आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
भारताने गाठले शिखर-सक्रीय रुग्णसंख्या प्रथमच एकूण रूग्णसंख्येच्या 2 टक्क्याहून कमी
गेल्या 23 दिवसांपासून दररोज 300 पेक्षा कमी मृत्यु
गेल्या 10 दिवसांपासून दैनंदिन रुग्णसंख्या 20 हजाराहून कमी
Posted On:
17 JAN 2021 4:50PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 17 जानेवारी 2021
भारतात सक्रीय रूग्णसंख्येत सतत घट होत असून दररोज आढळणाऱ्या नवीन रुग्णांमध्ये घट झाल्याची नोंद होत आहे आणि परीणामतः सक्रीय रुग्णांमधे घट झाली आहे.
भारतातील एकूण रूग्णसंख्येपेक्षा सक्रीय रुग्णसंख्या रोडावल्यामुळे एकूण पॉझिटिव्ह रूग्णांची संस्था 2% पेक्षा कमी झाली आहे (1.98%).

गेल्या 24 तासांत 15,144 नव्या रूग्णांची नोंद झाली. देशातील सक्रीय रुग्णसंख्या 2,08,826 इतकी कमी आहे. गेल्या 10 दिवसांपासून दर दिवशी नव्याने नोंद होणाऱ्या रुग्णांची संख्या 20,000 पेक्षा कमी झाली आहे.

गेल्या 24 तासांतील सक्रीय रुग्णांची खालील स्थिती खालील आक्रुतीत दिली आहे. केरळमध्ये सर्वाधिक पाॅझिटीव्ह रूग्ण आढळून आले आहेत आणि त्यात 922 रूग्णांची नव्याने भर पडली आहे तर मध्यप्रदेशात सर्वाधिक नकारात्मक बदल दिसून आला असून संख्या 433ने खाली आली आहे.

गेल्या 24 तासांतील राज्यांमधील सक्रीय रूग्णसंख्येतील बदल
गेल्या 24 तासांत 17,170 नवे रूग्ण बरे झाल्याची नोंद झाली आहे. बरे झालेल्या रूग्णांचा वाटा 96.58% इतका आहे. बरे झालेल्या रूग्णांची एकूण संख्या 10,196,885. सक्रीय रूग्णांपेक्षा ही संख्या 99,88,059 ने अधिक आहे.
80.53%रूग्ण 10 राज्ये/केंद्रशासित प्रदेशातील आहेत. केरळमध्ये बरे होणाऱ्या रूग्णांची संख्या सर्वाधिक असून 5,011नवीन रुग्ण आढळले आहेत.गेल्या 24 तासांत महाराष्ट्रात 3,039 रूग्ण बरे झाले असून त्याखालोखाल उत्तर प्रदेशात ही संख्या 930 इतकी आहे.

8 राज्ये/केंद्रशासित प्रदेशांत 81%नवे रुग्ण आढळले आहेत.
केरळमध्ये सर्वाधिक म्हणजे 5,960 रूग्णांची नोंद झाली आहे. त्या खालोखाल महाराष्ट्र आणि तामिळनाडू असून तेथे अनुक्रमे 2,910 आणि 610 नवे रूग्ण आढळून आले आहेत.

भारतातील दैनंदिन मृत्यूंच्या संख्येतही सतत घट होत असल्याची नोंदणी होत आहे. गेल्या 23 दिवसांत दरदिवशी होणाऱ्या मृत्यूंची संख्या 300 पेक्षा कमी आहे.

गेल्या 24 तासांत सहा राज्ये/केंद्रशासित प्रदेशांत 66.30% पैकी 181 मृत्यूंची नोंद झाली आहे
सहा राज्ये/केंद्रशासित प्रदेशांत 66.30% नवीन मृत्यूंची नोंद
महाराष्ट्रात 52 लोकांचा मृत्यू झाला.केरळमध्ये मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्या 27 असून पश्चिम बंगालमध्ये 15 मृत्यूंची नोंद झाली.

* * *
Jaydevi PS/S.Patgaonkar/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1689386)