रेल्वे मंत्रालय

ऑनलाईन रेल्वे तिकिटांच्या आरक्षणासाठी भारतीय रेल्वेने ई-तिकीट संकेतस्थळ आणि मोबाइल अ‍ॅपचे केले नूतनीकरण

Posted On: 31 DEC 2020 4:03PM by PIB Mumbai

 

माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या डिजिटल इंडियाच्या दृष्टिकोनातून भारतीय रेल्वेने ऑनलाईन रेल्वे तिकिटांच्या आरक्षणासाठी त्यांची ई-तिकीट संकेतस्थळ www.irctc.co.in  आणि आयआरसीटीसी रेल कनेक्ट मोबाइल अ‍ॅपचे नूतनीकरण केले.

बेस्ट-इन-क्लास सारखी वैशिष्ट्ये असणाऱ्या या सुधारित ई-तिकीट वेबसाइट आणि अ‍ॅपचे उदघाटन आज 31 डिसेंबर, 2020 रोजी माननीय रेल्वेमंत्री आणि वाणिज्य व उद्योग, ग्राहक व्यवहार, अन्न व सार्वजनिक वितरण मंत्री पीयूष गोयल यांनी केले. सर्व प्रवाशांना रेल्वेने दिलेली ही नव वर्षाची भेट असेल.

सुधारित वेबसाइटची ठळक वैशिष्ट्ये:

भोजन व्यवस्था, विश्राम कक्ष, हॉटेल आरक्षणासारख्या प्रवाशांच्या गरजा तिकिटाबरोबरच एकाच ठिकाणी पूर्ण करण्यासाठी  वापरकर्त्याच्या लॉगिनशी त्याचे सर्व तपशील लिंक केलेले आहेत.

प्रवास सुरू करण्यापूर्वी किंवा स्थानकात  प्रवेश   करण्यापूर्वी  त्याला संभाव्य त्या सूचना दिल्या जातील.  यासाठी संगणकीय कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर केला जाईल. यामुळे त्याचा स्थानक शोधण्याचा त्रास कमी होईल आणि तिकिट आरक्षणातील वेळही वाचेल.

वापरकर्त्याच्या खात्यावरील परतावा स्थितीची सोपी तपासणी. पूर्वी हे वैशिष्ट्य सहज उपलब्ध नव्हते.

नियमितकिंवा पसंतीच्याप्रवासासाठी सहजी संबंधित तपशील प्रविष्ट करुन आरक्षण करता येते.

प्रवाशांचा वेळ कमी करण्यासाठी आणि आरक्षणाचा अनुभव सुलभ करण्यासाठी एका पृष्ठावर गाडी शोधून तिच्या निवडीची माहिती तेथेच दर्शविण्यात आली आहे.

एका पृष्ठावरील सर्व माहिती - सर्व वर्गासाठी उपलब्ध असलेल्या सर्व रेल्वेगाड्यांच्या तिकीट दरासह प्रदर्शित केली जाईल.

उपलब्धतेची स्थिती प्रदान करण्यासाठी आणखी एक कॅचे सिस्टमआणली गेली आहे. ज्याद्वारे उपलब्धता समजण्यात होणारा विलंब टळेल.

प्रतीक्षा यादीतील तिकिटे असल्यास, त्याची पुष्टीकरण संभाव्यताप्रदर्शित केली जाते. यापूर्वी प्रत्येक प्रतीक्षा यादीच्या स्थितीसाठी हे स्वतंत्रपणे तपासले जाणे आवश्यक होते.

इतर तारखांची उपलब्धता पृष्ठावरच तपासून पाहिली जाऊ शकते.

संगणक ओळख नसणाऱ्या वापरकर्त्यांनासुद्धा आरक्षण प्रक्रियेत सूचना मिळतात. संकेतस्थळ शोधण्यात त्याचा वेळ यामुळे वाचतो.

प्रवासाचे तपशील देयक पृष्ठावर देखील दर्शविले जातील. यात टंकलेखनात काही चुका असल्यास वापरकर्ता  ते तपासून दुरुस्त करण्यास सांगेल. या त्रुटी केवळ PRS केंद्राला भेट देऊन त्याद्वारे सुधारल्या जाऊ शकतात.

संकेतस्थळामध्ये योग्य कॅप्चा वापरुन सायबर सुरक्षा वाढविण्यासाठी योग्य कॅप्चा वापरुन अंगभूत वैशिष्ट्ये आहेत.

***

G.Chippalkatti/V.Joshi/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1685079) Visitor Counter : 237