पंतप्रधान कार्यालय
जागतिक नभोवाणी दिवसानिमित्त पंतप्रधानांच्या श्रोत्यांना शुभेच्छा
Posted On:
13 FEB 2021 1:05PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 13 फेब्रुवारी 2021
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जागतिक नभोवाणी दिनानिमित्त नभोवाणीच्या सर्व श्रोत्यांना शुभेच्छा दिल्या आहेत आणि म्हणाले की, नभोवाणी हे एक विलक्षण माध्यम आहे, ज्यामुळे सामाजिक संबंध अधिक खोलवर रुजतात.
ट्विटमध्ये पंतप्रधान म्हणाले, “जागतिक नभोवाणी दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ! नभोवाणीच्या सर्व श्रोत्यांना शुभेच्छा आणि ज्यांनी नाविन्यपूर्ण विषय आणि संगीताच्या माध्यमातून नभोवाणी हे माध्यम अविरत गुंजत ठेवले आहे, अशा लोकांचे कौतुक. हे एक विलक्षण माध्यम आहे ज्यामुळे सामाजिक संबंध अधिक खोलवर रुजतात. मी स्वतः नभोवाणीचा सकारात्मक परिणाम अनुभवला आहे. #MannKiBaat ला धन्यवाद.”
* * *
Jaydevi PS/S.Shaikh/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1697681)
अभ्यागत कक्ष : 215
Read this releasein:
Malayalam
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Bengali
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada