आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय

लसीकरण मोहिमेने देशभरात लसीच्या 7.5 कोटी मात्रा देऊन महत्वाचा टप्पा ओलांडला.

Posted On: 04 APR 2021 11:19AM by PIB Mumbai

तात्पुरत्या अहवालानुसार , आज सकाळी 7 वाजेपर्यंत देशभरात कोविड 19 प्रतिबंधक लसीच्या एकूण 7,59,79,651 मात्रा  (11,99,125 सत्रांच्या माध्यमातून )  देण्यात आल्या.

लसीकरणाच्या  एकूण आकडेवारीनुसार  , सुमारे 6.5 कोटी (6,57,39,470) जणांना लसीची पहिली मात्रा देण्यात आली. तर दुसरी मात्रा देण्यात आलेल्यांचा  1 कोटींचा टप्पा (1,02,40,181) पार झाला आहे.

खालील  आलेख,  राज्यांमधील पहिली आणि दुसरी मात्रा वितरण दर्शवितो. एकट्या महाराष्ट्राने  65,59,094 जणांना पहिली मात्रा आणि 7,95,150 जणांना लसीची दुसरी मात्रा दिली आहे.

गेल्या 24 तासात , दैनंदिन 93,249 नवीन कोविड रुग्णांची नोंद झाली. महाराष्ट्रात सर्वाधिक 49,447 दैनंदिन नवे कोविड रुग्ण नोंदले गेले. त्या पाठोपाठ छत्तीसगढमध्ये 5,818  तर  कर्नाटकात 4,373 नवीन रुग्ण आढळले.

भारतात आजपर्यंत एकूण 1,16,29,289 रुग्ण उपचारानंतर कोविडमधून बरे झाले आहेत. रुग्ण बरे होण्याचा राष्ट्रीय दर 93.14%. आहे.

गेल्या 24 तासात बरे झालेल्या 60,048 जणांची नोंद झाली.  

गेल्या 24 तासात , 513  कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला. महाराष्ट्रात सर्वाधिक (277).मृत्यू झाले. 

***

MC/Sonal Chavan/CY

***

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com

 



(Release ID: 1709467) Visitor Counter : 247