पंतप्रधान कार्यालय
जगातील सर्वाधिक उंचीच्या रेल्वे पुलावरील कमानीचे बांधकाम पूर्णत्वाला नेल्याबद्दल पंतप्रधानांकडून गौरवोद्गार
Posted On:
05 APR 2021 9:27PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 5 एप्रिल 2021
जम्मू कश्मीरमध्ये भारतीय रेल्वेकडून उभारल्या जात असलेल्या जगातील सर्वाधिक उंचीच्या चिनाब पुलावरील कमानीचे बांधकाम यशस्वीपणे पूर्णत्वाला नेल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कौतुकोद्गार काढले आहेत.
“आपल्या देशबांधवांची सक्षमता आणि विश्वास यांनी जगाला उदाहरण घालून दिले आहे”, असे मोदी यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे. “या बांधकामातील यशस्वीतेचे उदाहरण फक्त आधुनिक अभियांत्रिकी व तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातील भारताच्या भीमपराक्रमाचेच उदाहरण नाही तर “संकल्प से सिद्धि” या नीतीने घडवलेल्या बदलत्या कार्यसंस्कृतीचेही उदाहरण आहे.” असे त्यांनी ट्विटर संदेशात नमूद केले आहे.
* * *
M.Chopade/V.Sahajrao/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1709737)
Visitor Counter : 300
Read this release in:
English
,
Urdu
,
Hindi
,
Manipuri
,
Bengali
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam