आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
कोरोना रुग्णांच्या मृत्यूत स्थिर घट; गेल्या 10 दिवसांपासून दैनंदिन मृत्यू सातत्याने 150 हून कमी
Posted On:
08 FEB 2021 2:32PM by PIB Mumbai
गेल्या 10 दिवसांपासून दैनंदिन मृत्यू सातत्याने 150 हून कमी नोंदवत भारताने महत्वपूर्ण कामगिरी केली आहे. गेल्या 24 तासांत केवळ 84 मृत्यूची नोंद झाली आहे.
कोविड व्यवस्थापन आणि प्रतिसाद धोरणाचा एक भाग म्हणून, केंद्र सरकारचे लक्ष्य केवळ कोविडशी संबंधित मृत्यू रोखण्यात नसून मृत्यू कमी करण्यासाठी आणि कोविडच्या गंभीर रूग्णांना दर्जेदार वैद्यकीय सेवा पुरवून जीव वाचविण्यावर भर देण्यात आला आहे.
गेल्या 24 तासांत 17 राज्ये / केंद्रशासित प्रदेशात मृत्यूची नोंद नाही.
गेल्या 24 तासांत देशातील सक्रिय रुग्णसंख्या आणखी घटून 1,48,609 झाली आहे. देशातील सक्रिय रुग्णसंख्या आता एकूण पॉझिटिव्ह रुग्णांच्या केवळ 1.37% आहे.
गेल्या 24 तासांत देशात 11,831 नवीन रुग्णांची नोंद झाली. याच कालावधीत 11,904 नवीन रुग्ण बरे झाल्याची नोंद करण्यात आली.
देशातील एकूण सक्रिय प्रकरणांमध्ये 5 राज्यांचा वाटा 81% आहे. भारतातील एकूण सक्रिय प्रकरणांमध्ये केरळ आणि महाराष्ट्र या दोन राज्यांचा एकत्रितपणे वाटा 70% आहे.
33 राज्ये / केंद्रशासित प्रदेशांमध्ये 5000 पेक्षा कमी सक्रिय प्रकरणे आहेत.
गेल्या महिन्यात महाराष्ट्राने सक्रिय रुग्ण संख्येत सर्वाधीक घट नोंदवली असून त्याखालोखाल उत्तर प्रदेश आहे.
8 फेब्रुवारी 2021 (लसीकरण मोहिमेच्या 24 व्या दिवशी) सकाळी 8 पर्यंत, देशभर सुरू असलेल्या कोविड - 19 लसीकरण मोहिमे अंतर्गत 58 लाखाहून अधिक (58,12,362) लाभार्थ्यांना लसीकरण प्राप्त झाले आहे.
S. No.
|
State/UT
|
Beneficiaries vaccinated
|
1
|
A & N Islands
|
3,397
|
2
|
Andhra Pradesh
|
2,99,649
|
3
|
Arunachal Pradesh
|
12,346
|
4
|
Assam
|
88,585
|
5
|
Bihar
|
3,80,229
|
6
|
Chandigarh
|
5,645
|
7
|
Chhattisgarh
|
1,68,881
|
8
|
Dadra & Nagar Haveli
|
1,504
|
9
|
Daman & Diu
|
708
|
10
|
Delhi
|
1,09,589
|
11
|
Goa
|
8,257
|
12
|
Gujarat
|
4,51,002
|
13
|
Haryana
|
1,39,129
|
14
|
Himachal Pradesh
|
54,573
|
15
|
Jammu & Kashmir
|
49,419
|
16
|
Jharkhand
|
1,06,577
|
17
|
Karnataka
|
3,88,769
|
18
|
Kerala
|
2,92,342
|
19
|
Ladakh
|
1,987
|
20
|
Lakshadweep
|
839
|
21
|
Madhya Pradesh
|
3,42,016
|
22
|
Maharashtra
|
4,73,480
|
23
|
Manipur
|
8,334
|
24
|
Meghalaya
|
6,859
|
25
|
Mizoram
|
10,937
|
26
|
Nagaland
|
4,535
|
27
|
Odisha
|
2,76,323
|
28
|
Puducherry
|
3,532
|
29
|
Punjab
|
76,430
|
30
|
Rajasthan
|
4,60,994
|
31
|
Sikkim
|
5,372
|
32
|
Tamil Nadu
|
1,66,408
|
33
|
Telangana
|
2,09,104
|
34
|
Tripura
|
40,405
|
35
|
Uttar Pradesh
|
6,73,542
|
36
|
Uttarakhand
|
74,607
|
37
|
West Bengal
|
3,54,000
|
38
|
Miscellaneous
|
62,057
|
Total
|
58,12,362
|
गेल्या 24 तासात 1,304 सत्रांमध्ये 36,804 लाभार्थ्यांचे लसीकरण करण्यात आले.
आतापर्यंत 1,16,487 सत्रे घेण्यात आली आहेत.
एकूण बरे झालेल्यांची संख्या 1.05 कोटीपेक्षा जास्त (1,05,34,505) आहे. सक्रिय प्रकरणे आणि बरे झालेल्या रुग्णांमधील तफावत सातत्याने वाढत आहे आणि ती 1,03,85,896 झाली आहे. रुग्ण बरे होण्याचा दर 97.20% झाला आहे.
नव्याने बरे झालेल्या 80.53% प्रकरणांची नोंद 6 राज्यांत झाली आहे. नव्याने बरे झालेल्या रुग्णांमध्ये केरळचे सर्वाधिक योगदान आहे (5,948), त्यानंतर महाराष्ट्र (1,622) आणि उत्तर प्रदेश (670) आहे.
नवीन रुग्णांपैकी 85.85% रुग्ण 6 राज्यांमधील आहेत.
केरळमध्येही दैनंदिन 6,075 नवीन प्रकरणे नोंदवली गेली आहेत. त्यापाठोपाठ महाराष्ट्र व कर्नाटक मध्ये अनुक्रमे 2,673 आणि 487 नवीन प्रकरणे आहेत.
गेल्या 24 तासांत 84 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. यातील 79.76% हे 6 राज्यातील आहेत.
महाराष्ट्रात 30 नवीन मृत्युंसह सर्वाधिक मृत्यूची नोंद झाली आहे. त्यापाठोपाठ केरळमध्ये दैनंदिन 19 मृत्यूची नोंद झाली.
M.Chopade/V.Joshi/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1696150)
Visitor Counter : 236
Read this release in:
English
,
Urdu
,
Hindi
,
Bengali
,
Assamese
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam