आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय

भारतात एकूण लसीकरणाने केला 94 लाखाचा टप्पा पार, जागतिक स्तरावर भारत तिसऱ्या स्थानी

बरे झालेल्यांच्या संख्येचा चढता आलेख

गेल्या 24 तासात 16 राज्ये/केंद्र प्रदेशात कोविड-19 मुळे एकही मृत्यू नाही

Posted On: 18 FEB 2021 1:04PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 18 फेब्रुवारी 2021

सर्वाधिक लसीकरणाच्या आकडेवारीत जागतिक स्तरावरच्या सर्वोच्च देशांमध्ये भारत तिसऱ्या स्थानावर आहे, अमेरिका आणि ब्रिटन नंतर  भारताचा क्रमांक आहे.

18 फेब्रुवारी 2021 ला सकाळी 8  वाजेपर्यंत 94 लाखाहून अधिक आरोग्य कर्मचारी आणि आघाडीच्या कर्मचाऱ्यांनी देशव्यापी कोविड-19 लसीकरण अभियाना अंतर्गत लस घेतली.

आज सकाळी 8 वाजता आलेल्या अहवालानुसार आतापर्यंत 1,99,305 सत्रात 94,22,228 जणांनी लस घेतली आहे.

यामध्ये 61,96,641 आरोग्य कर्मचारी ( पहिली मात्रा )  3,69,167 आरोग्य कर्मचारी (दुसरी मात्रा )  आणि 28,56,420 आघाडीच्या कर्मचाऱ्यांचा ( पहिली मात्रा ) समावेश आहे.

कोविड -19 लसीकरणाची दुसरी मात्रा 13 फेब्रुवारी 2021 पासून सुरु झाली, पहिली मात्रा घेऊन  28 दिवस झालेल्यांना ही दुसरी मात्रा देण्यात येत आहे.  2 फेब्रुवारी 2021 पासून आघाडीच्या कर्मचाऱ्यांचे लसीकरण सुरु करण्यात आले.

S.

No.

 

State/UT

Beneficiaries vaccinated

1st Dose

2nd Dose

Total Doses

1

A & N Islands

4,045

182

4,227

2

Andhra Pradesh

3,76,308

35,475

4,11,783

3

Arunachal Pradesh

16,613

1,574

18,187

4

Assam

1,31,651

5,573

1,37,224

5

Bihar

5,02,903

15,192

5,18,095

6

Chandigarh

10,583

277

10,860

7

Chhattisgarh

3,08,551

9,829

3,18,380

8

Dadra & Nagar Haveli

4,143

94

4,237

9

Daman & Diu

1,480

94

1,574

10

Delhi

2,28,911

7,651

2,36,562

11

Goa

13,692

354

14,046

12

Gujarat

6,99,443

17,801

7,17,244

13

Haryana

2,01,675

8,009

2,09,684

14

Himachal Pradesh

87,499

4,306

91,805

15

Jammu & Kashmir

1,59,765

2,501

1,62,266

16

Jharkhand

2,32,671

7,541

2,40,212

17

Karnataka

5,10,696

54,397

5,65,093

18

Kerala

3,79,034

16,153

3,95,187

19

Ladakh

3,856

290

4,146

20

Lakshadweep

1,809

115

1,924

21

Madhya Pradesh

5,97,537

0

5,97,537

22

Maharashtra

7,64,965

16,835

7,81,800

23

Manipur

32,748

777

33,525

24

Meghalaya

21,221

470

21,691

25

Mizoram

12,976

585

13,561

26

Nagaland

16,502

1,750

18,252

27

Odisha

4,21,142

18,248

4,39,390

28

Puducherry

6,959

395

7,354

29

Punjab

1,12,231

3,051

1,15,282

30

Rajasthan

7,44,741

15,334

7,60,075

31

Sikkim

9,509

251

9,760

32

Tamil Nadu

2,95,338

14,039

3,09,377

33

Telangana

2,79,534

53,701

3,33,235

34

Tripura

75,565

2,361

77,926

35

Uttar Pradesh

9,16,568

18,394

9,34,962

36

Uttarakhand

1,23,656

3,063

1,26,719

37

West Bengal

5,57,880

15,866

5,73,746

38

Miscellaneous

1,88,661

16,639

2,05,300

Total

90,53,061

3,69,167

94,22,228

लसीकरण अभियानाच्या 33  व्या दिवशी ( 18 फेब्रुवारी 2021) ला 4,22,998 लाभार्थींचे 7,932 सत्रात लसीकरण झाले.यापैकी  3,30,208 लाभार्थ्यांना 10,574  सत्रात पहिली मात्रा आणि 92,790 जणांना लसीची दुसरी मात्रा देण्यात आली.

