आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय

भारताने ओलांडला एक महत्त्वाचा टप्पा - 1 कोटीहून अधिक लाभार्थ्यांचे कोविड -19 प्रतिबंधक लसीकरण


गेल्या 24 तासात 16 राज्ये/केंद्रशासित प्रदेशात कोविड -19 मुळे दगावल्याची नवीन नोंद नाही

Posted On: 19 FEB 2021 4:25PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 19 फेब्रुवारी 2021

 

जागतिक महामारीविरूद्धच्या लढ्यात भारताने महत्त्वपूर्ण टप्पा पार केला आहे. 19 फेब्रुवारी, 2021 रोजी सकाळी 8:00 वाजेपर्यंत, देशातील 1 कोटीहून अधिक आरोग्यसेवा आणि आघाडीच्या कर्मचाऱ्यांचे कोविड 19 प्रतिबंधक लसीकरण करण्यात आले.

https://static.pib.gov.in/WriteReadData/userfiles/image/image001QGGE.jpg

भारताने 34 दिवसात 1 कोटी लसीकरण करत सर्वात जलद लसीकरण करणाऱ्या देशांमध्ये जगात दुसऱ्या क्रमांकाची महत्त्वपूर्ण कामगिरी केली आहे.

 

S.

No.

 

State/UT

Beneficiaries vaccinated

1st Dose

2nd Dose

Total Doses

1

A & N Islands

4,347

495

4,842

2

Andhra Pradesh

3,86,770

51,996

4,38,766

3

Arunachal Pradesh

18,359

2,941

21,300

4

Assam

1,38,795

7,953

1,46,748

5

Bihar

5,06,688

33,419

5,40,107

6

Chandigarh

11,381

423

11,804

7

Chhattisgarh

3,21,706

14,425

3,36,131

8

Dadra & Nagar Haveli

4,493

114

4,607

9

Daman & Diu

1,640

94

1,734

10

Delhi

2,49,791

11,188

2,60,979

11

Goa

13,862

356

14,218

12

Gujarat

8,11,152

28,047

8,39,199

13

Haryana

2,03,766

16,500

2,20,266

14

Himachal Pradesh

90,908

68,031

1,58,939

15

Jammu & Kashmir

1,77,795

3,756

1,81,551

16

Jharkhand

2,38,852

8,595

2,47,447

17

Karnataka

5,19,158

63,533

5,82,691

18

Kerala

3,86,901

23,948

4,10,849

19

Ladakh

4,436

290

4,726

20

Lakshadweep

1,809

115

1,924

21

Madhya Pradesh

6,11,640

0

6,11,640

22

Maharashtra

8,14,682

24,884

8,39,566

23

Manipur

35,834

901

36,735

24

Meghalaya

21,674

607

22,281

25

Mizoram

13,731

1,384

15,115

26

Nagaland

18,398

2,661

21,059

27

Odisha

4,29,212

53,401

4,82,613

28

Puducherry

7,661

454

8,115

29

Punjab

1,16,199

5,575

1,21,774

30

Rajasthan

7,47,420

15,493

7,62,913

31

Sikkim

10,143

357

10,500

32

Tamil Nadu

3,09,692

20,125

3,29,817

33

Telangana

2,79,832

73,281

3,53,113

34

Tripura

79,030

6,766

85,796

35

Uttar Pradesh

10,52,431

18,464

10,70,895

36

Uttarakhand

1,26,454

4,246

1,30,700

37

West Bengal

5,83,613

23,922

6,07,535

38

Miscellaneous

2,26,853

22,159

2,49,012

 

Total

95,77,108

6,10,899

1,01,88,007

 

आज सकाळी 8 वाजेपर्यंतच्या अस्थायी अहवालानुसार 2,11,462 सत्राद्वारे 1,01,88,007 लाभार्थ्यांचे लसीकरण करण्यात आले आहे. यात 62,60,242 आरोग्य सेवा कर्मचाऱ्यांना (पहिला डोस), 6,10,899 आरोग्य सेवा कर्मचाऱ्यांना (दुसरा डोस) आणि 33,16,866 आघाडीच्या कर्मचाऱ्यांना (पहिला डोस) समाविष्ट आहे.

ज्या लाभार्थ्यांनी पहिला डोस घेतल्यानंतर 28 दिवस पूर्ण केले आहेत त्यांना कोविड 19 प्रतिबंधक लसीकरणाचा दुसरा डोस देण्याची सुरुवात 13 फेब्रुवारी, 2021 रोजी झाली. आघाडीच्या कर्मचाऱ्यांच्या लसीकरणाची सुरुवात 2 फेब्रुवारी, 2021 रोजी झाली.

लसीकरण मोहिमेच्या 34 व्या दिवसापर्यंत (दि. 18 फेब्रुवारी, 2021) 10,812 सत्रांमध्ये एकूण 6,58,674 लाभार्थ्यांचे लसीकरण करण्यात आले. त्यापैकी 4,16,942 लाभार्थ्यांना पहिला डोस (एचसीडब्ल्यू आणि एफएलडब्ल्यू) देण्यात आला आणि 2,41,732 आरोग्य सेवा कर्मचाऱ्यांना लसीचा दुसरा डोस मिळाला.

देशात लसीकरण मोहिमेत दिवसेंदिवस चढता आलेख पाहायला मिळत आहे.

भारतात लसीकरण झालेल्या एकूण लाभार्थीपैकी 8 राज्यातील 57.47% लाभार्थी आहेत. एकट्या उत्तर प्रदेशातच 10.5% (10,70,895) लाभार्थी आहेत.

https://static.pib.gov.in/WriteReadData/userfiles/image/image002EFBA.jpg

भारतातील 7 राज्यात लसीचा दुसरा डोस दिलेल्यांचे प्रमाण 60.85% आहे. देशात लसीचा दुसरा डोस दिलेल्या सर्व राज्यांपैकी तेलंगणामध्ये सर्वाधिक 12 टक्के लसीकरणासह (73,281 लाभार्थी) आघाडीवर आहे.

https://static.pib.gov.in/WriteReadData/userfiles/image/image003OZJJ.jpg

सोळा राज्य/केंद्रशासित प्रदेशांत गेल्या 24 तासांत कोणत्याही कोविड- 19 मृत्यूची नोंद झालेली नाही. यामध्ये गुजरात, हिमाचल प्रदेश, गोवा, झारखंड, मेघालय, पुदुचेरी, चंदिगड, मणिपूर, मिझोरम, लक्षद्वीप, सिक्किम, अरुणाचल प्रदेश, लडाख (केंद्रशासित प्रदेश), त्रिपुरा, अंदमान आणि निकोबार बेटे, दमण, दीव, दादरा आणि नगर हवेली यांचा समावेश आहे.

पंधरा राज्ये/केंद्रशासित प्रदेशात 1 ते 5 मृत्यू आणि 3 राज्ये/केंद्रशासित प्रदेशात 6 ते 10 मृत्यूची नोंद झाली आहे.

https://static.pib.gov.in/WriteReadData/userfiles/image/image004OVL7.jpg

भारताची एकूण सक्रीय रुग्णसंख्या आजमितीस 1.39 लाख (1,39,542) आहे. सक्रीय रुग्णसंख्या सध्या भारतातील एकूण पॉझिटिव्ह प्रकरणांपैकी 1.27% आहे.

भारताची एकूण बरे होणाऱ्यांची संख्या आजमितीस 1.06 कोटी (1,06,67,741) आहे. रुग्ण बरे होण्याचा दर 97.30% आहे.

गेल्या 24 तासांत 10,896 रूग्ण बरे होऊन घरी परतले.

नव्याने बरे झालेल्यांचे प्रमाण 6 राज्यांत 83.15% आहे.

केरळमध्ये 5,193 रुग्णांसह दैनंदिन बरे होणाऱ्यांची सर्वाधिक नोंद झाली आहे. गेल्या 24 तासांत महाराष्ट्रात 2,543 लोक बरे झाले आणि त्याखालोखाल तामिळनाडूमध्ये 470 रुग्ण बरे झाले.

https://static.pib.gov.in/WriteReadData/userfiles/image/image005LBGR.jpg

गेल्या 24 तासांत 13,193 नव्या दैनंदिन रुग्णांची नोंद झाली.

दैनंदिन नव्या रुग्णसंख्येचे 6 राज्यातील प्रमाण 86.6% आहे.

महाराष्ट्रात सर्वाधिक 5,427 दैनंदिन नव्या रुग्णांची नोंद झाली.

https://static.pib.gov.in/WriteReadData/userfiles/image/image0068DFB.jpg

गेल्या चोवीस तासांत 97 मृत्यूंची नोंद झाली आहे.

दररोज होणाऱ्या मृत्यूंमध्ये पाच राज्यांचा 76.29% वाटा आहे. महाराष्ट्रात सर्वाधिक (38) मृत्यू, त्याखालोखाल. केरळमध्ये दररोज 14 मृत्यू आणि पंजाबमध्ये 10 लोकांचा मृत्यू झाला आहे.

https://static.pib.gov.in/WriteReadData/userfiles/image/image0078LQ3.jpg


* * *

S.Tupe/V.Joshi/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1699396) Visitor Counter : 236