पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधान नॅसकॉम टेक्नॉलॉजी अँड लीडरशीप फोरमला 17 फेब्रुवारी रोजी संबोधित करणार
Posted On:
15 FEB 2021 4:30PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 15 फेब्रुवारी 2021
पंतप्रधान नरेंद्र मोदी 17 फेब्रुवारी 2021 रोजी दुपारी साडेबारा वाजता दूरदृश्य प्रणालीद्वारे नॅसकॉम टेक्नॉलॉजी अँड लीडरशीप फोरमला (एनटीएलएफ) संबोधित करतील.
एनटीएलएफबद्दल माहिती
एनटीएलएफच्या एकोणतिसाव्या सत्राचे आयोजन 17 ते 19 फेब्रुवारी 2021 दरम्यान करण्यात आले आहे. नॅशनल असोसिएशन ऑफ सॉफ्टवेअर अँड सर्विस कंपनीजचा हा महत्त्वाचा कार्यक्रम आहे. ‘उत्तम सामान्य स्थितीकडे मार्गक्रमण करणाऱ्या भविष्याची पायाभरणी’ ही या वर्षीच्या कार्यक्रमाची मुख्य संकल्पना आहे. या कार्यक्रमात 30 पेक्षा अधिक देशांमधून 1600 जण सहभागी होतील. तीन दिवसांच्या या कार्यक्रमादरम्यान चर्चांसह तीस उत्पादने सादर करण्यात येतील.
S.Tupe/V.Sahjrao/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1698135)
Visitor Counter : 153
Read this release in:
English
,
Urdu
,
Hindi
,
Manipuri
,
Bengali
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam