आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय

कोविड-19 च्या सर्वाधिक लस देणाऱ्या अव्वल देशांमध्ये भारत तिसऱ्या स्थानावर

57.75 लाखांपेक्षा अधिक लाभार्थ्यांनी घेतली कोविड 19 प्रतिबंधक लस

गेल्या 24 तासात दैनंदिन मृत्यू 80 पेक्षा कमी, गेल्या 9 महिन्यातील सर्वात कमी

गेल्या 24 तासात 17 राज्ये / केंद्रशासित प्रदेशात कोविड 19 चा एकही बळी नाही

Posted On: 07 FEB 2021 4:55PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 7 फेब्रुवारी 2021

 

कोविड 19 विरुद्धच्या लढाईत भारताने आणखी एक जागतिक शिखर सर केले आहे.

कोविड 19 च्या लस प्रशासित करण्यामध्ये जगात अव्वल असणाऱ्या देशांमध्ये भारत आता तिसऱ्या स्थानावर आहे. भारताच्या पुढे केवळ युनायटेड स्टेट्स आणि युनायटेड किंग्डम यांचा समावेश आहे.

भारतात 12 राज्यांमध्ये प्रत्येकी 2 लाखांपेक्षा अधिक लाभार्थींना लसीकरण करण्यात आले आहे. एकट्या उत्तर प्रदेशात लसीकरण घेतलेल्या सगळ्या लाभार्थ्यांचा आकडा हा 6,73,542 इतका आहे.

देशभर सुरू असलेल्या कोविड 19 लसीकरण मोहिमेध्ये 7 फेब्रुवारी 2021 रोजी सकाळी 8 वाजेपर्यंत 57.75 लाख (57,75,322) लाभार्थ्यांना लस मिळाली आहे. एकूण लसीकरणाच्या संचयी आकड्यामध्ये 53,04,546 आरोग्य कर्मचारी आणि 4,70,776 अग्रभागी काम करणारे कर्मचारी यांचा समावेश आहे.

S. No.

State/UT

Beneficiaries vaccinated

1

A & N Islands

3,161

2

Andhra Pradesh

2,99,649

3

Arunachal Pradesh

12,346

4

Assam

87,269

5

Bihar

3,74,538

6

Chandigarh

5,645

7

Chhattisgarh

1,68,881

8

Dadra & Nagar Haveli

1,504

9

Daman & Diu

708

10

Delhi

1,09,589

11

Goa

8,257

12

Gujarat

4,38,573

13

Haryana

1,39,068

14

Himachal Pradesh

54,573

15

Jammu & Kashmir

49,419

16

Jharkhand

95,934

17

Karnataka

3,86,186

18

Kerala

2,91,852

19

Ladakh

1,987

20

Lakshadweep

839

21

Madhya Pradesh

3,42,016

22

Maharashtra

4,73,480

23

Manipur

8,256

24

Meghalaya

6,859

25

Mizoram

10,937

26

Nagaland

4,535

27

Odisha

2,75,055

28

Puducherry

3,532

29

Punjab

76,430

30

Rajasthan

4,59,652

31

Sikkim

5,372

32

Tamil Nadu

1,66,408

33

Telangana

2,09,104

34

Tripura

40,347

35

Uttar Pradesh

6,73,542

36

Uttarakhand

73,762

37

West Bengal

3,54,000

38

Miscellaneous

62,057

Total

57,75,322

 

गेल्या 24 तासात 3,58,473 लाभार्थ्यांना 8,875 केंद्रांमधून लस देण्यात आली. यापूर्वी लसीकरणाची 1,15,178 एवढी केंद्र झाली आहेत.

लसीकरणाच्या लाभार्थ्यांच्या संख्येमध्ये रोज सातत्याने वाढ होत आहे.     

आणखी एका लक्षवेधी प्रगती म्हणजे, गेल्या 24 तासात भारतामध्ये दैनंदिन मृत्यूंची संख्या 80 पेक्षा कमी नोंदविली गेली आहे, जी गेल्या 9 महिन्यातील सर्वात कमी संख्या आहे.

देशातील सक्रीय रुग्ण संख्या 1.48 लाख (1,48,766) इतकी आहे. सध्याचा सक्रीय रुग्णांची संख्या ही देशातील एकूण बाधित संख्येच्या 1.37 टक्के इतकी आहे.

भारतातील बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या 1.05 कोटी (1,05,22,601) इतकी आहे. रुग्ण बरे होण्याचा दर हा 97.19 टक्के आहे.

गेल्या 24 तासात 12,059 इतक्या नवीन रुग्णांची नोंद करण्यात आली आहे तर, गेल्या 24 तासांमध्ये 11,805 इतके रुग्ण बरे होऊन घरी सोडण्यात आले आहेत.

नव्याने बरे झालेल्या रुग्णांपैकी 81.07 टक्के रुग्ण हे सहा राज्ये / केंद्रशासित प्रदेशांमधील असल्याचे आढळले आहे.

केरळमध्ये एका दिवशी सर्वाधिक बरे झालेल्या रुग्णांची नोंद, 8,178 इतकी आहे. महाराष्ट्रामध्ये गेल्या 24 तासात 1,739 इतके रुग्ण बरे झाले आहेत. त्यानंतर तामिळनाडू मध्ये 503 इतकी संख्या आहे.

दैनंदिन नव्या रुग्णांची सर्वाधिक नोंद केरळमध्ये 5,942 इतकी करण्यात आली आहे. त्यानंतर महाराष्ट्रात 2,768 तर कर्नाटकमध्ये 531 इतकी रुग्णांची नोंद आहे.

गेल्या 24 तासाच 78 मृत्यूंची नोंद आहे.

एकूण दैनंदिन मृत्यू संख्येच्या 69.23 टक्के मृत्यू 5 राज्ये / केंद्रशासित प्रदेशांमधील आहेत. महाराष्ट्रात सर्वाधिक मृत्यू (25) नोंदविले गेले आहेत. तर केरळमध्ये दैनंदिन मृत्यूचा आकडा 16 आणि पंजाबमध्ये 5 मृत्यूंची नोंद आहे.

गेल्या 24 तासांमध्ये 17 राज्ये / केंद्रशासित प्रदेशांमध्ये एकाही मृत्यूची नोंद झालेली नाही. यामध्ये हरियाणा, गोवा, जम्मू आणि काश्मिर (केंद्रशासित प्रदेश), झारखंड, पुद्दूचेरी, मेघालय, नागालँड, लक्षद्वीप, आसाम, मणिपूर, सिक्कीम, अंदमान आणि निकोबार बेटे, लडाख (केंद्रशासित प्रदेश), मिझोरम, अरूणाचल प्रदेश, त्रिपुरा, आणि दीव आणि दमण आणि दादरा आणि नगर हवेली यांचा समावेश आहे.

* * *

M.Chopade/S.Shaikh/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai@gmail.com(Release ID: 1695955) Visitor Counter : 113