पंतप्रधान कार्यालय
भारत-स्वीडन दूरस्थ परिषद
Posted On:
05 MAR 2021 9:40PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 5 मार्च 2021
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि स्वीडनचे पंतप्रधान स्टीफन लॉफवेन यांनी आज दूरस्थ पद्धतीने झालेल्या परिषदेत द्विपक्षीय बाबी तसेच क्षेत्रीय आणि उभय देशांशी संबंधित इतर बाबींवर चर्चा केली.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी तीन मार्च रोजीच्या हिंसक घटनेत सापडलेल्या स्वीडनच्या नागरिकांप्रति सहानुभूती व्यक्त केली तसेच या घटनेत जखमी झालेल्यांच्या प्रकृतीत सुधारणा व्हावी यासाठी प्रार्थना केली.
पहिल्या भारत नॉर्डिक परिषदेसाठी 2018 मध्ये स्वीडनला दिलेल्या भेटीची तसेच स्वीडनचे राजे व राणी यांनी डिसेंबर 2019 मध्ये भारताला दिलेल्या भेटीची पंतप्रधान मोदींनी यावेळी आठवण काढली.
भारत आणि स्वीडन या दोन्ही देशांमधील वर्षानुवर्षे असलेल्या जवळचे नाते हे लोकशाही मूल्ये, कायदा, विविधता, एकात्मता, उच्चारस्वातंत्र्य आणि मानवी मूल्यांचा आदर या सामायिक गोष्टींवर आधारित आहे असे दोन्ही नेत्यांनी या वेळी अधोरेखित केले. बहुपक्षीयता, नियमाधारित आंतरराष्ट्रीय सीमा, दहशतवादाशी लढा तसेच शांतता आणि सुरक्षितता यासंदर्भात पूर्णपणे कटीबद्ध असल्याची खात्री त्यांनी परस्परांना दिली. युरोपीय युनियनमध्ये व युरोपियन देशांमध्ये भारताची भागीदारी ठळकपणे वाढत असल्याची नोंदही दोघा नेत्यांनी घेतली.
दोन्ही नेत्यांनी या वेळी भारत आणि स्वीडनमधील सध्याच्या संबंधांचा आढावा घेतला आणि पंतप्रधान मोदींच्या 2018 मधील स्वीडन भेटीत सहमती झालेल्या संयुक्त कृती योजना तसेच संयुक्त संशोधन भागीदारी यांच्या अंमलबजावणीवर समाधान व्यक्त केले. ही भागीदारी पुढे नेत त्याआधारे राबवता येण्याजोग्या विविध संभावित योजनांवर त्यांनी चर्चा केली.
आंतरराष्ट्रीय सौर करारात (ISA) सहभागी होण्याच्या स्वीडनच्या निर्णयाचे पंतप्रधान मोदी यांनी स्वागत केले. भारत स्वीडन संयुक्त पुढाकाराने सप्टेंबर 2019 मध्ये न्यूयार्कमध्ये झालेल्या संयुक्त राष्ट्रांच्या हवामान कृती परिषदेत आकाराला आलेल्या ‘औद्योगिक परिवर्तनासाठी नेतृत्व गटा’चे (LeadIT) सदस्य वाढत असल्याची नोंद यावेळी दोन्ही नेत्यांनी घेतली.
कोविड-19 संदर्भातील परिस्थिती तसेच लसीकरण मोहीम याबद्दल दोन्ही नेत्यांनी यावेळी चर्चा केली तसेच किफायतशीर लसींचा तातडीचा पर्याय उपलब्ध होण्यासाठी सर्व देशांमध्ये लसीसंदर्भात नि:पक्षपातीपणा जागवण्यावर भर दिला.
* * *
S.Tupe/V.Sahajrao/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1702791)
Visitor Counter : 215
Read this release in:
English
,
Urdu
,
Hindi
,
Manipuri
,
Bengali
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam