पंतप्रधान कार्यालय
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष म्हणून जो बायडन यांनी कार्यभार सांभाळल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केले त्यांचे अभिनंदन
Posted On:
20 JAN 2021 10:42PM by PIB Mumbai
अमेरिकेचे नवे अध्यक्ष म्हणून जो बायडन यांनी कार्यभार सांभाळल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.
“जो बायडन यांनी राष्ट्राध्यक्षपदाचा कार्यभार स्वीकारल्याबद्दल हार्दिक अभिनंदन! त्यांच्या कार्यकाळात, भारत-अमेरिकेदरम्यानचे संबंध अधिक दृढ करण्यासाठी काम करण्यास मी उत्सुक आहे.
अमेरिकेचे नेतृत्व करण्याचा त्यांचा कार्यकाळ यशस्वी होवो,यासाठी माझ्या अनेक शुभेच्छा ! भारत आणि अमेरीकेसमोरील अनेक सामाईक आव्हानांचा सामना करण्यासाठी तसेच, जगातिक शांतता आणि सुरक्षिततेसाठी आम्ही एकत्रित व परस्पर सामंजस्याने काम करत राहू.
भारत-अमेरिकेतील भागीदारी सामाईक मुल्यांवर आधारलेली आहे. आमचा एक भक्कम आणि बहुआयामी सामाईक अजेंडा असून, वाढत्या आर्थिक भागीदारी तसेच लोकांमधील परस्पर संबधांतील वृद्धीमुळे दोन्ही देशांचे सबंध अधिक दृढ झाले आहेत. ही भागीदारी आणखी नव्या उंचीवर घेऊन जाण्याच्या दृष्टीने राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांच्यासोबत काम करण्यास आम्ही कटिबद्ध आहोत.”
Jaydevi PS/RI/CY
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1707740)
Visitor Counter : 165
Read this release in:
English
,
Urdu
,
Hindi
,
Bengali
,
Manipuri
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam