गृह मंत्रालय

केंद्रीय गृहमंत्रालयाकडून देखरेख आणि प्रतिबंध आणि सावधगिरीसाठी लागू असलेल्या मार्गदर्शक नियमांना मुदतवाढ आणि राज्ये/केंद्रशासित प्रदेशांना विविध व्यवहारांसंदर्भातील एसओपीजचे कठोर पालन करण्याचा आणि सावधगिरी बाळगण्याचा आणि बारीक लक्ष ठेवण्याचा इशारा

प्रविष्टि तिथि: 26 FEB 2021 6:05PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 26 फेब्रुवारी 2021

 

केंद्रीय गृहमंत्रालयाने आज एक आदेश जारी करून देखरेख, प्रतिबंध आणि खबरदारीसाठी सध्या लागू असलेल्या मार्गदर्शक नियमांची मुदत 31.3.2021 पर्यंत वाढवली आहे.

उपचार सुरू असलेल्या आणि नव्या कोविड-19 रुग्णांच्या संख्येत लक्षणीय घट होत असली तरी या महामारीचे समूळ उच्चाटन करण्यासाठी देखरेख, प्रतिबंध आणि सावधगिरी कायम राखण्याची गरज आहे.

लक्ष्य निर्धारित गटांमध्ये असलेल्या लोकसंख्येचे लसीकरण करण्याचा वेग वाढवण्याचा सल्ला देखील राज्ये/ केंद्रशासित प्रदेशांना देण्यात आला आहे जेणेकरून संक्रमणाची साखळी तोडता येईल आणि या महामारीवर मात करता येईल.

त्यानुसार प्रतिबंधित विभागाच्या सीमा काळजीपूर्वक निश्चित करणे, या विभागांमध्ये प्रतिबंधक उपाययोजनांचे कठोर पालन करणे, कोविड प्रतिबंधासाठी आवश्यक असलेल्या योग्य वर्तनाला प्रोत्साहन देणे आणि त्याची कठोर अंमलबजावणी करणे आणि परवानगी दिलेल्या विविध व्यवहारांसदर्भात आखून दिलेल्या मानक कार्य पद्धतींचे काटेकोर पालन सुरू राहील.

म्हणूनच 27.1.2021 रोजी जारी केलेल्या मार्गदर्शक नियमांमध्ये नमूद करण्यात आलेल्या देखरेख, प्रतिबंध आणि मार्गदर्शक तत्वे/मानक कार्यपद्धतींचे कठोर पालन याबाबत पूर्णपणे लक्ष केंद्रित करून राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांनी अतिशय कठोरपणे त्यांची अंमलबजावणी केली पाहिजे.

 

S.Tupe/S.Patil/P.Malandkar

 

 

 

 

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(रिलीज़ आईडी: 1701151) आगंतुक पटल : 276
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी , Bengali , Punjabi , Gujarati , Odia , Tamil , Telugu , Kannada , Malayalam