आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
कोविड -19 प्रतिबंधक लसीकरणाचा आणखी एक टप्पा भारताने केला पार
गेल्या 24 तासात लसीच्या 20 लाखापेक्षा जास्त मात्रा लाभार्थींना देण्यात आल्या
एकूण लसीकरणाचा 2.3 कोटीचा टप्पा पार
Posted On:
09 MAR 2021 11:27AM by PIB Mumbai
भारतात 16 जानेवारी 2021 पासून सुरु झालेल्या देशव्यापी कोविड -19 प्रतिबंधक लसीकरण मोहिमेत भारताने लक्षणीय कामगिरी नोंदवली आहे. गेल्या 24 तासात लसीच्या 20 लाखापेक्षा जास्त मात्रा लाभार्थींना देण्यात आल्या आहेत.
लसीकरण अभियानाच्या 52 व्या दिवशी (8 मार्च 2021) ला 20,19,723 लसीकरण मात्रा देण्यात आल्या. यामध्ये 17,15,380 लाभार्थींना 28,884 सत्रात पहिली मात्रा ( आरोग्य कर्मचारी आणि फ्रंट लाईन कर्मचारी ) आणि 3,04,343 आरोग्य कर्मचारी आणि फ्रंट लाईन कर्मचाऱ्यांना या लसीची दुसरी मात्रा देण्यात आली.
आज सकाळी 7 वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या अहवालानुसार 2.3 कोटी पेक्षा जास्त म्हणजे (2,30,08,733) लसीच्या मात्रा 4,05,517 सत्रा द्वारे देण्यात आल्या.
यामध्ये 70,75,010 आरोग्य कर्मचारी ( पहिली मात्रा ), 37,39,478 आरोग्य कर्मचारी (दुसरी मात्रा ), 67,92,319 फ्रंट लाईन कर्मचारी ( पहिली मात्रा ), 3,25,972 फ्रंट लाईन कर्मचारी(दुसरी मात्रा ), 7,01,809 जण 45 पेक्षा जास्त वय असलेल्या आणि सहव्याधी असलेले ( पहिली मात्रा ), आणि 60 वर्षावरील 43,74,145 लाभार्थीचा समावेश आहे.
महाराष्ट्र, केरळ, पंजाब, तामिळनाडू, गुजरात आणि कर्नाटक या राज्यात कोविडच्या दैनंदिन रुग्ण संख्येत वाढ सुरूच आहे. गेल्या 24 तासात नोंद झालेल्या नव्या रुग्णांपैकी 84.04%. रुग्ण या सहा राज्यांमधले आहेत.
गेल्या 24 तासात 15,388 नव्या रुग्णांची नोंद झाली. महाराष्ट्रात सर्वात जास्त म्हणजे 8,744 नव्या रुग्णांची नोंद झाली. त्यानंतर केरळ 1,412,तर पंजाबमध्ये 1,229 रुग्णांची नोंद झाली.
नव्या रुग्ण संख्येत आठ राज्यांचा आलेख चढता आहे.
भारतातली एकूण सक्रीय रुग्ण संख्या आज 1,87,462 आहे. सध्याची सक्रीय रुग्ण संख्या ही भारताच्या एकूण पॉझीटीव्ह रुग्णांच्या 1.67% आहे.
खालील आलेख हा गेल्या 24 तासातल्या नव्या रुग्ण संख्येची स्थिती दर्शवते. चार राज्ये- अरुणाचल प्रदेश, नागालँड, सिक्किम आणि त्रिपुरा यामध्ये कोविड-19 चा एकही नवा रुग्ण नाही, तर महाराष्ट्र, पंजाब आणि केरळ या 3 राज्यात गेल्या 24 तासात 1000 पेक्षा जास्त नवे रुग्ण आढळले आहेत.
****
JPS/NC/CY
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1703437)
Visitor Counter : 228