अर्थ मंत्रालय

अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रीय पायाभूत सुविधा पाइपलाइनची आढावा बैठक

Posted On: 06 JAN 2021 6:20PM by PIB Mumbai

 

केंद्रीय अर्थ व कंपनी व्यवहार मंत्री निर्मला सीतारमण यांनी आज जलसंपदा, नदी विकास आणि गंगा पुनरुज्जीवन विभाग आणि आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या सचिवांसमवेत झालेल्या बैठकीत राष्ट्रीय पायाभूत पाइपलाइन (एनआयपी) च्या अंमलबजावणीच्या प्रगतीचा आढावा घेतला.

महामारीनंतरही एनआयपीने भरीव प्रगती साधली असल्याचे बैठकीत स्पष्ट करण्यात आले. 6,835 प्रकल्पांसह सुरू झालेली एनआयपी आता 7,300 हून अधिक प्रकल्पांमध्ये विस्तारली गेली आहे. आर्थिक वर्ष 21 च्या दुसऱ्या तिमाहीत अनेक मंत्रालये / विभागांनी प्रकल्प अंमलबजावणी व खर्चामध्ये विशेष प्रगती दर्शविली आहे. याव्यतिरिक्त, बहुतेक मंत्रालये / विभागांनी आर्थिक वर्ष 20 च्या खर्चाच्या तुलनेत आर्थिक वर्ष 21 मध्ये मोठ्या प्रमाणात पायाभूत सुविधांवरील खर्चावर लक्ष्य केंद्रीत केले आहे.

आढावा बैठकीत या दोन मंत्रालये / विभागांनी केलेल्या वार्षिक लक्ष्यित व साध्य खर्चासह पायाभूत खर्चाव्यतिरिक्त, तातडीने करण्यात येणार्या विविध उपक्रमांवरही चर्चा करण्यात आली. आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयांतर्गत 80,915 कोटी रुपये किमतीच्या 24 प्रकल्पांचा तसेच जलसंपदा, नदी विकास आणि गंगा पुनरुज्जीवन विभागाच्या 2,79,604 कोटी रुपये किंमतीच्या 10 मोठ्या प्रकल्पांचा या प्रकल्पातील अंमलबजावणीत येणाऱ्या अडचणींसह आढावा घेण्यात आला.

अर्थमंत्र्यांनी दोन मंत्रालये / विभागांना सर्व एनआयपी प्रकल्पांची प्रभावीपणे अंमलबजावणी करून राज्य सरकार आणि इतर मंत्रालयांशी समन्वय साधून निराकरण न झालेल्या मुद्द्यांचे त्वरित निराकरण करण्यास सांगितले. विनाखंडीत ऑनलाइन देखरेखीसाठी राष्ट्रीय पायाभूत सुविधा पाइपलाइन डॅशबोर्ड नियमितपणे अद्ययावत करण्याच्या सूचना मंत्रालयाना देण्यात आल्या.

 

M.Chopade/V.Joshi/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1686584) Visitor Counter : 204