आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय

33 राज्ये/केंद्रशासित प्रदेशात 5,000 हून कमी सक्रिय रुग्णसंख्या


गेल्या 24 तासात 18 राज्ये/केंद्रशासित प्रदेशात एकही मृत्यूची नोंद नाही

83 लाखांपेक्षा अधिक लाभार्थ्यांचे कोविड 19 प्रतिबंधक लसीकरण पूर्ण

Posted On: 15 FEB 2021 2:32PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 15 फेब्रुवारी 2021

भारतात आजमितीस एकूण सक्रिय रुग्णसंख्या 1.39 लाख (1,39,637) आहे. ही संख्या भारताच्या एकूण पॉझिटिव्ह रुग्णांपैकी 1.28% इतकी आहे.

गेल्या 24 तासांत 33 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांत 5,000 पेक्षा कमी सक्रिय रुग्णांची नोंद झाली आहे. सध्या त्रिपुरा,  दमण, दीव, दादरा आणि नगर हवेलीमध्ये प्रत्येकी केवळ दोन सक्रिय रुग्ण आहेत.

भारतातील एकूण सक्रिय रुग्णांपैकी 77% (76.5%) रुग्ण

केरळ, महाराष्ट्र आणि कर्नाटक या तीन राज्यात मिळून आहेत.  एकूण सक्रिय रुग्णांपैकी 74.72% रुग्ण केरळ आणि महाराष्ट्रात मिळून आहेत.

गेल्या 24 तासात 18 राज्ये/केंद्रशासित प्रदेशात एकही मृत्यूची नोंद नाही. यात आसाम, राजस्थान, ओदिशा, आंध्र प्रदेश, हरियाणा, झारखंड, उत्तराखंड, मणिपूर, नागालँड, लक्षद्वीप, मेघालय, सिक्कीम, अंदमान आणि निकोबार बेटे, लडाख (केंद्रशासित प्रदेश) मिझोराम, अरुणाचल प्रदेश, त्रिपुरा आणि दमण, दीव, दादरा आणि नगर हवेली यांचा समावेश आहे.

तसेच, गेल्या आठवड्यात दहा राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांत एकही मृत्यू झाल्याची नोंद नाही. यात अंदमान आणि निकोबार बेटे, अरुणाचल प्रदेश, दमण, दीव, दादरा आणि नगर हवेली, लडाख (केंद्रशासित प्रदेश), लक्षद्वीप, मणिपूर, नागालँड, सिक्कीम आणि त्रिपुरा यांचा समावेश आहे.

15 फेब्रुवारी, 2021 रोजी सकाळी 8:00 वाजेपर्यंत, देशभरात कोविड 19 प्रतिबंधक लसीकरण केलेल्या आरोग्यसेवा आणि आघाडीच्या कर्मचाऱ्यांची संख्या जवळजवळ 83 लाखांवर पोहोचली आहे.

आज सकाळी 8 वाजेपर्यंतच्या अहवालानुसार 1,73,729 सत्राद्वारे 82,85,295 लाभार्थ्यांचे लसीकरण करण्यात आले आहे. यात 59,88,113 आरोग्य सेवा कर्मचाऱ्यांना (पहिला डोस), 24,561 आरोग्य सेवा कर्मचाऱ्यांना (दुसरा डोस) आणि 22,72,621 आघाडीच्या कर्मचाऱ्यांना (पहिला डोस) समाविष्ट आहे.

ज्या लाभार्थ्यांनी पहिला डोस घेतल्यानंतर 28 दिवस पूर्ण केले आहेत त्यांना कोविड 19 प्रतिबंधक लसीकरणाचा दुसरा डोस देण्याची सुरुवात 13 फेब्रुवारी, 2021 रोजी झाली.

S.

No.

 

State/UT

Beneficiaries vaccinated

1st Dose

2nd Dose

Total Doses

1

A & N Islands

3,646

0

3,646

2

Andhra Pradesh

3,56,521

5,820

3,62,341

3

Arunachal Pradesh

15,633

461

16,094

4

Assam

1,27,658

2,215

1,29,873

5

Bihar

4,92,152

0

4,92,152

6

Chandigarh

8,660

143

8,803

7

Chhattisgarh

2,62,092

895

2,62,987

8

Dadra & Nagar Haveli

2,922

41

2,963

9

Daman & Diu

1,121

30

1,151

10

Delhi

1,89,351

1,856

1,91,207

11

Goa

13,166

517

13,683

12

Gujarat

6,83,903

0

6,83,903

13

Haryana

1,95,764

588

1,96,352

14

Himachal Pradesh

81,482

475

81,957

15

Jammu & Kashmir

1,28,822

807

1,29,629

16

Jharkhand

2,06,182

2,209

2,08,391

17

Karnataka

4,96,234

0

4,96,234

18

Kerala

3,58,529

46

3,58,575

19

Ladakh

2,904

77

2,981

20

Lakshadweep

1,776

0

1,776

21

Madhya Pradesh

5,57,105

0

5,57,105

22

Maharashtra

6,82,744

189

6,82,933

23

Manipur

22,726

169

22,895

24

Meghalaya

13,998

91

14,089

25

Mizoram

11,680

74

11,754

26

Nagaland

9,695

123

9,818

27

Odisha

4,12,046

0

4,12,046

28

Puducherry

5,953

71

6,024

29

Punjab

1,03,799

59

1,03,858

30

Rajasthan

6,10,088

0

6,10,088

31

Sikkim

8,335

0

8,335

32

Tamil Nadu

2,46,420

1,154

2,47,574

33

Telangana

2,78,915

3,273

2,82,188

34

Tripura

69,196

366

69,562

35

Uttar Pradesh

8,58,602

0

8,58,602

36

Uttarakhand

1,10,326

0

1,10,326

37

West Bengal

5,14,570

2,382

5,16,952

38

Miscellaneous

1,16,018

430

1,16,448

 

Total

82,60,734

24,561

82,85,295

लसीकरण मोहिमेच्या 30 व्या दिवसापर्यंत (14 फेब्रुवारी 2021) 877 सत्रांमध्ये एकूण 21,437 लाभार्थ्यांचे लसीकरण करण्यात आले. त्यापैकी 20,504 लाभार्थ्यांना लसीकरणाचा पहिला डोस देण्यात आला. तर 933 आरोग्य सेवा कर्मचाऱ्यांना लसीचा दुसरा डोस मिळाला.

देशात लसीकरण मोहिमेत दिवसेंदिवस चढता आलेख पाहायला मिळत आहे.

भारतात लसीकरण झालेल्या एकूण लाभार्थीपैकी 69% लाभार्थी 10 राज्यातील आहेत. एकट्या उत्तर प्रदेशातच 10.4% (8,58,602) लाभार्थी आहेत.

आज भारतातील बरे होणाऱ्यांची एकूण संख्या 1.06 कोटी (1,06,21,220) वर आहे. रुग्ण बरे होण्याचा दर 97.29% आहे.

गेल्या 24 तासांत 9,489 रूग्ण बरे होऊन घरी परतले.

नव्याने बरे झालेल्या रुग्णांपैकी 79.5% हे 6 राज्यातील आहेत.

केरळमध्ये दैनंदिन नव्याने बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या सर्वाधिक 4,692 (जवळजवळ 50%) जी सर्वाधिक नोंदली गेली आहे. गेल्या 24 तासांत महाराष्ट्रात 1,355 रुग्ण बरे झाले आणि त्याखालोखाल कर्नाटकात 486 रुग्ण बरे झाले.

गेल्या 24 तासांत 11,649 नवीन दैनंदिन रुग्णांची नोंद झाली आहे.

दैनंदिन नवीन रुग्णांपैकी 86.4% रुग्ण 6 राज्यांमधील आहेत.

केरळमध्ये दैनंदिन रुग्णांची नोंद सर्वाधिक 4,612 आहे. त्याखालोखाल महाराष्ट्रात 4,092  तर तामिळनाडूमध्ये 470 नवीन रुग्ण आढळले आहेत.

गेल्या 24 तासांत 90 मृत्यूची नोंद झाली.

दररोज होणाऱ्या मृत्यूंमध्ये सहा राज्यांचा 80% वाटा आहे. महाराष्ट्रात सर्वाधिक (40) मृत्यू म्हणजे दैनंदिन मृत्युसंख्येच्या 44.44% आहे. त्याखालोखाल केरळमध्ये दररोज 15 मृत्यू तर तामिळनाडूमध्ये 6 लोकांचा मृत्यूची नोंद आहे.

 

 

S.Tupe/V.Joshi/P.Malandkar

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com(Release ID: 1698099) Visitor Counter : 316