आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय

जगातील सर्वात मोठ्या लसीकरण मोहिमेअंतर्गत , भारतात लसीच्या जवळपास 3 कोटी मात्रा देण्यात आल्या.


गेल्या 24 तासात 15 लाखांहून अधिक मात्रा दिल्या.

महाराष्ट्र, केरळ, पंजाब, कर्नाटक, गुजरात, तामिळनाडू आणि मध्य प्रदेशात दैनंदिन रुग्णसंख्येत मोठी वाढ

Posted On: 14 MAR 2021 11:36AM by PIB Mumbai

भारतात जगातील सर्वात मोठी  लसीकरण मोहिम राबविली जात आहे . देशात आतापर्यंत जवळपास 3 कोटी लसीकरण  मात्रा देण्यात आल्या . प्राप्त अंतरिम अहवालानुसार , आज सकाळी 7 वाजेपर्यंत, 5,10,400 सत्रांच्या माध्यमातून लसीच्या 2,97,38,409 मात्रा देण्यात आल्या.

यात 73,47,895 आरोग्य कर्मचारी  ( पहिली मात्रा ) , 42,95,201 आरोग्य कर्मचारी  ( दुसरी मात्रा ), आघाडीवर काम करणारे 73,32,641 कर्मचारी

(पहिली मात्रा ) आणि 11,35,573 आघाडीवर काम करणारे कर्मचारी  ( दुसरी मात्रा ) ,  विशेष सहव्याधी असलेले  45 वर्षांपेक्षा जास्त वयाचे 14,40,092  लाभार्थी   ( पहिली मात्रा ) आणि 60 वर्षांवरील 81,87,007 ( पहिली मात्रा ) लाभार्थ्यांचा समावेश आहे.

लसीकरण मोहिमेच्या 57  व्या दिवशी  (13 मार्च ,2021),लसीच्या 15 लाखांहून अधिक (15,19,952)  मात्रा देण्यात आल्या. यापैकी 24,086 सत्रांच्या माध्यमातून 12,32,131  लाभार्थ्यांना पहिली मात्रा ( आरोग्य आणि आघाडीवर राहून  काम करणारे कर्मचारी ) आणि  2,87,821 आरोग्य आणि आघाडीवर राहून  काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना लसीची दुसरी मात्रा देण्यात आली.

दैनंदिन दिल्या जाणाऱ्या लसीच्या मात्रांमध्ये सातत्याने वाढ दिसून येत आहे.

 

काही राज्यांमध्ये दैनंदिन कोविड रुग्णांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ दिसून येत आहे. गेल्या 24 तासात नोंदविण्यात आलेल्या (25,320) नवीन रुग्णांपैकी महाराष्ट्र, केरळ, पंजाब, कर्नाटक, गुजरात, तामिळनाडू आणि मध्य प्रदेश या राज्यांमध्ये  87.73% रुग्णांची नोंद झाली.

महाराष्ट्रात 15,602 इतक्या सर्वाधिक दैनंदिन रुग्णसंख्येची नोंद झाली. त्यापाठोपाठ केरळमध्ये 2,035 तर पंजाबमध्ये 1,510 नवीन रुग्णांची नोंद झाली.

 

आठ राज्ये दैनंदिन रुग्णसंख्येत वाढीचा आलेख दर्शवित आहेत.

 

भारतात आज एकूण सक्रिय रुग्णसंख्या  2.10 लाख  (2,10,544) आहे.

भारतातील एकूण सक्रिय रुग्णांपैकी महाराष्ट्र, केरळ आणि पंजाबमध्ये 76.93% रुग्ण आहेत .

 

 या राज्यातील पहिले पाच शीर्ष जिल्हे खालील आलेखात दर्शविण्यात आले आहेत .

 

भारतात आतापर्यंत एकूण  1,09,89,897 रुग्ण  उपचारानंतर बरे झाले आहेत. कोविड मधून बरे होण्याचा  राष्ट्रीय दर 96.75%.आहे .

गेल्या 24 तासात एकूण 16,637 जण उपचारानंतर बरे झाले. बरे झालेले  83.13%  रुग्ण  6 राज्यांमध्ये केंद्रित असल्याचे दिसून आले.

महाराष्ट्रात   एका दिवसात  7,467 बरे झालेल्या रुग्णांसह  एका दिवसात बरे झालेल्यांची सर्वाधिक नोंद झाली.

गेल्या 24 तासात 161 मृत्यूंची नोंद झाली.

एकूण मृत्यूंपैकी सहा राज्यांमध्ये  84.47% मृत्यू नोंदविण्यात आले. महाराष्ट्रात सर्वाधिक (88)., त्यानंतर पंजाबमध्ये 22 दैनंदिन मृत्यू झाले . केरळमध्ये 12

मृत्यू नोंदविण्यात आले.

गेल्या 24 तासात चौदा राज्ये / केंद्रशासित प्रदेशांमध्ये एकाही कोविड 19 मृत्यूची नोंद नाही.  यात राजस्थान, झारखंड, पुदुचेरी, लक्षद्वीप, मेघालय, दीव दमन आणि दादरा आणि नगर हवेली, नागालँड, त्रिपुरा, सिक्कीम, लडाख (केंद्रशासित प्रदेश ), मणिपूर, मिझोरम, अंदमान आणि निकोबार बेटे  आणि अरुणाचल प्रदेश यांचा समावेश आहे.

***

Jaydevi PS/SC/CY

***

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1704700) Visitor Counter : 288