आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय

राज्ये / केंद्रशासित प्रदेशांकडून मिशन इंद्रधनुष (आयएमआय) 3.0 चा शुभारंभ


कोविड-19 साथीच्या काळात लसीकरण न झालेल्या मुले आणि गर्भवती महिला शोधून त्यांना लस दिली जाईल

पहिल्याच दिवशी 29,000 हून अधिक मुले आणि 5000 गर्भवती महिलांना दिली लस

Posted On: 23 FEB 2021 6:35PM by PIB Mumbai

 

नियमित लसीकरण कार्यक्रमापासून वांछित राहिलेली मुले आणि गर्भवती महिलांपर्यंत पोहोचण्याचे उद्दिष्ट समोर ठेवून अनेक राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांनी तीव्र मिशन इंद्रधनुष (आयएमआय) 3.0 राबविण्यास सुरुवात केली आहे. मिशन मोडमध्ये हस्तक्षेपाच्या माध्यमातून मुले आणि गर्भवती महिलांच्या संपूर्ण लसीकरणाला गती देण्याचे उद्दीष्ट आहे. पहिला टप्पा 22 फेब्रुवारी 2021 पासून 15 दिवसांसाठी सुरू करण्यात आला आहे.

केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री डॉ. हर्ष वर्धन यांनी 19 फेब्रुवारी, 2021 रोजी या मोहिमेची सुरूवात केली आणि राज्य आणि जिल्ह्यातील अधिकाऱ्यांनी प्रत्येक मुलाचे लसीकरण करण्याचे आणि संपूर्ण लसीकरणाचे उद्दिष्ट प्राप्त करण्याचे आवाहन केले.

 

Vaccination in Kamrup district in brick kiln

Vaccination in Jorhat district

 

15 दिवस चालणाऱ्या या मोहिमेच्या (नियमित लसीकरण आणि सुट्टी वगळता) लसीकरणाच्या दोन फेऱ्या निश्चित केल्या आहेत. देशातील 29 राज्ये / केंद्रशासित प्रदेशातील आधीच ठरविलेल्या 250 जिल्हा / शहरी भागात ही मोहीम राबविली जात आहे. कोविड-19 दरम्यान लसी पासून वंचित राहिलेले स्थलांतरित कामगार आणि दुर्गम भागातील लाभार्थ्यांपर्यंत पोहोचण्याचे  लक्ष्य ठेवण्यात आले आहे. आयएमआय 3.0 साठी जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार कमी जोखीमिचे 313 जिल्हे  , 152 मध्यम जोखीम आणि 250 उच्च-जोखीम अशी जिल्ह्यांची  विभागणी करण्यात आली आहे.

लसीकरण कार्यक्रमा दरम्यान कोविड प्रतिबंधक नियमांचे (सीएबी) पालन करण्यावर भर देण्यात आला आहे.

आयएमआय 3.0 च्या पहिल्या फेरी दरम्यान कोविड-19 साथीच्या काळात लसीकरण न झालेल्या मुले आणि गर्भवती महिलांना लस दिली जाईल. 22 फेब्रुवारी 2021 पर्यंत संध्याकाळी 6 वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या आकडेवारीनुसार अंदाजे 29,000 हून अधिक मुले आणि 5000 गर्भवती महिलांना लस दिली आहे (तात्पुरती आकडेवारी).  

 

Jaydevi PS/S.Mhatre/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1700250) Visitor Counter : 384