आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय

लसीकरण उत्सवाच्या चौथ्या दिवशी भारताचे एकूण लसीकरण 11 कोटीच्या पुढे गेले, गेल्या 24 तासांत 26 लाखांहून अधिक मात्रा देण्यात आल्या


गेल्या 24 तासांत 14 लाख चाचण्यांसह आतापर्यन्त एकूण 26 कोटीहून अधिक चाचण्या घेण्यात आल्या

नवीन रुग्णांपैकी 82% रुग्ण 10 राज्यांमधील आहेत

Posted On: 14 APR 2021 11:40AM by PIB Mumbai

लस उत्सवाच्या चौथ्या दिवशी देशभरात देण्यात आलेल्या कोविड प्रतिबंधक लसींच्या एकूण मात्रांची संख्या आज 11 कोटीच्या पुढे गेली आहे.

आज सकाळी 7 वाजेपर्यंत मिळालेल्या अहवालानुसार आतापर्यन्त 16,53,488 सत्रांद्वारे एकूण 11,11,79,578 लसीच्या मात्रा देण्यात आल्या आहेत.

एकूण लसीकरण लाभार्थ्यांमध्ये 90,48,686 एचसीडब्ल्यू (पहिला डोस), 55,81,072 एचसीडब्ल्यू (दुसरा डोस), 1,01,36,430 एफएलडब्ल्यू (पहिला डोस) आणि 50,10,773 एफएलडब्ल्यू (दुसरा डोस),,60 वर्षांपेक्षा अधिक वयाचे पहिली मात्रा घेतलेले 4,24,66,354 लाभार्थी 24,67,484 दुसरी मात्रा घेतलेले लाभार्थी तर 45 ते 60 वर्षे वयोगटातील 3,56,50,444(1 ली मात्रा ) आणि 8,18,335(2 री मात्रा ) आहेत.

देशात आतापर्यंत देण्यात आलेल्या एकूण मात्रांपैकी 60.16% मात्रा आठ राज्यांमध्ये देण्यात आल्या आहेत.

गेल्या 24 तासांत लसीकरणाअंतर्गत 40 लाखांहून अधिक मात्रा देण्यात आल्या.

लसीकरण मोहिमेच्या (दि. 13 एप्रिल 2021) 88 व्या दिवसापर्यंत 26,46,528 लसीच्या मात्रा देण्यात आल्या आहेत. त्यापैकी 22,58,910 लाभार्थ्यांना 44,643 सत्रांद्वारे पहिली मात्रा देण्यात आली आणि 3,87,618 लाभार्थ्यांना लसीची दुसरी मात्रा देण्यात आली.

कोविडवर नियंत्रण मिळवण्यासाठी देशात सुरु असलेल्या प्रयत्नांमध्ये आज आणखी एक महत्त्वाचा टप्पा गाठण्यात आला. देशात एकूण 26 कोटी चाचण्या करण्यात आल्या आहेत. अचूक आकडा 26,06,18,866 इतका आहे. गेल्या 24 तासात 14,11,758 चाचण्या घेण्यात आल्या आहेत. चाचणी क्षमता दररोज 15 लाख चाचण्यापर्यंत वाढवण्यात आली आहे.

भारतात दररोज नवीन रुग्णांची संख्या वाढतच आहे. गेल्या 24 तासांत 1,84,372 नवीन रुग्ण आढळले.

महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, छत्तीसगड,दिल्ली,मध्य प्रदेश, कर्नाटक, केरळ , तामिळनाडू, गुजरात आणि राजस्थान या आठ राज्यांत कोविडच्या दैनंदिन नवीन रुग्णसंख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. नवीन रुग्णांपैकी 82.04 टक्के रुग्ण या 8 राज्यांमधील आहेत.

महाराष्ट्रात काल दिवसभरात सर्वाधिक 60,212 रुग्ण आढळले. त्याखालोखाल उत्तर प्रदेशात 17,963 तर छत्तीसगडमध्ये 15,121 नवे रुग्ण आढळले आहेत.

सोळा राज्यांमध्ये दैनंदिन नवीन रुग्णसंख्येत वाढ होताना दिसून येत आहे.

भारताची एकूण सक्रिय रुग्णसंख्या 13,65,704 वर पोहोचली आहे. ती आता देशातील एकूण बाधित रुग्णसंख्येच्या 9.84 टक्के आहे. गेल्या 24 तासांत एकूण सक्रिय रुग्णसंख्येतून 1,01,006 रुग्णांची वाढ झाली आहे.

महाराष्ट्र, छत्तीसगड, उत्तर प्रदेश, कर्नाटक आणि केरळ या पाच राज्यांमध्ये भारताच्या एकूण सक्रिय रुग्णांपैकी 68.16% रुग्ण आहेत. देशातील एकूण सक्रिय रुग्णांपैकी एकट्या महाराष्ट्रात 43.54% रुग्ण आहेत .

आज भारतात बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या 1,23,36,036 आहे. रुग्ण बरे होण्याचा राष्ट्रीय दर 88.92% आहे.

गेल्या 24 तासांत 82,339 रुग्ण बरे झाले आहेत.

खाली दिलेला आलेख गेल्या वर्षभरात भारताच्या सक्रिय आणि बरे झालेल्या रुग्णांचा कल दाखवतो.

गेल्या 24 तासांत 1,027 मृत्यूची नोंद झाली.

नवीन मृत्यूंमध्ये 86.08 टक्के मृत्यू दहा राज्यांमधील आहेत. महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक 281 मृत्यूची नोंद झाली . छत्तीसगडमध्ये 156 मृत्यू झाले आहेत.

अकरा राज्ये / केंद्रशासित प्रदेशांनी गेल्या 24 तासांत एकही कोविड 19 मृत्यूची नोंद केलेली नाही. ही राज्ये आहेत- लडाख (केंद्रशासित प्रदेश ), दमण आणि दीव आणि दादरा नगर हवेली, त्रिपुरा, मेघालय , सिक्कीम, नागालँड , मिझोरम, मणिपूर , लक्षद्वीप , अंदमान आणि निकोबार बेटे आणि , अरुणाचल प्रदेश

***

JPS/Sushama K/DY

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1711749) Visitor Counter : 204