आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय

भारतात दररोज आढळणाऱ्या नवीन रुग्णसंख्येत घट कायम, बरे होणाऱ्या रुग्णांच्या संख्येत सातत्यपूर्ण वाढ

गेल्या एका महिन्यात सरासरी दैनंदिन मृत्यूंमध्ये 55 टक्के घट

62.6 लाख लाभार्थ्यांना कोविड 19 प्रतिबंधक लस देण्यात आली

Posted On: 09 FEB 2021 2:32PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 9 फेब्रुवारी 2021

 

भारतातील दैनंदिन नवीन रुग्णसंख्येत सतत खाली जाणारा कल दिसून येत आहे. गेल्या 24 तासांत देशभरात  9,110 नवीन रुग्ण आढळले आहेत. दैनंदिन रुग्णांची कमी संख्या आणि बरे होणाऱ्यांचे वाढते प्रमाण यामुळे उपचाराधीन रुग्णसंख्येत सतत घट होत  आहे.

भारताची उपचाराधीन रुग्णांची एकूण संख्या आज घसरून 1.43  लाख (1,43,625) झाली आहे. उपचाराधीन रुग्णसंख्येत आता भारताच्या एकूण बाधित रुग्णांपैकी केवळ 1.32 टक्के रुग्णांचा समावेश आहे.

आतापर्यंत एकूण 1.05 कोटी (1,05,48,521) रुग्ण बरे झाले आहेत. गेल्या 24 तासांत 14,016 रूग्ण बरे झाले आहेत आणि त्यांना घरी सोडण्यात आले  आहे. बरे झालेले रुग्ण आणि उपचाराधीन रुग्ण यातील तफावत  उत्तरोत्तर वाढतच आहे. आज ही तफावत 1,04,04,896  इतकी आहे.

बरे होणाऱ्या रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होत असल्यामुळे  भारताचा रुग्ण बरे होण्याचा दर 97.25  पोहचला असून  जागतिक स्तरावरील उच्चांकी संख्येपैकी एक आहे. ब्रिटन, अमेरिका, इटली, रशिया, ब्राझील आणि जर्मनीचा रुग्ण बरे होण्याचा दर  भारतापेक्षा कमी आहे.

भारतातील सरासरी दैनंदिन मृत्यूंमध्येही सातत्याने घट होत आहे. जानेवारी 2021,च्या दुसर्‍या आठवड्यात दैनंदिन  मृत्यू संख्या 211 होती, फेब्रुवारी, 2021 च्या दुसर्‍या आठवड्यात सरासरी दैनंदिन मृत्यू 96 पर्यंत  कमी झाले असून ही घट 55 %  आहे.

भारताचा मृत्यू दर (सीएफआर) 1.43% असून जगातील सर्वात कमी दरापैकी एक आहे. जागतिक सरासरी 2.18 टक्के आहे.

9 फेब्रुवारी, 2021 रोजी सकाळी 8:00 वाजेपर्यंत, सुमारे 62.6 लाख  (62,59,008) लाभार्थ्यांना देशव्यापी कोविड  19 लसीकरणाअंतर्गत लस देण्यात आली आहे.

यापैकी 5,482,102 आरोग्य कर्मचारी आहेत तर 7,76,906 आघाडीचे कर्मचारी आहेत.

लसीकरण मोहिमेच्या 24 व्या दिवशी 10,269 सत्रांमध्ये 4,46,646 लोकांचे (एचसीडब्ल्यू - 1,60,710 आणि एफएलडब्ल्यू- 2,85,936) लसीकरण करण्यात आले. आतापर्यंत 1,26,756 सत्रे घेण्यात आली आहेत.

S. No.

States/UTs

Beneficiaries Vaccinated

1

A & N Islands

3,397

2

Andhra Pradesh

3,14,316

3

Arunachal Pradesh

13,479

4

Assam

99,889

5

Bihar

3,97,555

6

Chandigarh

6,027

7

Chhattisgarh

1,84,733

8

Dadra & Nagar Haveli

1,550

9

Daman & Diu

745

10

Delhi

1,19,329

11

Goa

8,352

12

Gujarat

5,05,960

13

Haryana

1,69,055

14

Himachal Pradesh

58,031

15

Jammu & Kashmir

61,035

16

Jharkhand

1,24,505

17

Karnataka

4,15,403

18

Kerala

3,07,998

19

Ladakh

2,234

20

Lakshadweep

868

21

Madhya Pradesh

3,79,251

22

Maharashtra

5,12,476

23

Manipur

9,989

24

Meghalaya

7,662

25

Mizoram

10,937

26

Nagaland

4,973

27

Odisha

3,15,725

28

Puducherry

3,881

29

Punjab

82,127

30

Rajasthan

4,87,848

31

Sikkim

6,007

32

Tamil Nadu

1,75,027

33

Telangana

2,29,027

34

Tripura

45,674

35

Uttar Pradesh

6,73,542

36

Uttarakhand

79,283

37

West Bengal

3,77,608

38

Miscellaneous

63,510

Total

62,59,008

बरे झालेल्या नवीन रुग्णांपैकी 81.2 टक्के रुग्ण  6 राज्ये / केंद्रशासित प्रदेशात  आहेत.

केरळमध्ये काल एका दिवसात 5,959 इतके  सर्वाधिक रुग्ण बरे झाले  गेल्या 24 तासांत महाराष्ट्रात 3,423 रुग्ण बरे झाले आणि त्याखालोखाल  बिहारमध्ये 550 रुग्ण बरे झाले.

गेल्या 24 तासांत 9,110 दैनंदिन रुग्णांची नोंद झाली .  नवीन रुग्णांपैकी 81.39 टक्के रुग्ण  6 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील आहेत.

केरळमध्ये काल 3,742 इतक्या सर्वाधिक संख्येने नवीन रुग्णांची नोंद झाली.  त्याखालोखाल महाराष्ट्रात  2,216 , तर तामिळनाडूमध्ये 464 नवीन रुग्ण आढळले आहेत.

गेल्या 24 तासांत 78 मृत्यू नोंदले गेले. गेल्या 4 दिवसांपासून 100 पेक्षा कमी मृत्यूची नोंद झाली आहे.

नवीन मृत्यूंपैकी  64.1 टक्के मृत्यू पाच राज्ये / केंद्रशासित प्रदेशांमधील आहेत . केरळमध्ये सर्वाधिक (16) मृत्यू झाले महाराष्ट्रात 15 मृत्यू तर पंजाबमध्ये 11 मृत्यूची नोंद झाली आहे.

 

 

Jaydevi P.S/S.Kane/P.Malandkar

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai@gmail.com(Release ID: 1696462) Visitor Counter : 60