण्यात आल्या.
काल, (दिनांक 15 एप्रिल 2021) लसीकरणाच्या 90 व्या दिवशी एकूण 27,30,359 लसींच्या मात्रा देण्यात आल्या. त्यात 39,280,सत्रांतून 21,70,144, लाभार्थ्यांना लसीची पहिली मात्रा देण्यात आली तर 5,60,215 लाभार्थ्यांना दुसरी मात्रा देण्यात आली.
देशभरात एकूण 26 कोटींपेक्षा जास्त चाचण्या करण्यात आल्या आणि पाॅझिटीव्हीटीचा सरासरी दर 5.42% इतका आहे.
भारतातील दैनंदिन, नवीन रुग्णसंख्येत भर पडत आहे. गेल्या 24 तासांत 2,17,353 नव्या रुग्णांची नोंद झाली.
महाराष्ट्र, उत्तरप्रदेश, दिल्ली, छत्तीसगड, कर्नाटक, मध्यप्रदेश,गुजरात,केरळ, तामिळनाडू आणि पश्चिम बंगाल या दहा राज्यांतील दैनंदिन कोविड बाधित रुग्णसंख्येत वाढ होताना दिसत आहे. एकूण बाधित रुग्णांपैकी 79.10% नवे रूग्ण या 10 राज्यांत आहेत.
महाराष्ट्राच्या दैनंदिन बाधित रुग्णांत, सर्वाधिक 61,695 नव्या रुग्णांची नोंद झाली. त्याखालोखाल उत्तरप्रदेशमधे 22,339 तर दिल्लीत 16,699 नव्या रूग्णांची नोंद झाली.
खालील आलेख सोळा राज्यांतील रुग्णसंख्येचा वाढत जाणारा कल दर्शवित आहे.
भारतातील सक्रीय बाधित रूग्णसंख्या आता 15,69,743 वर पोचली आहे. ही संख्या देशातील एकूण बाधित रुग्णांच्या 10.98% इतकी आहे. गेल्या 24 तासांत, बाधित रूग्णसंख्येत 97,866 सक्रीय रुग्णांची भर पडल्याची नोंद झाली आहे
महाराष्ट्र, छत्तीसगड, उत्तर प्रदेश, कर्नाटक आणि केरळ या पाच राज्यांत भारतातील एकूण सक्रीय रुग्णांपैकी 65.86% सक्रीय रुग्ण आहेत. देशातील एकूण सक्रीय रुग्णांपैकी 39.60% रूग्ण केवळ महाराष्ट्रात आहे.
भारतातील बरे झालेल्या रूग्णांची एकूण संख्या 1,25,47,866 इतकी आहे. देशाचा बरे होण्याचा राष्ट्रीय सरासरी दर 87.80% इतका आहे.
गेल्या 24 तासांत 1,18,302 रुग्ण बरे झाल्याची नोंद झाली आहे.
गेल्या 24 तासांत 1,185 मृत्यूंची नोंद झाली.
मृत्यु झालेल्यांपैकी 85.40% मृत्यु दहा राज्यांत झाले आहेत.महाराष्ट्रात सर्वाधिक (349)मृत्यूंची नोंद झाली. त्याखालोखाल छत्तीसगडमध्ये 135 मृत्यूंची नोंद झाली.
दहा राज्ये/केंद्रशाषित प्रदेशांत, गेल्या 24 तासांत कोविड-19 मुळे एकाही म्रुत्यूची नोंद झाली नाही. यात लडाख(कें.प्र)त्रिपुरा, मेघालय, सिक्कीम, नागालँड, मिझोराम,मणीपूर,लक्षद्वीप,अंदमान आणि निकोबार बेटे आणि अरुणाचल प्रदेश यांचा समावेश आहे.
***
UU/SP/DY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1712218)
Visitor Counter : 1354
Read this release in:
English
,
Urdu
,
Hindi
,
Assamese
,
Bengali
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Malayalam