पंतप्रधान कार्यालय

सिधी येथील बस अपघातात झालेल्या जीवितहानीबद्दल पंतप्रधानांकडून शोक व्यक्त

Posted On: 16 FEB 2021 4:32PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 16 फेब्रुवारी 2021

मध्यप्रदेशमधील सिधी येथे बस अपघातात झालेल्या जीवितहानीबद्दल पंतप्रधानांनी शोक व्यक्त केला आहे.

पंतप्रधान कार्यालयाने पंतप्रधानांना उद्धृत करून ट्विट केले की मध्यप्रदेशच्या सिधी येथे झालेला बस अपघात भयानक आहे. शोकाकुल कुटुंबीयांप्रती सहानुभूती. बचाव आणि मदत कार्यात स्थानिक प्रशासन सक्रियपणे सहभागी आहे.

पंतप्रधानांनी मदत द्यायलाही मान्यता दिली. पंतप्रधान कार्यालयाने ट्वीट केले की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मध्य प्रदेशातील सिधी येथे झालेल्या बस अपघातातील मृतांच्या जवळच्या नातेवाईकाला पंतप्रधानांच्या राष्ट्रीय मदत निधीतून प्रत्येकी 2 लाख रुपये तर गंभीर जखमींना 50,000 रुपये द्यायला मंजुरी दिली आहे.

 

S.Tupe/V.Joshi/P.Malandkar

 

 

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com




(Release ID: 1698457) Visitor Counter : 113