आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय

महाराष्ट्र, केरळ, पंजाब, कर्नाटक, गुजरात आणि तामिळनाडू येथे दैनंदिन सर्वाधिक नवीन रुग्णांची नोंद कायम


सर्वात मोठ्या लसीकरण मोहिमेअंतर्गत एकूण 2.56 कोटी लसीकरणाचा टप्पा ओलांडला.

गेल्या 24 तासात 13 लाखांहून अधिक कोविड 19 प्रतिबंधक लसीच्या मात्रा दिल्या

Posted On: 11 MAR 2021 11:02AM by PIB Mumbai

महाराष्ट्रकेरळपंजाबकर्नाटकगुजरात आणि तामिळनाडूमध्ये दैनंदिन कोविड सक्रिय नवीन रुग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ कायम असून गेल्या 24 तासांत नोंदविण्यात आलेल्या  एकूण नवीन रुग्णांपैकी  85.91% रुग्ण या राज्यातील आहेत.

 गेल्या 24  तासात 22,854 नवीन रुग्णांची नोंद झाली.

 महाराष्ट्रात 13,659 इतक्या सर्वाधिक दैनंदिन रुग्णांची नोंद झाली ( दैनंदिन रुग्णसंख्येच्या सुमारे 60%) त्यापाठोपाठ केरळमध्ये 2,475 तर पंजाबमध्ये 1,393 नवीन दैनंदिन रुग्णांची नोंद

आठ राज्ये दैनंदिन रुग्णसंख्येत वाढीचा आलेख दर्शवित आहेत.

 

 भारतातील एकूण सक्रिय रुग्णसंख्या आज  1,89,226  पोहोचली. भारताचा सध्याचा सक्रिय रुग्णसंख्येचा दर एकूण रुग्णसंख्येच्या  1.68% आहे.

 खालील आलेख गेल्या 24 तासातील राज्यातील सक्रिय रुग्णसंख्येतील बदल दर्शवितो . केरळमध्ये सक्रिय रुग्णांमध्ये सर्वाधिक घट झाली आहे. तर गेल्या 24 तासात महाराष्ट्रात सक्रिय रुग्णांमध्ये सर्वाधिक वाढ दिसून आली.

  

प्राप्त तात्पुरत्या अहवालानुसार आज सकाळी 7 वाजेपर्यंत,  4,78,168 सत्रांच्या माध्यमातून 2.56 कोटींहून अधिक (2,56,85,011) लसीच्या मात्रा देण्यात आल्या.

यात 71,97,100 आरोग्य कर्मचारी  ( पहिली मात्रा ) , 40,13,249 आरोग्य कर्मचारी  ( दुसरी मात्रा ) आघाडीवर काम करणारे  70,54,659  कर्मचारी  ( पहिली मात्रा ) आणि 6,37,281 आघाडीवर काम करणारे कर्मचारी  ( दुसरी मात्रा ) विशेष सहव्याधी असलेले  45 वर्षांपेक्षा जास्त वयाचे  9,67,058 लाभार्थी   ( पहिली मात्रा )  आणि 60 वर्षांवरील 58,15,664 ( पहिली मात्रा ) लाभार्थ्यांचा समावेश आहे.

 लसीकरण मोहिमेच्या 54  व्या दिवशी  (10, मार्च , 2021) ,लसीच्या एकूण  13,17,357  मात्रा देण्यात आल्या . 20,299 सत्रांच्या माध्यमातून ,  एकूण  लाभार्थ्यांपैकी 10,30,243 लाभार्थ्यांना पहिली मात्रा ( आरोग्य आणि आघाडीवर राहून  काम करणारे कर्मचारी ) आणि 2,87,114  आरोग्य आणि आघाडीवर राहून  काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना लसीची दुसरी मात्रा देण्यात आली.

 गेल्या 24 तासात 126 मृत्यूंची नोंद झाली.

  

नव्याने नोंदविण्यात आलेले 82.54% एकूण मृत्यू सहा राज्यातील आहेत. गेल्या  24 तासात महाराष्ट्रात सर्वाधिक (54) मृत्यूंची नोंद झाली.  त्यानंतर पंजाबमध्ये 17 आणि केरळमध्ये 14 मृत्यूची नोंद झाली.

 गेल्या 24 तासात एकोणीस  राज्ये / केंद्रशासित प्रदेशात एकही कोविड 19 मृत्यूची नोंद झाली नाही

यात गुजरातराजस्थानउत्तर प्रदेशआसामओडिशागोवाझारखंडपुदुचेरीलक्षद्वीपसिक्किमलडाख (केंद्रशासित प्रदेश )मणिपूरदीव दमन आणि दादरा आणि नगर हवेली मेघालयमिझोरमनागालँडत्रिपुरा,अंदमान आणि निकोबार बेटे आणि अरुणाचल प्रदेश यांचा समावेश  आहे

***

JPS/SC/DY

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1704092) Visitor Counter : 267