पंतप्रधान कार्यालय
एक्झाम वॉरीयर्सच्या अद्ययावत आवृत्तीची पंतप्रधानांनी केली घोषणा
परीक्षा देणाऱ्या आपल्या युवा विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी सहाय्य करूया- पंतप्रधान
प्रविष्टि तिथि:
29 MAR 2021 7:05PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 29 मार्च 2021
एक्झाम वॉरीयर्सच्या अद्ययावत आवृत्तीची आनंदाने घोषणा करत असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे.
विद्यार्थी, पालक आणि शिक्षक यांच्याकडून आलेल्या मौल्यवान माहितीच्या समावेशाने एक्झाम वॉरीयर्सची नवी आवृत्ती समृद्ध झाली असल्याचे पंतप्रधान म्हणाले.
नवा जोडण्यात आलेला भाग विशेषतः पालक आणि शिक्षक यांच्या दृष्टीने मोलाचा असल्याचे ते म्हणाले.
‘आपले युवा परीक्षा देत असल्याने त्यांना मदत करूया’ असे पंतप्रधानांनी म्हटले आहे.
विद्यार्थ्यांच्या परीक्षांचा काळ सुरु झाला आहे, #ExamWarriors ची अद्ययावत आवृत्ती आता उपलब्ध आहे हे जाहीर करताना आपल्याला आनंद झाल्याचे पंतप्रधानांनी ट्वीट संदेशांच्या मालिकेत म्हटले आहे.
या पुस्तकात नवे मंत्र आणि अनेक मनोरंजक बाबींचाही समावेश आहे. परीक्षेआधी तणावमुक्त असण्याची आवश्यकता या पुस्तकात अधोरेखित करण्यात आली आहे.
कोणतेही दडपण न घेता परीक्षेची तयारी खेळीमेळीने कशी करावी ?
घरी बसून परीक्षेची तयारी करताना आपण काही मनोरंजक करू शकतो का ?
यावर उपाय आहे... नमो ॲपवरचे #ExamWarrios चे नवे मोड्यूल. विद्यार्थी आणि शिक्षक यांच्यासाठी अनेक संवादात्मक बाबी यामध्ये आहेत.
एक्झाम वॉरीयर्सची नवी आवृत्ती,विद्यार्थी, पालक आणि शिक्षक यांच्याकडून आलेल्या मौल्यवान माहितीच्या समावेशाने समृद्ध आहे.
नव्याने जोडण्यात आलेला भाग विशेषतः पालक आणि शिक्षक यांच्या दृष्टीने मोलाचा आहे.
परीक्षा देणाऱ्या आपल्या युवकांना मदत करूया! असे पंतप्रधानांनी म्हटले आहे.
* * *
M.Chopade/N.Chitale/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 1708323)
आगंतुक पटल : 335
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
Punjabi
,
Assamese
,
Tamil
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Bengali
,
Manipuri
,
Gujarati
,
Odia
,
Telugu
,
Kannada
,
Kannada
,
Malayalam