दुसरी मात्रा   घेतलेल्यांपैकी 58.20%  जण 7  राज्यांमधले आहेत. एकट्या कर्नाटक मध्ये 14.74% आहेत.(54,397 मात्रा )

भारतात बरे झालेल्यांची एकूण संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. आज ही संख्या 1.06 कोटी  (1,06,56,845) आहे. रुग्ण बरे होण्याचा दर 97.32% आहे.बरे होणाऱ्यांच्या संख्येत वाढ होत असल्याने मृत्युच्या  दैनंदिन  संख्येत आणि त्याच बरोबर सक्रीय रुग्ण संख्येतही घट होत आहेत.

भारताची सध्याची सक्रीय  रुग्ण संख्या (1,37,342) असून ही संख्या एकूण पॉझिटीव्ह रुग्णांच्या 1.25 % इतकी आहे.

गेल्या 24 तासात नव्या रुग्ण संख्येचे चित्र सकारात्मक दिसत आहे. गेल्या 24 तासात केवळ 2 राज्यात 1,000 पेक्षा जास्त रुग्णांची नोंद झाली.

गेल्या 24 तासात 16 राज्ये/केंद्र प्रदेशात कोविड-19 मुळे एकाही मृत्यूची नोंद झालेली नाही. दिल्ली, ओडिशा, जम्मू-काश्मीर ( केंद्र शासित प्रदेश ), झारखंड, हिमाचल प्रदेश, लक्षद्वीप, मणिपूर, मेघालय, सिक्किम, लडाख (केंद्र शासित प्रदेश), नागालँड, मिझोरम, अंदमान निकोबार, त्रिपुरा, दमण, दीव, दादरा नगर हवेली आणि अरुणाचल प्रदेश यांचा यात समावेश आहे.

गेल्या 24 तासात केवळ एका राज्यात 20 पेक्षा जास्त मृत्यू झाले.

दैनंदिन पॉझिटीव्हिटी दरातही गेले सात दिवस सातत्याने घट होत आहे. 1 फेब्रुवारी 2021 ला हा दर 1.89% होता त्यात घट होऊन आज हा दर 1.69% आहे.

केरळ आणि महाराष्ट्रात नव्या रुग्णांपैकी 75 % रुग्ण आहेत, बरे झालेल्यांपैकी 72% आणि मृत्यू पैकी 55% मृत्यूंची नोंद या दोन राज्यातील  आहे.

बरे झालेल्यांपैकी 85.14% रुग्ण  हे  6 राज्यातले आहेत.

केरळ मध्ये एका दिवसात सर्वात जास्त म्हणजे 4,832 जण बरे झाले, महाराष्टात  3,853 आणि कर्नाटक मध्ये 537 जण बरे झाले.

गेल्या 24 तासात देशात 12,881 नव्या रुग्णांची नोंद झाली. यापैकी 86.61% रुग्ण 6  राज्यातले आहेत.

केरळ मध्ये दैनंदिन रुग्णांची सर्वात जास्त म्हणजे 4,892 रुग्णांची नोंद झाली.महाराष्ट्रामध्ये 4,787 आणि तामिळनाडू मध्ये  454  नव्या रुग्णांची नोंद झाली.

गेल्या 24 तासात 101  मृत्यूंची नोंद झाली.

या मृत्यूंपैकी  76.24% मृत्यू  पाच राज्यातले आहेत.

महाराष्ट्रात सर्वात जास्त  40 मृत्यूंची नोंद झाली. केरळमध्ये 16  आणि पंजाब मध्ये 10   मृत्यूंची नोंद झाली.

 Jaydevi PS/N.Chitale/P.Malandkar

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai@gmail.com(Release ID: 1698990) Visitor Counter : 9