नागरी उड्डाण मंत्रालय
28 फेब्रुवारी 2021 ला 3,13,668 प्रवाशांनी देशांतर्गत हवाई प्रवास केला
देशांतर्गत विमानसेवा 25 मे 2020 ला पुन्हा सुरु झाल्यापासून आतापर्यंतचा हा प्रवासीसंख्येचा उच्चांक
Posted On:
01 MAR 2021 2:04PM by PIB Mumbai
केंद्रीय नागरी उड्डयन मंत्री (स्वतंत्र प्रभार) हरदीप सिंग पुरी यांनी सांगितले की 28 फेब्रुवारी 2021 ला 2,353 हवाई उड्डाणांच्या माध्यमातून देशांतर्गत प्रवास करणाऱ्यांची संख्या 3,13,668 पर्यंत पोहोचली. देशांतर्गत विमानसेवा 25 मे 2020 ला पुन्हा सुरु झाल्यापासून आतापर्यंतचा हा प्रवासीसंख्येचा उच्चांक आहे असेही ते पुढे म्हणाले.
विमानसेवेचा पुनःप्रारंभ झाल्यापासून 28 फेब्रुवारी 2021 पर्यंत एकूण 4699 हवाई उड्डाणे झाली आहेत. तर या उड्डाणांच्या माध्यमातून 6,17,824 व्यक्तींनी विमान प्रवास केला.
कोविड-19 महामारीच्या आपत्तीमुळे 24 मार्च 2020 च्या मध्यरात्रीपासून देशांतर्गत विमानसेवा स्थगित करण्यात आली होती. दोन महिन्यांच्या कालावधीनंतर 25 मे 2020 रोजी ही सेवा पुन्हा सुरु करण्यात आली.
***
M.Chopade/S.Chitnis/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1701668)
Visitor Counter : 196