आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
भारतातील सक्रिय रुग्णसंख्या आणखी कमी होऊन 2.13 लाख झाली
दैनंदिन रुग्णसंख्या घटण्याचा कल भारताने कायम राखला; गेल्या 24 तासात 15,590 नवे रुग्ण
Posted On:
15 JAN 2021 5:22PM by PIB Mumbai
भारतात एकूण सक्रीय रुग्णसंख्येत सातत्याने होणारी घट कायम असून आज सक्रिय रुग्णांची संख्या 2.13 लाख (2,13,027) झाली आहे.
भारतामधील सध्या सक्रिय रुग्णांचे प्रमाण एकूण पॉझिटिव्ह रुग्णांच्या 2.03% आहे.
गेल्या काही दिवसात देशातील कोविड रुग्णांमध्ये दररोज नव्याने वाढ होणाऱ्या रुग्णांची संख्या आता 20 हजारहून कमी आहे. गेल्या 24 तासांत दैनंदिन नवीन रुग्णांची संख्या 15,590 आहे. गेल्या 24 तासांत 15,975 रुग्ण बरे होऊन त्यांना घरी पाठविण्यात आले.
गेल्या सात दिवसांत भारतात दर दशलक्ष लोकसंख्येमागे नवीन रुग्ण संख्या 87 आहे. रशिया, जर्मनी, ब्राझील, फ्रान्स, इटली, अमेरिका आणि युनायटेड किंगडम सारख्या जगातील इतर देशांशी तुलना केली तर ही संख्या खूपच कमी आहे.
एकूण बरे झालेल्या रुग्णांची संख्या 10,162,738 आहे. बरे झालेल्या आणि सक्रिय रुग्णांमधील तफावत सातत्याने वाढत असून ती 99 लाखांच्या पुढे गेली आहे आणि सध्या ती, 99,49,711आहे.
नवीन रुग्णांच्या तुलनेत बरे होणाऱ्यांचे प्रमाण जास्त असल्याने आज रुग्ण बरे होण्याचा दर 96.52% पर्यंत सुधारला आहे.
नव्याने बरे झालेल्या रुग्णांपैकी 81.15% रुग्ण हे 10 राज्ये / केंद्रशासित प्रदेशातील आहेत.
केरळमध्ये एक दिवसात सर्वाधिक 4,337 रुग्ण बरे झाले आहेय. गेल्या 24 तासांत महाराष्ट्रात 3,309 तर छत्तीसगडमध्ये 970 रुग्ण बरे झाले.
नवीन रुग्णांपैकी पैकी 77.56% रुग्ण 7 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील आहेत.
केरळमध्ये एक दिवसात सर्वाधिक 5,490 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. त्याखालोखाल महाराष्ट्रात 3,579 आणि पश्चिम बंगालमध्ये 680 नवीन रुग्ण आढळले आहेत.
गेल्या 24 तासांत 191 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे.
नवीन मृत्यूंमध्ये सहा राज्ये / केंद्रशासित प्रदेशांचा वाटा 73.30% आहे. महाराष्ट्रात सर्वाधिक (70) मृत्यू तर केरळ आणि पश्चिम बंगालमध्ये अनुक्रमे 19 आणि 17 दैनंदिन मृत्यूची नोंद आहे.
गेल्या सात दिवसांत भारतात दर दशलक्ष लोकसंख्येमागे केवळ एक जण दगावल्याची नोंद झाली आहे. यामुळे भारतात दर दशलक्ष लोकसंख्येमागे मृत्युदर 1.44% असून तो जगातील सर्वात कमी मृत्युदरांपैकी आहे.
S.Tupe/V.Joshi/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1688818)
Visitor Counter : 217