पंतप्रधान कार्यालय

8 एप्रिल 2021 रोजी श्री गुरु तेग बहादुर जी यांच्या 400 व्या जयंती (प्रकाश पर्व )निमित्त पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समितीची बैठक

Posted On: 07 APR 2021 10:59AM by PIB Mumbai

श्री गुरु तेग बहादुर जी यांच्या 400 व्या जयंती (प्रकाश पर्व ) निमित्त  8 एप्रिल 2021 रोजी सकाळी 11 वाजता  पंतप्रधान  नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समितीची  व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक होणार आहे.  केंद्रीय गृहमंत्री  अमित शहा हेही या बैठकीला उपस्थित राहतील. या विशेष कार्यक्रमाच्या निमित्ताने आयोजित वर्षभरातील विविध  कार्यक्रमांबाबत  या बैठकीत चर्चा होईल.

 

उच्च स्तरीय समितीबाबत

श्री गुरु तेग बहादुर जी यांच्या 400 व्या जयंतीशी संबंधित धोरणे, योजना आणि कार्यक्रमांना मंजुरी देण्यासाठी  केंद्र सरकारने 24 ऑक्टोबर  2020 रोजी उच्च स्तरीय समिती स्थापन केली होती. पंतप्रधान या समितीचे अध्यक्ष असून या समितीत 70 सदस्य आहेत. 

***

MC/SK/CY

***

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com(Release ID: 1710048) Visitor Counter : 188