पंतप्रधान कार्यालय

पंतप्रधान उद्या म्हणजेच 20 जानेवारी रोजी प्रधानमंत्री आवास योजना-ग्रामीण अंतर्गत उत्तरप्रदेश मधील 6 लाखाहून अधिक लाभार्थ्यांना आर्थिक मदत वितरीत करणार

Posted On: 19 JAN 2021 5:49PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 19 जानेवारी 2021

पंतप्रधान नरेंद्र मोदी 20 जानेवारी 2021 रोजी दुपारी 12 वाजता व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून प्रधानमंत्री आवास योजना-ग्रामीण (पीएमएवाय-जी) अंतर्गत उत्तरप्रदेश मधील 6.1 लाख लाभार्थ्यांना सुमारे 2691 कोटी रुपयांची आर्थिक मदत वितरीत करतील. यावेळी केंद्रीय ग्रामविकास मंत्री आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री देखील उपस्थित राहणार आहेत. या मदतीमध्ये पीएमएवाय-जी अंतर्गत 5.30 लाख लाभार्थ्यांना पहिला हप्ता आणि यापूर्वी पहिल्या हप्त्याचा लाभ घेतलेल्या 80 हजार लाभार्थ्यांना दुसरा हप्ता देण्यात येणार आहे.

पंतप्रधान आवास योजना-ग्रामीण

पंतप्रधानांनी 2022 पर्यंत सर्वांसाठी घरं चा नारा दिला होता, त्याअनुषंगाने 20 नोव्हेंबर 2016 रोजी पीएमएवाय-जी हा महात्वाकांशी कार्यक्रम सुरु करण्यात आला. आतापर्यंत या योजनेंतर्गत देशभरात 1.26 कोटी घरे बांधली गेली आहेत. पीएमएवाय-जी अंतर्गत, सपाट प्रदेशात राहणाऱ्या प्रत्येक लाभार्थ्याला 1.20 लाख रुपयांचे आणि डोंगराळ राज्य / ईशान्येकडील राज्ये/दुर्गम क्षेत्रे/जम्मू-काश्मीर आणि लदाख केंद्रशासित प्रदेश/आयएपी/एलडब्ल्यूई जिल्ह्यातील लाभार्थ्यांना 1.30 लाख रुपयांचे 100 टक्के अनुदान दिले जाते.

पीएमएवाय-जी च्या लाभार्थ्यांना युनिट मदतीव्यतिरिक्त महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत (एमजीएनआरईजीएस) अकुशल कामगार वेतन सहाय्य आणि स्वच्छ भारत अभियान-ग्रामीण (एसबीएम-जी) किंवा इतर कोणत्याही समर्पित निधीच्या माध्यमातून शौचालय बांधण्यासाठी 12,000 रुपयांची आर्थिक मदत केली जाते. पंतप्रधान उज्ज्वला योजनेअंतर्गत एलपीजी जोडणी, वीज जोडणी, जल जीवन अभियाना अंतर्गत सुरक्षित पिण्याच्या पाण्याची सुविधा इत्यादी भारत सरकार आणि राज्य/केंद्र शासित प्रदेशांच्या योजनांमध्ये विलीन होण्याची/समाविष्ट होण्याची तरतूद या योजनेत आहे.

S.Tupe/S.Mhatre/P.Malandkar

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1690061) Visitor Counter : 194