शिक्षण मंत्रालय
वर्ष 2021 साठी जेईई आणि नीटचा अभ्यासक्रम कायम राहील
Posted On:
19 JAN 2021 3:12PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 19 जानेवारी 2021
2021 वर्षासाठी जेईई आणि नीटच्या अभ्यासक्रमात बदल होणार नाही. मात्र, यावर्षी जेईई आणि नीट परीक्षांमधील प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी उमेदवारांना पर्याय उपलब्ध असतील.
जेईई (मुख्य 2021) चा अभ्यासक्रम मागील वर्षाप्रमाणेच राहील. मात्र विद्यार्थ्यांना 90 प्रश्नांपैकी 75 प्रश्नांची (भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि गणितातील प्रत्येकी 25 प्रश्न) उत्तरे देण्याचा पर्याय असेल. जेईई (मुख्य) 2020 मध्ये विद्यार्थ्यांना सर्व 75 प्रश्नांची उत्तरे (भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि गणित विषयातील प्रत्येकी 25 प्रश्नांची) उत्तरे अनिवार्य होती.
NEET (UG) 2021 चे नेमके स्वरूप अद्याप जाहीर झालेले नाही. मात्र, देशभरातील काही मंडळांनी अभ्यासक्रम कमी केल्याच्या पार्श्वभूमीवर, नीट (यूजी) 2021 प्रश्नपत्रिकेत जेईई (मुख्य) च्या धर्तीवर पर्याय असतील.
U.Ujgare/S.Kane/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1689985)
Visitor Counter : 245
Read this release in:
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Malayalam
,
Assamese
,
Bengali
,
Manipuri
,
English
,
Urdu
,
Hindi
,
Punjabi