पंतप्रधान कार्यालय
उद्या हरिपुरा येथे आयोजित कार्यक्रम आपल्या देशासाठी नेताजी बोस यांनी दिलेल्या योगदानाला अभिवादन ठरेल: पंतप्रधान
Posted On:
22 JAN 2021 10:25PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 22 जानेवारी 2021
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीच्या पूर्वसंध्येला त्यांना आदरांजली वाहिली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विविध ट्वीटच्या माध्यमातून सांगितले, “ उद्या महान नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती भारत पराक्रम दिवस म्हणून साजरा करणार आहे. देशभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून गुजरातमध्ये हरिपुरा येथे एक विशेष कार्यक्रम होत आहे. दुपारी एक वाजता होणाऱ्या या कार्यक्रमात जरुर सहभागी व्हा.
नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्याशी हरिपुराचे विशेष नाते आहे. 1938 मध्ये हरिपुरा येथे झालेल्या ऐतिहासिक अधिवेशनामध्ये नेताजी बोस यांनी काँग्रेसच्या अध्यक्षपदाची धुरा स्वीकारली होती. उद्या हरिपुरा येथे होणारा हा कार्यक्रम नेताजी बोस यांनी देशासाठी दिलेल्या योगदानाला अभिवादन ठरेल.
नेताजी बोस यांच्या जयंतीच्या पूर्वसंध्येला माझे मन मागे जात आहे आणि 23 जानेवारी 2009 या दिवसाची मला आठवण होत आहे ज्या दिवशी आम्ही हरिपुरा येथे ई-ग्राम विश्वग्राम प्रकल्पाची सुरुवात केली.
या उपक्रमामुळे गुजरातच्या माहिती तंत्रज्ञानविषयक पायाभूत सुविधा क्षेत्रामध्ये क्रांती घडवली आणि तंत्रज्ञानाची फळे राज्याच्या दुर्गम भागातील गरिबांपर्यंत पोहोचवली.
हरिपुराच्या लोकांचा जिव्हाळा मी कधीही विसरू शकणार नाही . जे मला त्या रस्त्याने तशाच प्रकारच्या मिरवणुकीसह घेऊन गेले ज्या रस्त्याने 1938 मध्ये नेताजी बोस यांना नेण्यात आले होते. त्यांच्या मिरवणुकीमध्ये एक सजवलेला रथ होता ज्या रथाला 51 बैल जोडले होते. नेताजी हरिपुरामध्ये जिथे राहिले होते त्या ठिकाणाला देखील मी भेट दिली.
नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे विचार आणि आदर्श आपल्याला नेहमीच अशा भारताच्या उभारणीच्या कार्यासाठी प्रेरणा देत राहोत . ज्या देशाचा त्यांना अभिमान वाटला असता एक असा देश, जो अतिशय सशक्त, आत्मविश्वासाने परिपूर्ण आणि स्वयंपूर्ण असेल आणि ज्याचा मानवकेंद्री दृष्टीकोन येणाऱ्या काळात या संपूर्ण पृथ्वीलाच अधिक चांगले बनवेल.
Jaydevi P.S/S.Patil/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1691424)
Visitor Counter : 187
Read this release in:
English
,
Urdu
,
Hindi
,
Bengali
,
Assamese
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam