पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधान 26 फेब्रुवारी रोजी तामिळनाडू डॉ. एम. जी. आर. वैद्यकीय विद्यापीठाच्या 33 व्या दीक्षांत समारंभाला संबोधित करणार
Posted On:
24 FEB 2021 9:25PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 24 फेब्रुवारी 2021
पंतप्रधान नरेंद्र मोदी 26 फेब्रुवारी 2021 रोजी सकाळी 11 वाजता तामिळनाडू डॉ. एम. जी. आर. वैद्यकीय विद्यापीठाच्या 33 व्या दीक्षांत समारंभाला व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे संबोधित करतील. दीक्षांत समारंभात एकूण 17591 उमेदवारांना पदवी आणि पदविका प्रदान केली जाईल. यावेळी तामिळनाडूचे राज्यपालदेखील उपस्थित राहणार आहेत.
विद्यापिठाविषयी
तामिळनाडूचे माजी मुख्यमंत्री डॉ. एम.जी. रामचंद्रन यांच्या नावावरून या विद्यापीठाचे नाव ठेवण्यात आले. या विद्यापीठामध्ये औषधी, दंतचिकित्सा, औषधनिर्माण विज्ञान (फार्मसी), शुश्रूषा (नर्सिंग), आयुष, फिजिओथेरपी, ऑक्युपेशनल थेरेपी आणि आरोग्य विज्ञान यासारख्या विषयांचा समावेश असलेल्या एकूण 686 संलग्न संस्था आहेत. संपूर्ण तामिळनाडू राज्यात या संस्था असून यामध्ये 41 वैद्यकीय महाविद्यालये, 19 दंत महाविद्यालये, 48 आयुष महाविद्यालये, 199 नर्सिंग महाविद्यालये, 81 फार्मसी महाविद्यालये आणि इतर डॉक्टरल पश्चात वैद्यकीय आणि / किंवा संबंधित आरोग्य संस्था आहेत.
S.Patil/S.Mhatre/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1700610)
Visitor Counter : 163
Read this release in:
Odia
,
Assamese
,
English
,
Urdu
,
Hindi
,
Bengali
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam