सांस्कृतिक मंत्रालय
दरवर्षी 23 जानेवारी हा “पराक्रम दिन” म्हणून साजरा करण्याची सरकारने घोषणा केली
23 जानेवारी हा “पराक्रम दिन” जाहीर केल्याची राजपत्रित अधिसूचना प्रकाशित
प्रविष्टि तिथि:
19 JAN 2021 5:50PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 19 जानेवारी 2021
भारत सरकारने येत्या 23 जानेवारी 2021 पासून नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे 125 वे जयंती वर्ष राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर सुयोग्य पद्धतीने साजरे करण्याचा निर्णय घेतला आहे. या स्मरणोत्सवातील कार्यक्रम निश्चित करण्यासाठी आणि त्यांच्यावर देखरेख आणि मार्गदर्शन करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली एक उच्च स्तरीय समिती गठीत केली आहे.
नेताजींनी देशासाठी नि:स्वार्थ भावनेने केलेल्या सेवेचा सन्मान करण्यासाठी आणि त्यांच्या स्मरणार्थ भारत सरकारने त्यांची जयंती अर्थात 23 जानेवारी हा दिवस “पराक्रम दिन” म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. देशातील नागरिकांना आणि विशेषत: तरुणांना संकट काळात नेताजींप्रमाणे धैर्याने वागण्याची प्रेरणा मिळावी आणि त्यांच्यामध्ये देशप्रेमाची भावना जागृत करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.
23 जानेवारी हा “पराक्रम दिन” जाहीर केल्याची राजपत्रित अधिसूचना प्रकाशित केली आहे.
राजपत्रित अधिसुचनेसाठी येथे क्लिक करा.
Jaydevi P.S/S.Mhatre/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 1690058)
आगंतुक पटल : 246
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
Telugu
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Bengali
,
Punjabi
,
Odia
,
Tamil
,
Kannada
,
Malayalam