पंतप्रधान कार्यालय

पंतप्रधानाच्या हस्ते येत्या 18 जानेवारीला अहमदाबाद मेट्रो रेल्वे प्रकल्प टप्पा -2 आणि सुरत मेट्रो रेल्वे प्रकल्पाचे भूमिपूजन

Posted On: 16 JAN 2021 11:17PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 16 जानेवारी 2021

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते येत्या 18 जानेवारीला सकाळी साडे दहा वाजता दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून अहमदाबाद मेट्रो रेल्वे प्रकल्प टप्पा-2 आणि सुरत मेट्रो रेल्वे प्रकल्पाचे उद्‌घाटन होणार आहे. गुजरातचे राज्यपाल, केंद्रीय गृहमंत्री, गुजरातचे मुख्यमंत्री आणि केंद्रीय गृहनिर्माण आणि नागरी व्यवहार मंत्री या कार्यक्रमात सहभागी होतील. या मेट्रो प्रकल्पामुळे या दोन्ही शहरात पर्यावरण पूरक सार्वजनिक जलद वाहतूक सेवा उपलब्ध होतील. 

अहमदाबाद मेट्रो रेल्वे प्रकल्प टप्पा-2 विषयी माहिती :-

अहमदाबाद मेट्रो रेल्वे प्रकल्प टप्पा-2, 28.25 किमी लांबीचा असून त्यात दोन मार्गिका असतील. मोटेरा स्टेडीयम ते महात्मा मंदिर दरम्यान पहिली मार्गिका 22.8 किमी लांबीची (मेट्रो लाईन) असेल. तर दुसरी मार्गिका 5.4 किमी लांबीची असून ती GNLU पासून ते गिफ्ट सिटी पर्यंत असेल. या टप्यातील प्रकल्पासाठी एकूण 5,384 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे.

सूरत मेट्रो रेल्वे प्रकल्पाची माहिती:-

सूरत मेट्रो रेल प्रकल्प 40.35  किलोमीटर लांबीचा असून त्यात दोन मार्गिका असतील. पहिली मार्गिका 21.61 किलोमीटर लांबीची असेल जी सर्थाना पासून ड्रीम सिटी पर्यंत असेल. दुसरी मार्गिका 18.74 किलोमीटर लांबीची असून ती भेसन पासून सरोली पर्यंत असेल. ह्या प्रकल्पासाठीचा एकूण खर्च 12,020 कोटी रुपये अपेक्षित आहे.

 

 

 

 

Jaydevi P.S/R.Aghor/P.Malandkar

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai@gmail.com(Release ID: 1689242) Visitor Counter : 63