आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
देशातील महाराष्ट्र, पंजाब, कर्नाटक,गुजरात आणि तामिळनाडू या पाच राज्यांमध्ये सक्रीय कोविड रुग्णांच्या संख्येत वाढ कायम
जगातील सर्वात मोठ्या लसीकरण मोहिमेत, आतापर्यंत लसीचे 3 कोटी 50 लाखांहून जास्त डोस दिले गेले
कालच्या एका दिवसात 21 लाखांहून अधिक डोस देण्यात आले
Posted On:
17 MAR 2021 10:42AM by PIB Mumbai
महाराष्ट्र, पंजाब, कर्नाटक,गुजरात आणि तामिळनाडू या पाच राज्यांमध्ये नोंदल्या जाणाऱ्या नव्या कोविड रुग्णांच्या संख्येत प्रतिदिन मोठी वाढ होण्याचा कल कायम आहे. गेल्या 24 तासांत देशभरात नोंदल्या गेलेल्या नव्या 28,903 कोविड रुग्णांपैकी 71.10% रुग्ण या पाच राज्यांमध्ये एकवटलेले आहेत.
नव्या रुग्णांपैकी 83.91% रुग्ण महाराष्ट्र, पंजाब, कर्नाटक,गुजरात, तामिळनाडू आणि केरळ या राज्यांतील आहेत.
देशभरात नव्या प्रतिदिन नोंदल्या गेलेल्या रुग्णांपैकी एकट्या महाराष्ट्रात 61.8% म्हणजे 17,864 रुग्ण आहेत. त्याखालोखाल केरळ मध्ये 1,970 आणि पंजाबमध्ये 1,463 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे.
खाली दर्शविल्याप्रमाणे, देशातील आठ राज्यांमध्ये दैनंदिन पातळीवर नोंदल्या जाणाऱ्या नव्या कोविड रुग्णांच्या संख्येचा आलेख सतत चढता राहिला आहे.
आतापर्यंतच्या देशभरातील एकूण कोविड रुग्णांच्या संख्येच्या 2.05% म्हणजे 2 लाख 34 हजार 406 सक्रीय कोविड रुग्ण सध्या देशात आहेत
देशभरातील एकूण कोविड सक्रीय रुग्णांपैकी 76.4% रुग्ण महाराष्ट्र, केरळ आणि पंजाबमध्ये आहेत. यातील एकट्या महाराष्ट्र राज्याचा वाटा सुमारे 60% आहे.
आज सकाळी सात वाजेपर्यंत, 5,86,855 सत्रांच्या आयोजनातून साडेतीन कोटींहून अधिक कोविड विरोधी लसीचे 3,50,64,536 डोस देण्यात आले आहेत.
यामध्ये 75,06,155 आरोग्य कर्मचारी (पहिला डोस), 45,54,855 आरोग्य कर्मचारी (दुसरा डोस), 76,00,030 पहिल्या फळीतील कर्मचारी (पहिला डोस), आणि 16,47,644 पहिल्या फळीतील कर्मचारी (दुसरा डोस) यांच्यासह 45 वर्षांपेक्षा अधिक वय आणि विशिष्ट सहव्याधी असणारे 21,66,408 लाभार्थी (पहिला डोस) आणि 60 वर्षांहून अधिक वय असणारे 15,89,444 लाभार्थी यांचा समावेश आहे.
HCWs
|
FLWs
|
45 to <60 years with Co-morbidities
|
Over 60 years
|
Total
|
1st Dose
|
2nd Dose
|
1st Dose
|
2nd Dose
|
1st Dose
|
1st Dose
|
75,06,155
|
45,54,855
|
76,00,030
|
16,47,644
|
21,66,408
|
1,15,89,444
|
3,50,64,536
|
लसीकरण मोहिमेच्या 60 व्या दिवशी म्हणजे 16 मार्च 2021 रोजी लसीचे 21 लाखांहून जास्त (21,17,104) डोस देण्यात आले. यापैकी 17,82,553 लाभार्थ्यांना (आरोग्य कर्मचारी आणि पहिल्या फळीतील कर्मचारी) 30,871 सत्रांमध्ये लसीचा पहिला डोस देण्यात आला तर 3,34,551 आरोग्य कर्मचारी आणि पहिल्या फळीतील कर्मचाऱ्यांनी लसीचा दुसरा डोस घेतला.
Date: 16th March, 2021
|
HCWs
|
FLWs
|
45to<60 years with Co-morbidities
|
Over 60years
|
Total Achievement
|
1stDose
|
2ndDose
|
1stDose
|
2nd Dose
|
1stDose
|
1stDose
|
1stDose
|
2ndDose
|
|
59,172
|
96,239
|
1,25,624
|
2,38,312
|
2,77,681
|
13,20,076
|
17,82,553
|
3,34,551
|
|
भारतात आतापर्यंत एकूण कोविड मुक्त झालेल्यांची संख्या आज रोजी 1,10,45,284 आहे. राष्ट्रीय रोगमुक्तता दर 96.56% आहे.
गेल्या 24 तासांत 188 कोविड रुग्णांचा मृत्यू झाला.
यापैकी 86.7% मृत्यू देशाच्या सहा राज्यांमध्ये झाले आहेत. महाराष्ट्रात सर्वाधिक 87 कोविड रुग्णांचा मृत्यू झाला तर पंजाबमध्ये 38 आणि केरळमध्ये 15 रुग्ण मरण पावले.
देशातील आसाम, आंध्रप्रदेश, ओदिशा, उत्तराखंड, लक्षद्वीप, सिक्कीम, मेघालय, दीव-दमण आणि दादरा-नगर हवेली, नागालँड, त्रिपुरा, लडाख (कें.प्र.) मणिपूर, मिझोरम, अंदमान निकोबार द्वीपसमूह आणि अरुणाचल प्रदेश या 15 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये गेल्या 24 तासांत एकाही कोविड रुग्णाच्या मृत्यूची नोंद नाही.
****
UU/SC/DY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1705407)
Visitor Counter : 273
Read this release in:
English
,
Urdu
,
Hindi
,
Assamese
,
Bengali
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Malayalam